AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मुख्यमंत्र्यांच्या सावरकर यात्रेने उपस्थित केलेले प्रश्न सुटणार का?”; राष्ट्रवादीच्या खासदाराचा शिंदेंनाच प्रतिसवाल

सावरकर यात्रेवरून अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना छेडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य झाली होती.

मुख्यमंत्र्यांच्या सावरकर यात्रेने उपस्थित केलेले प्रश्न सुटणार का?; राष्ट्रवादीच्या खासदाराचा शिंदेंनाच प्रतिसवाल
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 9:31 PM

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. काँग्रेस आणि भाजपकडून दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आणि लोकसभेने त्यांची खासदारकी रद्द केल्यामुळे जोरदार वाद सुरू झाला आहे. काँग्रेस आणि भाजपकडून राज्यभर आंदोलन सुरु आहे. तर कोल्हापूर दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी राहुल गांधी यांच्याविषयी बोलताना सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मला आदर आहे.

मात्र सध्याच्या काळात सावरकरांकडे मुद्दा घेऊन जाण्यापेक्षा लोकशाहीकडे घेऊन जाण्याची गरज असल्याचा टोला सावरकरप्रेमींना त्यांनी लगावला आहे.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केल्यानंतर भाजपने त्यावरून आता राजकारण सुरु केले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सावरकर यात्रेवरून अमोल कोल्हे यांनी त्यांना प्रतिसवाल केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सावरकर यात्रेने राहुल गांधींनी लोकसभेत उपस्थित केलेले प्रश्न सुटणार आहेत का असा सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर भाजपवर चहूबाजूनी टीका केली जात आहे. त्यांच्या खासदारकी रद्द झाल्यावरून चाललेल्या राजकारणावरही अमोल कोल्हे यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईची क्रोनोलॉजी तपासण्याची गरज आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईवरून आता लोकशाही जिवंत आहे का हा सवाल आता उपस्थित होत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

सावरकर यात्रेवरून अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना छेडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य झाली होती.

त्यावेळी का यात्रा काढल्या गेल्या नाहीत असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.त्यामुळे कोणत्याही महापुरुषांबद्दल सध्या राजकारण आणू नये असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.