छत्रपती संभाजी महाराज स्मारक जागा, सरदेसाई वाडा कोणामुळे मिळाला? शिवसेनेच्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये श्रेयाची लढाई
संगमेश्वर येथे सरदेसाईंच्या वाड्यात छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक प्रस्तावित आहे, त्यावरुन आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.

संगमेश्वर येथे सरदेसाईंच्या वाड्यात छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक प्रस्तावित आहे, त्यावरुन आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. प्रस्तावित स्मारकावरून महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई चालू आहे. सरदेसाई यांच्या मालकीच्या जागेला सर्वप्रथम राज्यमंत्री योगेश कदम यांनी भेट दिली असा दावा शिवसेनेा नेते रामदास कदम यांनी केला आहे. योगेश कदम यांच्या भेटीनंतर सरदेसाई यांनी स्मारकासाठी जागा देण्याचे कबुल केले असं रामदास कदम म्हणाले. उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे संगमेश्वरमध्ये येणार असतील, तर त्यांनी त्यांच्या सोबत योगेश कदम यांनाही घेऊन जावं असं शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी एकनाथ शिंदें यांना आवाहन केलं.
रामदास कदम यांच्या वक्तव्यामुळे उदय सामंत आणि रामदास कदम यांच्यातील अंतर्गत वादाची ठिणगी पडल्याची चर्चा आहे. सरदेसाई यांच्या वाड्यात छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक व्हावं, यासाठी सर्वात अधिक प्रयत्न योगेश कदम यांनी केले असा रामदास कदम यांचा दावा आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता निधी देतील. मात्र जागेचा प्रश्न योगेश कदम यांनी सोडवला असं रामदास कदम म्हणाले.
रामदास कदम यांनी एकनाथ शिंदेंना काय विनंती केली?
“सर्वप्रथम योगेश कदम तिथे गेले. त्या वाड्याची पाहणी केली. त्या सरदेसाईंना भेटले. मला सांगायला आनंद होतो, की योगेश कदम आणि सरदेसाई वाड्याचे मालक यांच्यात तीन बैठका झाल्या. सरदेसाईनी कबूल केलय की, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी मी जागा आपल्याला देतो. यात पहिल पाऊल योगेश कदम यांनी उचललय. मात्र, आज राज्याचे उपमुख्यमंत्री स्वत: भेट देतायत. त्याला निधी देतील. स्मारकाची घोषणा होईल. पण जागेचा प्रश्न सोडवण्याच काम ज्या योगेश कदमांनी केलं, त्यांना सोबत घ्यावं, अशी माझी एकनाथ शिंदेंना विनंती आहे” असं रामदास कदम म्हणाले.