Kolhapur By Election : राजेश क्षीरसागरांचं बंड शमलं! मतदारसंघात दाखल होत कार्यकर्त्यांना भावना आवरण्याचं आवाहन, काँग्रेसचं काम करणार?

शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ माजली होती. मात्र आता आघाडीला थोडा दिलासा मिळाला आहे.

Kolhapur By Election : राजेश क्षीरसागरांचं बंड शमलं! मतदारसंघात दाखल होत कार्यकर्त्यांना भावना आवरण्याचं आवाहन, काँग्रेसचं काम करणार?
राजेश क्षीरसागर यांची खदखद बाहेरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 7:35 PM

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत (Kolhapur north Assembly Election) आज मोठ्या घडामोडी घडलेत. शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ माजली होती. मात्र आता आघाडीला थोडा दिलासा मिळाला आहे. कारण राजेश क्षीरसागर बंड करणार का? अशी धाकधूक काँग्रेसला (Congress Candidate jayshree jadhav) लागली होती, ती आता संपली आहे. क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांना आदेशाप्रमाणे काम करत संयम ठेवण्याचं आवाहन केलं आहे. मात्र त्यांनी बंड केलं असतं तर भाजपचा मार्ग सुकर आणि महाविकास आघाडीचा मार्ग खडतर झाला असता. बंड जरी शमलं असलं तरी यावेळी विविध मुद्यावरून राजेश क्षीरसागर यांची खदखद बाहेर आली आहे. मंत्रिपद न मिळण्यापासून ते कोल्हापुरातली अंतर्गत धुसफूस त्यांनी सर्वं बोलून दाखवलं.

निवडणुकीच्या रिंगणात कोण?

काँग्रेसकडून या ठिकाणी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant jadhav)  यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर भाजपनं सत्यजीत कदम यांना उमदेवारी दिली आहे. त्यात करूणा शर्माही या निवडणुकीत उतरल्या आहेत.  छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना अभिवादन करतो. असे म्हणत क्षीरसागर यांनी भाषणाला सुरूवात केली.

काय म्हणाले राजेश क्षीरसागर?

त्यानंतर राजेश क्षीरसागर म्हणाले,  माझ्या राजकीय महत्त्वाच्या निर्णयाक्षणी उभे असणाऱ्या, ठामपणे उभे राहणाऱ्या कार्यकर्ते, हितचिंतक आणि पत्रकार बांधवांचे आभार मानतो. माझ्यावर विश्वास ठेऊन, मला विजयाप्रत नेणाऱ्या कार्यकर्त्यांचं आभार मानतो. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या कोल्हापूर उत्तरची जागा काँग्रेसनं पाच आमदार पाडले. त्या पक्षाला सोडावे लागले. त्याचं दु:ख होतंय. महाविकास आघाडी सरकार स्थापन होतानाचा तो निर्णय होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत गैरविश्वास पसरवला गेला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे नेते एकत्र आले. असा आरोप त्यांनी केला आहे.

कार्यकर्त्यांची भावना निवडणूक लढवण्याची

निवडणुकीच्या पराभवानंतर मी डगमगलो नाही. दुसऱ्या दिवसापासून समाजहिताची करत आलो. कोरोना काळात काम केलं. विकासाची काम केलं. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे या सर्वांच्या आशीर्वादानं गेल्या दोन वर्षामध्ये शहरासाठी 237 कोटी रुपये, रंकाळ्यासाठी निधी आणला. पर्यटनासाठी निधी आणला. नगरविकास विभागाकडून निधी आणला. या पोटनिवडणुकीत मी निवडणूक लढवावी, असा निर्णय शिवसैनिकांनी घेतला होता. एक्झिट पोल शिवसेना विजयी होणार असं सांगत होता. खरोखरचं तिरंगी लढत व्हायला पाहिजे होती. शिवसेनेची ताकद काँग्रेसला समजली होती. 13 मार्चला आपण मेळावा घेतला, त्यावेळी शिवसेनेनं ही निवडणूक लढवावी, असं मत मांडलं होतं, असेही त्यांनी सांगितलं.

भाजपला सोबत का घेतलं? याचं उत्तर द्या

काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेला डावलत भाजपला सोबत का घेतलं? याचं उत्तर देण्याची गरज आहे. उदय सामंत आणि अरुण दुधवडकर यांनी जिल्हा बँकेतील भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादीची यूती होत असेल तर शिवसेना संपर्क प्रमुखांनी आपली बाजू पक्षनेतृत्त्वाला पटवून द्या.ला हवं होतं. महापालिकेत त्यांना यूती नको, पंचायत समितीत यूती नको, नगरपालिकेत यूती नको असताना शिवसैनिकांना युती कधी मिळणार, असं राजेश क्षीरसागर म्हणाले. 6 मे 1986 पासून मी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करत राहिलो, असे त्यांनी सांगितले.

मंत्रिपद दिलं असतं तर चित्र वेगळं असतं

2019 च्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर मला उद्धव ठाकरे यांनी मला नियोजन मंडळाचं अध्यक्ष दिलं हे मी विसरु शकत नाही. आजची परिस्थिती वेगळी आहे. 2014 च्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपची युती झाली. त्यावेळी मला मंत्रिपद दिलं असतं तर मी शिवसेनेचे  6 ते 8  आमदार करुन दाखवले असते. कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसला सोडावा लागतं असलं तरी दु: ख वाटतंय. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी काम केलं पाहिजे. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्याशी प्रामाणिक होतो आणि राहणार आहे. दोन दिवसांपासून काँग्रेसला मतदारसंघ सोडल्यामुळं कार्यकर्ते  आणि पदाधिकाऱ्यांची जी भावना आहे.  ती उद्धव ठाकरे यांना कळवली आहे.  2024 ला ही जागा आपल्याला मिळेल, असं वरिष्ठांनी सांगितलं आहे. त्यामुळं पक्ष आदेशाप्रमाणं काम करुया असं राजेश क्षीरसागर  म्हणाले.

‘शिवसनेची लाचारी 2019 ला दिसली, मोदींचा फोटो लावून निवडणूक जिंकली’, फडणवीसांचा शिवसेनेवरील हल्लाबोल सुरुच

Kolhapur North Assembly election : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या मैदानात करूणा शर्मा, पंढरीतून फुंकलं रणशिंग

काही चुकांमुळे Congress कमकुवत झालीय, सुशीलकुमार शिंदे यांचा पक्षाला आत्मचिंतन करण्याचा सल्ला

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....