कोल्हापूरः आमचे वडील गेले, पण कोल्हापूरने (Kolhapur) मोठेपणा दाखवला, अशी भावुक प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवार आणि चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी पोटनिवडणुकीत घेतलेली विजयी आघाडी पाहून त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी त्यांना टीव्ही 9 मराठीशी बोलताना चंद्रकांत जाधव यांच्या निधनाचे इतके दुःख झालेले होते की, त्यांनी कॅमेऱ्यासमोर आपल्या भावनांचा बांध मोकळा करून दिला. काँग्रेस आमदार चंद्रकात जाधव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. कोरोनामुळे चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसकडून (Congress) उमेदवार कुणाला दिली जाणार, याकडेही महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीला उमेदवार देण्यावर एकमताने निर्णय घेतला. निकाल दिवंगत चंद्रकांत जाधव यांची पत्नी जयश्री पाटील यांच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे त्याचा संदेश हा थेट महाराष्ट्रभर ठळकपणे जाणार आहे. सरकार स्थिर आहे, असाही एक समज सर्वदूर जाईल, असा तर्क जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.
दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते अनिल वरकट यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांना अण्णांच्या आठवणीने धड बोलतानाही येत नव्हते. वरकट म्हणाले, विजय हीच अण्णांना खरी श्रद्धांजली आहे. अण्णा लहानपणापासून फार प्रसिद्ध होते. अण्णांची कार्यपद्धती एकदम चांगली होती. ते निस्वार्थी होते. त्यामुळे ते खूप प्रसिद्ध होते. आता जे – जे फळ मिळतेय ते त्याचेच मिळते आहे. कोल्हापूरकर शंभर टक्के त्यांच्या पाठिशी राहिले. माझी बहीण शंभर टक्के विजयी होणार हे सत्य आहे. भाजपबरोबर अण्णांचे पहिले संबंध चांगले होते. ही निवडणूक लागायला नको होती. भाजपने परंपरा पाळली नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कोल्हापूर उत्तरच्या अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांना मोठी धोबीपछाड देत जाधव यांनी या विजयाची नोंद केली आहे. भाजपने या जागेवर जयश्री जाधव यांना लढण्याची ऑफर दिली. मात्र, त्यांनी भाजपकडून लढण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपने या जागी सत्यजीत कदम यांना उमेदवारी दिली. तसेच भाजप नेते चंद्रकांत पाटील हे या निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापुरात ठाण मांडून बसल्याचे दिसून आले. या पोटनिवडणुकीत मतमोजणीच्या एकूण 26 फेऱ्या पार पडल्या. यात सुरूवातीपासूनच जयश्री जाधव या आघाडीवर होत्या. शेवटच्या 26 व्या फेरीपर्यंत एकूण 18901 मतांनी जयश्री जाधव विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले.