कोल्हापुरात विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसवर अज्ञातांकडून दगडफेक, पोलीस घटनास्थळी दाखल

कोल्हापुरात एका बसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

कोल्हापुरात विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसवर अज्ञातांकडून दगडफेक, पोलीस घटनास्थळी दाखल
Follow us
| Updated on: Jan 31, 2024 | 6:11 PM

भूषण पाटील, Tv9 प्रतिनिधी, कोल्हापूर | 31 जानेवारी 2024 : कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक इथे शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसवर दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सहलीच्या बससह इतर आजूबाजूच्या चारचाकी वाहनांवरही दगडफेक करण्यात आली आहे. काही अज्ञातांकडूनी ही दगडफेक करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटानस्थळी दाखल झाले आहे. पोलिसांकडून आता घटानस्थळ गाठून तपासाला सुरुवात झाली आहे.

कोल्हापूरमध्ये सध्या अंबाबाईच्या दर्शनासाठी मोठी गर्दी येत आहे. तसेच शाळेच्या सहलीदेखील कोल्हापुरात येत आहे. या सर्व भाविक आणि पर्यटकांच्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था दसरा चौकच्या पार्किंगमध्ये करण्यात आलेली आहे. याच ठिकाणी उभ्या असलेल्या शाळेच्या एका बसवर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. त्याचबरोबर आणखी दोन चारचाकी वाहनांची तोडफोड अज्ञातांनी केली आहे. या तोडफोडीमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

कोल्हापुरात आज सकाळपासून अतिक्रमणच्या मुद्द्यावरुन गोंधळ सुरु असताना आज संध्याकाळी वाहनांवर दगडफेक करण्याची आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. नेमकी घटना काय झाली आहे, दगडफेक का झाली, कोणी केली? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पण सकाळपासूनची परिस्थिती काहीशी निवळत असताना संध्याकाळी अज्ञातांनी दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.