भारताला जागतिक नेता बनविण्याचे काम युवा पिढीने करावे, स्वामी अभिषेक ब्रह्मचारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबांच्या कल्याणासाठी अद्भुत काम करत आहेत. आता शिस्तबद्ध राहून भारताला जागतिक नेता बनविण्याचे काम युवा पिढीला करावे लागेल. त्यानंतर भारत जगाचे नेतृत्व करु शकेल. युवकांनी प्रत्येक युगात भारताची शान वाढविण्याचे काम केले आहे.

भारताला जागतिक नेता बनविण्याचे काम युवा पिढीने करावे, स्वामी अभिषेक ब्रह्मचारी
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 2:52 PM

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठात भारतीय स्वातंत्र्य लढा आणि युवक या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यानाचे उद्घाटन करताना स्वामी अभिषेक ब्रह्मचारी यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, युवकांनी प्रत्येक युगात भारताची शान वाढविण्याचे काम केले आहे. स्वामी अभिषेक ब्रह्मचारी म्हणाले की, शिस्तबद्ध राहून भारताला जागतिक नेता बनविण्याचे काम युवा पिढीला करावे लागेल.  भारताला प्रभू रामसारख्या तरुणांची गरज आहे.

प्रमुख पाहुणे युवा चेतनाचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंग म्हणाले की, लोकमान्य टिळक, मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई, बिरसा मुंडा, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, बैकुंठ यांसारख्या लढवय्यांमुळे भारत स्वतंत्र झाला. रोहित कुमार सिंग म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तरुणांचे लाडके नेते असून भारताच्या शूर सुपुत्रांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.

रोहित कुमार सिंग म्हणाले की, भारतीय राजकारणातील वाढत्या कुटुंबवादाविरोधात सर्वसामान्य तरुणांना संघटित व्हावे लागेल. रोहित कुमार सिंह म्हणाले की, भगतसिंग यांनी भारतात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी बलिदान दिले होते, मात्र स्वातंत्र्यानंतर या देशात कुटुंब पद्धतीचे वर्चस्व निर्माण झाले.

रोहित कुमार सिंग म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबांच्या कल्याणासाठी अद्भुत काम करत आहेत. संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनय भोसले यांनी स्वामी अभिषेक ब्रह्मचारी आणि युवा चेतनाचे राष्ट्रीय संयोजक रोहितकुमार सिंग यांचा गौरव केला. कार्यक्रमाला ५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती राहिली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.