Video | कोल्हापूरमध्ये लसीकरण केंद्रावर गोंधळ, नागरिकांनी शिवीगाळ केल्याचा आशा वर्कर्सचा आरोप

कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेत एक लसीकरण करणाऱ्या आशा वर्कर्स आणि नागरिकांमध्ये चांगलाच वाद झाला आहे. (kolhapur asha workers corona vaccination)

Video | कोल्हापूरमध्ये लसीकरण केंद्रावर गोंधळ, नागरिकांनी शिवीगाळ केल्याचा आशा वर्कर्सचा आरोप
KOLHAPUR CORONA
Follow us
| Updated on: Apr 30, 2021 | 11:07 PM

कोल्हापूर : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे कोरोनाला थोपवण्यासाठी लसीकरण (Corona vaccination) हा नामी उपाय असल्याचे सांगितले जात आहे. याच कारणामुळे राज्य सरकारकडून युद्धपातळीवर लसीकरण कार्यक्रम राबवला जातोय. मात्र, राज्यात काही ठिकाणी लसीकरण केंद्रांवर विचित्र प्रकार घडत आहेत. कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेत एका लसीकरण केंद्रावर आशा वर्कर्स आणि नागरिकांमध्ये चांगलाच वाद झाला. (Kolhapur clash between Asha workers and people waiting for Corona vaccination)

नेमकं काय घडलं ?

कोरोनाला थोपवण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जातोय. कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेतसुद्धा लसीकरण केंद्रावर लोकांना लस दिली जात आहे. मात्र, येथे आज अचनाक आशा वर्कर्स आणि नागरिकांमध्ये चांगलाच वाद झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी नागरिकांनी आशा वर्कर्स तसेच इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आशा वर्कर्सनी केला आहे. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांकडून शिवराळ भाषा वापरण्यात आली असे नागरिकांनी म्हटले आहे.

माफी मागेपर्यंत लसीकरण केंद्र बंद

यावेळी हा प्रकार घडल्यानंतर येथील आशा वर्कर्सने काम बंदचा पवित्रा घेतला. अर्वाच्य भाषेत बोललेले नागरिक जोपर्यंत माफी मागणार नाहीत तोपर्यंत लसीकरण सुरु करणार नाही अशा इशारा या आशा वर्कर्सने दिला. तसेच हा वाद विकोपाला गेल्यामुळे अनपेक्षित प्रकार घडण्याआधी येथे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. सध्या येथील परिस्थिती स्थिर आहे.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, राज्यता युद्धपातळीवर लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असताना येथे मात्र, लसीकरणादरम्यान गंभीर प्रकार घडत आहेत. कोल्हापुरात लसीकरण केंद्रावर गडबड झाल्याचा मागील तीन दिवसांतील हा चौथा प्रकार आहे. या अशा प्रकारांमुळे प्रशासनात समनव्य नसल्याने लसीकरण केंद्रावर गोंधळाच्या होत असल्याचा आरोप केला जातोय. याच कारणामुळे लसीकरण केंद्रावरील मनमानी रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी होत आहे.

इतर बातम्या :

Chandro Tomar Death | ‘शुटर दादी’ चंद्रो तोमर यांचे कोरोनामुळे निधन, मेरठमध्ये रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

आता हवेतून ऑक्सिजन बनविणारी मशीन परदेशातून ऑनलाईन मागवता येणार, सरकारचा मोठा निर्णय

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच शरद पवारांचे पक्षाला आदेश, सीएम फंडासाठी राष्ट्रवादीने पेटारा उघडला!

(Kolhapur clash between Asha workers and people waiting for Corona vaccination)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.