कोलकात्यातून कोकणात, पर्यटकांची गर्दी वाढली, सिंधुदुर्ग सेलिब्रेशनसाठी सज्ज

यावर्षी कोरोनामुळे यंदाच्या पर्यंटन हंगामाला फटका बसला असला तरी, सरकारने आता पर्यटनाला परवानगी दिली आहे.

कोलकात्यातून कोकणात, पर्यटकांची गर्दी वाढली, सिंधुदुर्ग सेलिब्रेशनसाठी सज्ज
Follow us
| Updated on: Dec 25, 2020 | 2:25 PM

मुंबई : यावर्षी कोरोनामुळे यंदाच्या पर्यंटन हंगामाला फटका बसला असला तरी, सरकारने आता पर्यटनाला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता 2020 वर्षाला निरोप देण्यासाठी देशभरातून पर्यटक कोकणात दाखल होत आहेत. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागत साठी जिल्ह्यात दरवर्षी 10 ते 15 लाख पर्यटक येतात मात्र, यावर्षी कोरोनाच्या भीतीने पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. (Large crowd of tourists in Sindhudurg district on the occasion of Christmas)

आता पर्यंत फक्त पाच लाख पर्यटक दाखल झाले आहेत. मुंबई, कोलकाता या भागातून पर्यटक येथील समुद्र किनारी दाखल झाले आहेत. रेल्वे हा येथे येण्याचा सोयीचा मार्ग असल्याने सध्या रेल्वे स्टेशनवर सुद्धा गर्दी पहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग हे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे. येथील मालवण, वेंगुर्ला, देवगड या भागातील स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारे, तारकर्लीत होणार डाॅल्फीनचं दर्शन, सिंधुदुर्ग किल्ला तसेच नारळी पोफळीच्या बागा येथील मालवणी जेवण पर्यटनाच आकर्षण आहे.

kokan 2

ख्रिसमसच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात. याही वर्षी मुंबई, पुणे, नाशिक, बेळगाव, बेंगलोर आदी भागातून पर्यटक या ठिकाणी दाखल झाले आहेत. गोव्यात वाढती गर्दी लक्षात घेता पर्यटकांना गोव्याच्या जवळ असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उत्तम पर्याय असतो त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची मोठी वर्दळ असते. यावर्षी कोरोनाचा प्रभाव राहिल्याने पर्यंटकांचा ओघ कमी झाला आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे सावट असले तरी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल दाखल झाले असून कोरोनाचे नियमपाळून पर्यंटनांचा आनंद घेत आहेत. यावर्षीचा 31 डिसेंबर साजरा करण्याचा जोश असला तरी त्यात कोरोनाची भीती मात्र, नक्कीच आहे.

संबंधित बातम्या : 

दापोलीत दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू, पोहण्याचा मोह बेतला जिवावर

भूमध्य समुद्रात बोट दुर्घटना, 74 जण बुडाले, लिबियानं स्थलांतरितांविषयी धोरण बदलाव: संयुक्त राष्ट्र

(Large crowd of tourists in Sindhudurg district on the occasion of Christmas)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.