मला जगातील भाग्यवान दादा आणि भाऊ बनविले, काय म्हणाले अजितदादा

हिरामण खोसकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, तो एकटा आला नाही सगळ्यांना घेऊन आला आहे. आपल्याला जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आहेत,पण विकास कोणी केला? कोण करेल आणि निधी आणायची कोणात धमक आहे हे लक्षात ठेवा मला तुमच्या पाठींब्याची गरज आहे असेही अजितदादा यावेळी म्हणाले.

मला जगातील भाग्यवान दादा आणि भाऊ बनविले, काय म्हणाले अजितदादा
अजित पवार
Follow us
| Updated on: Oct 15, 2024 | 3:09 PM

लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्षे सुरु राहणार आहे. परंतू महायुतीला पुन्हा निवडून आणले जनतेच्या हातात आहे. भावासाठी देखील योजना आणल्या आहेत. तुमच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी उद्याची निवडणूक महत्वाची आहे. मला जगातील भाग्यवान दादा आणि भाऊ बनविले आहे. तुम्ही दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आहे. दादाचा वादा राहील,मी शब्दाचा पक्का आहे. माझ्या कार्यकाळातील आजची ही शेवटची सभा आहे. उद्यापासून पक्षाचा प्रमुख म्हणून फिरणार आहे असे नाशिक येथे आलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

अजितदादा पुढे म्हणाले की माझ्या माहितीप्रमाणे आज आचारसंहिता जाहीर होईल. उद्याचा महाराष्ट्र कोणाच्या हातात द्यायचे हे महाराष्ट्रातील जनता ठरवणार आहे. तुलसी विवाह नंतर मतदानाचा दिवस येईल. सरकारी कार्यक्रम 3 नंतर घेता येणार नाही. म्हणून सकाळची वेळ दिली आहे. मी सात वेळा निवडून आलो आहे. जाती पाती आणि नात्या गोत्याचे राजकारण कधी केले नाही. देवळीला मी करोडो रुपयांचा निधी द्यायला यशस्वी झालो आहे. दुपारी 3 वाजायच्या आत इतर मतदार संघातील पैसे दिले जातील काळजी करू नका, तशा सूचना दिल्या आहे असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

महायुतीचे सरकार आणा, दिवसाची वीज येईल

विजेचा लपंडाव सुरू असल्याच्या तक्रारी आल्या होत्या मी रात्रीतून मिटिंग लावली. नाशिकच्याच शेतकऱ्यांवर अन्याय का ? विचारलं त्यांना असेही अजित पवार यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की सुशीलकुमार शिंदे यांनी शेतकऱ्यांना 0 चे वीज बिल दिले, विलासरावांनी वीज बिल दिले होते, मी विचारलं होते असे का करताय ? पण आता आपण देखील 0 चे बिल देतोय. कारण शेतकरी जगला तर राज्य जगेल, शेतकरी मोडला तर राज्य मोडेल असेही अजित पवार यावेळी म्हणाले. आपण दुधाला अनुदान देतोय, 35 रुपये गाईच्या दुधाला भाव दिला आहे. कांद्यावरील निर्याद बंदी उठवली. तुम्ही महायुतीचे सरकार आणा, दिवसाची वीज येईल, रात्रीचं शेतात जावे लागणार नाही, त्यामुळे बिबट्याची भीती राहणार नाही. आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, सोलरवर वीज करता येते म्हणून वीज बिले माफ केले आहे. 2 ते 3 दिवस जाऊ द्या विजेची अडचण येऊ देणार नाही असेही अजितदादा यावेळी म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.