कुणाल कामरा, मातोश्री आणि संजय राऊत…; शिवसेना नेत्याचा सर्वात मोठा दावा काय?
कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या व्यंगात्मक गीतामुळे निर्माण झालेल्या वादात संजय निरूपम यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की कामराला परदेशातून निधी मिळत आहे आणि त्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला जाऊ शकतो.

कॉमेडियन कुणाल कामरा हा सध्या अडचणीत सापडला आहे. कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल व्यंगात्मक गीत गायले होते. त्यामुळे तो अडचणीत सापडला होता. या प्रकरणी कुणाल कामराला अटक करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते करत आहेत. यादरम्यान कुणाल कामराच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. त्यात आता शिवसेना नेते संजय निरुपम यांनी एक मोठा दावा केला आहे.
संजय निरुपम यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुणाल कामरा प्रकरणावर भाष्य केले. कुणाल कामराला मदत करण्यासाठी फतवा जारी करण्यात आला आहे. त्याला एका समुदायाचे लोक परदेशातून पैसे पाठवत आहेत. कुणाल कामरावरही देशद्रोहाचा खटला दाखल केला जाऊ शकतो, असे संजय निरुपम म्हणाले.
पोलिस समोर पक्ष ठेवला पाहिजे
पूर्वीपासून सांगत होतो की कुणाल कामराने व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांची विटंबना केली आहे, याच्या मागे उद्धव ठाकरे गटाचा हात आहे. आता पुढे जे काही बोलले तो एवढा महत्त्वाचा विषय नाही. कारण ते वकील नाही. मद्रास उच्च न्यायालयाने ७ दिवसांचा वेळ दिला आहे. पण 7 एप्रिलच्या नंतर किंवा त्याच्या पूर्वी कामराला इकडे यायला पाहिजे. त्यांनी जे काही बोलले आहे त्याच्याबद्दल पोलिस समोर पक्ष ठेवला पाहिजे, असे संजय निरुपम यांनी म्हटले.
फोर्ड फाउंडेशनने किती पैसे दिले याचीही चौकशी झाली पाहिजे
कुणाल कामराला मदत करण्यासाठी फतवा जारी करण्यात आला आहे. एका समुदायाचे लोक परदेशातून कामराला पैसे पाठवत आहेत. ‘हम होंगे कंगल’ या व्हिडीओसाठी कॅनडा आणि भारतविरोधी लोक पैसे पाठवत आहेत. भारतविरोधी गट, राष्ट्रविरोधी गट कुणाल कामराला मदत करत आहेत. कुणाल कामरा यांच्यावरही देशद्रोहाचा खटला दाखल केला जाऊ शकतो. मी कागदपत्रे केंद्रीय एजन्सीला पाठवीन. शिंदे साहेबांविरुद्ध बनवलेल्या व्हिडीओची निर्माती एक महिला आहे आणि ती फोर्ड फाउंडेशनशी संबंधित आहे. फोर्ड फाउंडेशनने किती पैसे दिले याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली.
त्याच्यासाठी तुरुंग ही सर्वात सुरक्षित जागा
“संजय राऊत यांनी स्वतः कुणाल कामराशी बोलल्याचे कबूल केले आहे. मातोश्रीच्या सूचनेवरून कुणालने हा व्हिडीओ बनवला आहे, असा सर्वात मोठा दावा संजय निरुपम यांनी केला. कंगना राणौत ही देशातील एक अभिनेत्री आहे, तिने कोणतेही देशद्रोहाचे कृत्य केलेले नाही. पण कुणाल कामरा देशविरोधी शक्तींसोबत उभा आहे. त्याला कोणत्याही संरक्षणाची गरज नाही. जर त्याच्यासाठी काही सुरक्षित जागा असेल तर ती तुरुंग आहे”, असेही संजय निरुपम म्हणाले.
“कुणाल कामराला पोलिसांसमोर हजर राहावे लागेल. कामराला मुंबईला यावे लागेल. जर तो आला नाही तर कायद्याची व्याप्ती खूप मोठी आहे. कुणाल कामरा भित्रा आहे, म्हणूनच तो लपून बसला आहे”, असेही संजय निरुपम यांनी म्हटले.