शरद पवार यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सडेतोड उत्तर, म्हणाले….

शरद पवार यांची कोल्हापुरात आज जाहीर सभा पार पडली. या सभेत शरद पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आपल्या शब्दांत सडेतोड उत्तर दिलं.

शरद पवार यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सडेतोड उत्तर, म्हणाले....
sharad pawar and eknath shinde
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 9:53 PM

कोल्हापूर | 25 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या कोल्हापूरच्या भाषणात भाजपवर सडकून टीका केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन भाजप सरकारवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील प्रत्युत्तर दिलं. शरद पवार देशाचे कृषीमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी जे केलं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी केलं, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यांच्या या दाव्याला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी कांद्या उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुनही भाजपवर घणाघात केला.

“नाशिकमध्ये कांद्याची काय स्थिती आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या घामाची किंमत पाहिजे. कांदा उत्पादन करण्यासाठी जो खर्च येतो त्याची रक्कम त्याच्या पदरात पडायला पाहिजे, ती मागणी पूर्ण करायची असेल तर कांदा जगात पोहोचायला पाहिजे. महाराष्ट्राच्या बाहेर हा कांदा जात असताना मोदी सरकारने या कांद्यावर प्रचंड कर बसवला”, असं शरद पवार म्हणाले.

‘केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडे ढुंकून पाहिलं नाही’

“केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के कर बसवला. एवढी एक्सपोर्ट ड्यूटी बसवल्यानंतर बाहेरच्या देशात कांद्याला गिऱ्हाईक मिळेना. त्याचा परिणाम म्हणजे देशात कांद्याचे भाव पडले. अनेक लोकांनी आंदोलन केलं. संघर्ष केला. सत्याग्रह केला. पण त्याची दखल घेतली गेली नाही. केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे ढुंकून पाहिलं नाही”, असा आरोप शरद पवारांनी केलं.

“मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, शरद पवार शेतीमंत्री होते त्यावेळेला त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय केलं? मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो, मी शेती मंत्री असताना कांद्यावर कधीही कर बसवला नाही. परदेशात कांदा जाईल, याची काळजी घेतली”, असं प्रत्युत्तर शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.

“एकादिवशी कांद्याच्या किंमती वाढल्या त्यावेळेला भाजपवाले गळ्यात कांद्या माळ घालून पार्लमेंटमध्ये आले. तेव्हा सभापतींनी मला विचारलं की तुमचं उत्तर काय? मी त्यांना स्पष्ट सांगितलं, शेतकरी कांदा पिकवल्यानंतर त्याला दोन पैसे मिळावे, त्याला सन्मानाने जगता येत असेल तर मी त्या शेतकऱ्याच्या मागे उभे राहणार. तुम्ही कांद्याच्या माळा घाला किंवा कवड्याच्या माळा घाला मी शेतकऱ्याची रक्कम कमी होऊ देणार नाही. त्याला जी काही किंमत मिळतेय त्यापेक्षा अधिक किंमत कशी मिळेल याकडे माझं लक्ष राहील”, असं शरद पवार म्हणाले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.