Rupali Chakankar | महाराष्ट्राला अशांत करण्यासाठी काही विकृत मनोवृत्ती काम करत आहेत, रुपाली चाकणकरांची टीका
कोल्हापूरः राज्यावर कोणतंही संकट आलं तरी महाराष्ट्र एकसंध होतो, लढतो आणि जिंकतो. मात्र सध्या या एकसंध आणि शांत असलेल्या महाराष्ट्राला अशांत करण्यासाठी काही विकृत मनोवृत्ती राज्यात आहेत. त्यांच्यामुळे महाराष्ट्राच्या शांततेला बाधा पोहोचत असल्याचं वक्तव्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकलणकर (Rupali Chakankar) यांनी म्हटलं आहे. कोल्हापूरमध्ये (Kolhapur) त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सध्या महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण […]
कोल्हापूरः राज्यावर कोणतंही संकट आलं तरी महाराष्ट्र एकसंध होतो, लढतो आणि जिंकतो. मात्र सध्या या एकसंध आणि शांत असलेल्या महाराष्ट्राला अशांत करण्यासाठी काही विकृत मनोवृत्ती राज्यात आहेत. त्यांच्यामुळे महाराष्ट्राच्या शांततेला बाधा पोहोचत असल्याचं वक्तव्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकलणकर (Rupali Chakankar) यांनी म्हटलं आहे. कोल्हापूरमध्ये (Kolhapur) त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सध्या महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण केली जात असून विरोधकांचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत, असंही त्या म्हणाल्या. मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावर रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?
महाराष्ट्रातील सध्याच्या वातावरणाबद्दल बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, ‘ राज्यावर कोणतंही संकट आले तरी महाराष्ट्र एकसंध होतं आणि लढतो आणि जिंकतो. एकसंध आणि शांत महाराष्ट्राला अशांत करण्यासाठी काही विकृत मनोवृत्ती राज्यात आहेत. ज्यांना काम करायचं नाही किंवा इतरांना करू द्यायचं नाही त्यांच्याकडून हे सुरू आहे. प्रत्येक पक्षाचे संस्कार असतात आणि ते त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येतात, असा टोलाही चाकणकर यांनी भाजपाला लगावला आहे.
भोंगे लावा, भोंगे काढा हा विषय नाही….
मातोश्री निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली आहे. त्यातच राणा दाम्पत्य हनुमानचालिसासाठी आग्रही भूमिकेत आहेत. यावर बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, ‘ आपल्या नेतृत्वावर टीका करणं कार्यकर्त्याला आवडत नाही तो सळसळत्या रक्तात असतो. त्यामुळेच आज मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी जमली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची उत्तम जबाबदारी सरकारने उत्तम पाळली आहे. रोजा इफ्तार सुरू असताना भोंगे काढा..भोंगे लावा.. हा विषयच होऊ नाही. मोदींनी रोजगार स्वप्न दाखवले होते. मात्र प्रत्यक्षात महाराष्ट्राच वेगळ्याच गोष्टींवरून राजकारण सुरु आहे, असा आरोप रुपाली चाकणकर यांनी केला आहे.
इतर बातम्या-