देशातील सर्वात मोठा घोड्यांचा बाजार कुठे भरला?
उदयपुर येथील राजेशाही घराण्यात खास वाढलेल्या घोड्याचा वंश असलेली घोडी या घोडे बाजारात दाखल झालेली होती.
येवला, नाशिक : देशातील सर्वात मोठा घोड्यांचा बाजार आज नाशिकच्या येवला (Nashik Yeola) येथे भरविण्यात आला होता. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) आवारात हा बाजार भरविण्यात आला होता. येवला येथे भरविण्यात आलेला घोडे बाजाराचे (Horse Market) खास वैशिष्टे आहेत. इतिहासकालीन असलेला हा घोडेबाजार तीनशे वर्षापूर्वी सुरुवात झाली होती. येवला शहराचे संस्थापक राजे रघुजी बाबा शिंदे यांच्या पुढाकाराने हा बाजार भरविण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात हा घोडे बाजार प्रसिद्ध आहे. विविध राज्यातील व्यापारी आणि खरेदीदार या बाजारात सहभागी होत असतात त्यामुळे बाजार समितीच्या अर्थकारणाला अधिकचा हातभार लागत असतो. यंदाच्या घोडे बाजार काही खास वैशिष्टे देखील होते.
उदयपुर येथील राजेशाही घराण्यात खास वाढलेल्या घोड्याचा वंश असलेली घोडी या घोडे बाजारात दाखल झालेली होती.
या घोडीची किंमत तब्बल 61 लाख रुपये लावण्यात आली होती. 61 लाखांची घोडी आहे तरी कशी हे पाहण्यासाठी मोठी गर्दी झालेली होती.
नाशिक जिल्ह्यातील येवला येथील घोडे बाजार प्रसिद्ध असून पंजाब,गुजरात, मध्यप्रदेश, हरियाणा यांसह देशातील विविध राज्यातील विक्रेते आणि खरेदीदार यांच्यासह व्यापारी सहभागी झाले होते.
या घोड्यांच्या बाजारात विविध प्रजातीचे घोडे आणलेले असतात. त्यात शर्यतीचे घोड्यांची संख्या जास्त असते. याशिवाय इतिहासाशी संबंधित असलेले घोड्यांचे वंशज प्रामुख्याने येथे बघायला मिळतात.
पाच लाखांपासून सत्तर लाखा रुपये किंमतीचे घोडे या बाजारात आणलेले असतात. त्यामुळे असे घोडे खरेदी किंवा विक्री करण्याची मोठी संधी महाराष्ट्रातील घोडेप्रेमींना मिळत असते.