आंदोलनाची तीव्रता वाढली ! कोल्हापुरातील एसटी कर्मचारी सोमवारपासून संपावर
आंदोलनाची तीव्रता वाढलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व एसीटी कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. सोमवारपासून येथील कर्मचारी संपावर जाणार असून या निर्णयामुळे आता ऐन दिवळीत प्रवाशांचे चांगलेच हाल होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : राज्यातील एसटी कर्मचारी 27 ऑक्टोबरपासून संपावर आहेत. विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या या आंदोलनाची तीव्रता आता वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व एसटी कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. सोमवारपासून येथील कर्मचारी संपावर जाणार असून या निर्णयामुळे आता ऐन दिवळीत प्रवाशांचे चांगलेच हाल होण्याची शक्यता आहे.
सर्व एसटी कर्मचारी संपात सहभागी होणार
मागील अनेके दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. अशाच प्रकारच्या अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व एसटी कर्मचारी सोमवारपासून संपात सहभागी होणार आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचा संप मागे घेणार नाही, असा पवित्रा एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. तसे पत्रच जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी नियंत्रकांना दिले आहे.
मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे आंदोलन
या आंदोलनाला आता हवा मिळाल्याचे दिसत आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात एसटी कर्मचारी आंदोलन तसेच संपावर आहेत. मागील काही महिन्यांपासून अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे सध्या हे आंदोलन प्रकाशझोतात आले. याआधी आमच्या मागण्यांकडे कोणी लक्ष देत नसल्याचा आरोप करत हिंगोलीतील एका एसटी वाहकाने विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न
हिंगोली जिल्ह्यातील एसटी वाहकानं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सध्या संबंधित वाहकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आंदोलनाकडे कुणीच लक्ष देत नसल्याने हिंगोलीतील वाहकानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. रमेश टाळीकुटे अस आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वाहकाचं नाव आहे. रमेश थोरात कळमनुरी आगारात वाहक म्हणून कार्यरत आहेत. हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात वाहकावर उपचार सुरू आहेत.
इतर बातम्या :
Video | गोपीचंद पडळकरांच्या गाडीची पुन्हा तोडफोड, कार्यकर्ते जखमी, सांगलीत वाद उफाळला
Amol Kolhe | ‘टोकाचे निर्णय घेतले, आता फेरविचाराची गरज,’ अमोल कोल्हेंच्या फेसबुक पोस्टचा अर्थ काय ?