लाडकी बहीण योजनेसाठी बँकेत नवीन खाती उघडावे लागणार का? प्रशासनाने दिले महत्वाचे स्पष्टीकरण
ladki bahin yojana: मुख्यमंत्री बहीण लाडकी योजनेच्या बाबत नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत नवीन खाते उघडण्याची गरज नाही. योजनेचा लाभ घेतांना बँक खात्यात डिपॉझिटही करण्याचीही गरज नाही. तुमच्या बँकेच्या सध्याच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.
महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पात राज्यातील महिलांना मोठे गिफ्ट दिले. अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेचा लाभ १ जूनपासून देण्यात येणार आहे. राज्यातील पात्र महिलांना महिन्याला १ हजार ५०० रुपये म्हणजेच वर्षाला १८ हजार रुपये मिळणार आहे. त्यासाठी नाव नोंदणी ऑनलाईन होणार आहे. शासनाने या योजनेसाठी काही कागदपत्रे आणि अटी निश्चित केल्या आहेत. योजनेतील महत्वाची अट लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे, ही आहे. या योजनेसंदर्भात अनेक अफवाही निर्माण केल्या जात आहेत. त्यामुळे त्यावर स्पष्टीकरण देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. योजनेसाठी बँकेत खाती नव्याने उघडण्याची गरज नाही. तुमचे सध्या चालू असलेल्या खात्यात पैसे जमा होणार असलल्याचे नाशिकच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
बँकेसंदर्भात असे दिले स्पष्टीकरण
मुख्यमंत्री बहीण लाडकी योजनेच्या बाबत नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत नवीन खाते उघडण्याची गरज नाही. योजनेचा लाभ घेतांना बँक खात्यात डिपॉझिटही करण्याचीही गरज नाही. तुमच्या बँकेच्या सध्याच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. यासंदर्भात अफवा पसरवणारे आणि अर्ज करताना एजंट आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी म्हटले आहे. प्रत्येक सेतू केंद्रावर शासकीय अधिकारी नेमण्याचा सूचना त्यांनी केल्या आहेत. सर्व बँकांना आणि केंद्रांना नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत निर्देश दिले आहे.
कोणाला मिळणार लाभ
- लाभार्थी महिलेचे वय 21 वर्षे पूर्ण झालेले असावे. 65 वर्षापर्यंतच्या महिलांना त्याचा लाभ घेता येईल.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे.
- महिला ही महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावी
- राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
- लाभार्थी महिलेचे बँकेत खाते हवे
कोणती कागदपत्रे लागणार
- ऑनलाईन अर्ज.
- आधार कार्ड.
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
- सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला
- बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- रेशनकार्ड.
- योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.