Thane Land Slide Video : ठाण्यातील मुंब्रा बायपासवर दरड कोसळली, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

घटनास्थळी सहाय्यक आयुक्त मुंब्रा प्रभाग समिती, कार्यकारी अभियंता, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, 1 रेस्क्यू वाहन आणि 1 फायर वाहनासह उपस्थित असून दरडीला बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

Thane Land Slide Video : ठाण्यातील मुंब्रा बायपासवर दरड कोसळली, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
ठाण्यातील मुंब्रा बायपासवर दरड कोसळलीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 8:45 PM

ठाणे : ठाण्यातील मुंब्रा बायपास रोड (Mumbra Bypass Road)वर दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्या (Land Slide)ची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी (Casualty) किंवा दुखापत झाली नाही. आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार पनवेलकडून ठाण्याकडे येणारी वाहिनी, मुंब्रा बायपास जवळ टोल नाकापुढे दरड कोसळली आहे. घटनास्थळी सहाय्यक आयुक्त मुंब्रा प्रभाग समिती, कार्यकारी अभियंता, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, 1 रेस्क्यू वाहन आणि 1 फायर वाहनासह उपस्थित असून दरडीला बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

दरड कोसळल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाने एक लेन बंद ठेवत रेस्क्यू कार्य सुरु केलं आहे. गेल्या चार दिवसापासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचत आहे. नदी-नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. तसेच दरड कोसळण्यासारख्या दुर्घटनाही घडत आहेत.

चिपळूणमध्ये कुंभार्ली घाटात दरड कोसळली

मुसळधार पावसामुळे चिपळूणमधील कुंभार्ली घाटातही दरड कोसळली आहे. वाहतूक एकेरी चालू आहे. रत्नगिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे डोंगरातून पाणी वाहत असते. यामुळे घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. कुंभार्ली घाटसुद्धा धोकादायक बनला आहे.

राजापूरमध्ये अर्जुना धरणाचा उजवा कालवा फुटला

सोमवारपासून मुसळधार पावसाने जोर धरला आहे. यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होत आहे. जगबुडी आणि काजळी या दोन मोठ्या नद्यांनी काल सोमवारीच इशारा पातळी ओलांडली आहे. दरम्यान, हवामान खात्याने कोकणात पुढील चार दिवस 8 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. संततधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना समोर येत असतानाच एक मोठी दुर्घटना घडली. पाचल कोडंवाडी (पवार वाडी) येथे अर्जुना धरणाचा उजवा कालवा फुटला. यामुळे शेतीचे मोठं नुकसान झाले आहे. गोविंद राजाराम पवार, विकास सदानंद पवार, गोपाळ सिताराम पवार या शेतकऱ्यांची भात शेती वाहून गेली. (Land slide on the Mumbra bypass road in Thane, fortunately no casualties)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.