कोल्हापूरचं राजकारण पुन्हा तापतंय, सतेज पाटील आणि महाडिक गट आमनेसामने, काय होणार?

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक गट पुन्हा आमने-सामने आले आहेत.

कोल्हापूरचं राजकारण पुन्हा तापतंय, सतेज पाटील  आणि महाडिक गट आमनेसामने, काय होणार?
Follow us
| Updated on: Dec 13, 2022 | 5:45 PM

भूषण पाटील, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गावागावात सध्या राजकारण चांगलंच तापलंय. विशेषतः काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि भाजप खासदार धनंजय महाडिक या कट्टर विरोधकांचा मतदारसंघ असलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात 21 ग्रामपंचायतींच्या निवडणुकींमध्ये चांगलीच चुरस वाढवलीय. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक गट पुन्हा आमने-सामने आले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात आणि थंडीत ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापलंय. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात संपलेल्या जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतीसाठी येत्या 18 डिसेंबरला मतदान तर 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

प्रचारासाठी आता अवघे तीन ते चार दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत राजकीय पक्ष आणि नेत्यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे.

हे सुद्धा वाचा

निवडणूक ग्रामपंचायतींची असली तरी राजकीय पक्षांनी जिल्ह्यावर ताबा मिळवण्यासाठी चढाओढ सुरू केलीय. विशेषतः भाजपने मित्र पक्षांना एकत्र करत 300 पेक्षा अधिक सरपंच करण्याचा निर्धार केलाय.

या निवडणुकीत सर्वाधिक वातावरण तापले ते आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात. दक्षिण मतदारसंघातील 21 ग्रामपंचायतींची निवडणूक सध्या होत असून यात बहुतांश ठिकाणी आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्याच गटात प्रमुख लढत होतेय.

याच मतदारसंघात काही ठिकाणी शिंदे गट तर काही ठिकाणी ठाकरे गटांने देखील उमेदवार उतरवले आहेत. असं असलं तरी खरी लढत मात्र महाडिक आणि पाटील गटातच होण्याची चिन्हं आहेत.

पाचगाव, कंदलगाव मोरेवाडी, उचगावं अशा मोठ्या गावात होणाऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलंय. थेट सरपंच पदाच्या उमेदवारांसह सदस्य पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी ही प्रचारात चांगलीच आघाडी घेतलीय.

पथनाट्य, डिजिटल प्रचार, बॅनर बाजी, वैयक्तिक गाठीभेटीच्या माध्यमातून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतातहेत. त्यामुळे या गावांमधील वातावरण ढवळून निघालंय.

एकूणच कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात निवडणुका ग्रामपंचायतच्या होत असल्या तरी सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांचीच प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळतंय.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.