Lad ki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे कधी मिळणार? फडणवीसांची सभागृहातून गुड न्यूज, अखेर तारीख समोर

लाडकी बहीण योजनेंतर्गत आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात पाच हपते जामा करण्यात आले आहेत, मात्र आता डिसेंबरचा हपता कधी जमा होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

Lad ki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे कधी मिळणार? फडणवीसांची सभागृहातून गुड न्यूज, अखेर तारीख समोर
Follow us
| Updated on: Dec 19, 2024 | 3:16 PM

अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. ही एक सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर जुलैपासून लगेचच या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. जुलैपासूनचे ते नोव्हेंबरपर्यंतचे पाच हापते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र आता डिसेंबरचा हपता सरकार कधी जमा करणार? खात्यामध्ये पैसे किती जमा होणार? 1500 की 2100 याकडे आता सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे, या सर्व प्रश्नांची उत्तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सभागृहात दिली आहेत.

नागपुरात हिवाळी अधिवेश सुरू आहे. यावेळी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर देखील हल्लाबोल केला. आम्ही जी आश्वासनं दिली आहेत, ती आम्ही पूर्ण करणार आहोत. कुणीही मनात शंका ठेऊ नये. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, असं फडणवीस यांनी यावेळी सभागृहात म्हटलं.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?  

आमची एकही योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की या योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नाहीयेत.  आपण ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे देत आहोत.

काय आहेत लाडकी बहीण योजनेचे निकष? 

अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली. ज्या कुटुंबाचंं आर्थिक उत्पन्न कमी आहे, अशा महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.  ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे वर्षाला अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही योजना 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे.  निकष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक अर्जदार महिलेला या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात आतापर्यंत दर महिन्याला 1500 याप्रमाणे पाच हपते जमा झाले आहेत.

'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.