Shiv Sena Symbol Hearing LIVE : पुढील सुनावणी 30 जानेवारीला, आता थेट निकालच येणार?
uddhav thackeray vs eknath shinde Live updates : शिवसेनेचं नाव आणि चिन्हावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात महत्त्वाची सुनावणी पार पडली . ठाकरे गटाचे मुख्य वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला.
मुंबई: शिवसेनेचं नाव आणि चिन्हावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात महत्त्वाची सुनावणी पार पडली . ठाकरे गटाचे मुख्य वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. पक्षाची घटना, राष्ट्रीय पक्ष कार्यकारिणी, प्रतिनिधी सभा अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. कामत यांचा युक्तिवाद संपल्यानंतर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग यांनी युक्तिवाद केला. दोन्ही गदाची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने दोन्ही गटांना येत्या सोमवारी लेखी उत्तर देण्याची सूचना केली. या प्रकरणाची पुढील सुवानणी आता 30 जानेवारीला होईल, असं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. पण दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आता संपला आहे. त्यामुळे येत्या 30 जानेवारीला निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
‘शिंदे गटाचे मुद्दे आम्ही खोडून काढले’, अनिल परब यांची प्रतिक्रिया
अनिल परब यांची प्रतिक्रिया :
शिंदे गटाचे मुद्दे आम्ही खोडून काढले आहेत
पक्ष म्हणजे आमदार खासदार नसून राष्ट्रीय कार्यकारिणी पण असते हे आम्ही सांगितलंय.
सादिक केसचा आणि या केसचा वेगळा संदर्भ आहे
पक्षाच्या कार्यकारिणीत उद्धव ठाकरे हेत पक्ष प्रमुख आहेत.
घटनेत बदल केलेले साल २०१८ नंतर २०२२ पर्यंत कोणताही वादग्रस्त मुद्दा शिंदेंनी दाखवला नाही
धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच
-
निहार ठाकरे यांची प्रतिक्रिया
प्रतिनिधी सभेतील सदस्यच नाहीत तर लोकप्रतिनिधी देखील महत्त्वाचे असतात, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे वकील निहार ठाकरे यांनी दिली
-
-
सुनावणीनंतर राहुल शेवाळे यांची प्रतिक्रिया
दोन्ही गटाकडून युक्तिवाद झालाय, येत्या 30 तारखेला लेखी उत्तर दिलं जाईल, पक्षाच्या घटनेवर युक्तिवाद झाला, लोकप्रतिनिधी गरजेचे आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार राहुल शेवाळे यांनी दिली
-
पुढील सुनावणी 30 जानेवारीला
पुढील सुनावणी 30 जानेवारीला
केंद्रीय निवडणूक आयोगाची महत्त्वाची घोषणा
-
मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद संपला
शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद संपला
निवडणूक आयोग काय म्हणतं? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
केंद्रीय निवडणूक आयागाने दोन्ही गटांना येत्या सोमवारी लेखी उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे सोमवारी दोन्ही गटाचे उत्तर आल्यानंतर आयोग निकालासाठी तारीख देण्याची शक्यता
-
-
शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद सुरु
शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद सुरु
लोकसभा आणि विधानसभा सदस्यसंख्या बघता चिन्ह आम्हाला द्यावा, महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला होता
प्रतिनिधी सभा नाही तर लोकप्रतिनिधी सभा महत्त्वाची, असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला होता
-
शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद संपला
शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद संपला
जवळपास १६ मिनिटे जेठमलानी यांचा युक्तिवाद झाला
निवडणूक आयोगाचे आयुक्त आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु
-
मुख्यनेतापद कायदेशीर आहे, जेठमलानी यांचा युक्तिवाद
मुख्यनेतापद कायदेशीर आहे, एकनाथ शिंदे यांच्या बंडाने पक्षात दोन फूट पडली आहे, जेठमलानी यांचा युक्तिवाद
आम्ही पक्षाच्या घटनेचं पालन केलेलं आहे, जेठमलानी यांचा युक्तिवाद
-
शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांचा युक्तीवाद सुरु
शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांचा युक्तीवाद सुरु
जेठमलानी दहा मिनिटात युक्तिवाद संपवणार, अशी सूत्रांकडून माहिती
दोन्ही गटाचा युक्तिवाद आजच संपण्याची शक्यता
-
‘शिवसेना कुणाची? यावर प्रश्न उद्भवतच नाही’, आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? यावर प्रश्न उद्भवतच नाही, शिवसेना आमचीच आहे, याबद्दल मी सविस्तर बोलेन, आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया
-
शिंद गटाकडूनही युक्तिवाद केला जाणार
ठाकरे गटानंतर आता शिंद गटाकडूनही युक्तिवाद केला जाणार
उद्धव ठाकरेंनी मविका कशी बनवली? असा सवाल जेठमलानी युक्तिवाद करणार असल्याची माहिती समोर आलीय
-
केंद्रीय निवडणूक आयोगात महेश जेठमलानी आणि देवदत्त कामत यांच्यात जोरदार वाद
प्रतिनिधी सभा ही फक्त तुमच्याचकडे कशी होऊ शकते? शिंदे गटाचे मुख्य वकील महेश जेठमलानी यांचा सवाल
महेश जेठमलानी आणि देवदत्त कामत यांच्यात जोरदार वाद
केंद्रीय निवडणूक आयोगातच दोन्ही मोठ्या वकिलांमध्ये वाद
वादानंतर निवडणूक आयुक्तांची मध्यस्थी
याचिकेत आहे तेवढंच बोला – जेठमलानी
मी माझ्या पद्धतीने बोलणार – कामत
-
एकनाथ शिंदे यांचं मुख्य नेतापद बेकायदेशीर, ठाकरे गटाच्या वकिलांचा मोठा युक्तिवाद
एकनाथ शिंदे यांचं मुख्य नेतापद बेकायदेशीर, ठाकरे गटाच्या वकिलांचा मोठा युक्तिवाद
मुख्य नेतेपद हे पक्षाच्या घटनेत नाही, मुख्य नेतापद हे घटनेत नाही. त्यामुळे ते पद बेकायदेशीर, ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद
-
राजकीय पक्ष म्हणून आमचं संख्याबळ विचारात घ्यावं, ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद
राजकीय पक्ष म्हणून आमचं संख्याबळ विचारात घ्यावं, प्रतिनिधींचा विचार करता आमच्याकडे संख्याबळ जास्त, देवदत्त कामत यांचा युक्तिवाद
पक्ष संघटनात्मक संख्याबळ आणि लोकप्रतिनिधींची संख्याबळ यात फरक आहे. त्यामुळे सादिक अली केस या प्रकरणात लागू होत नाही, देवदत्त कामत यांचा युक्तिवाद
शिंदे गटाच्या संख्ये इतकाच ठाकरे गटाचं संख्या हे तुल्यबळ आहे. राजकीय पक्षाचं संख्याबळ ठाकरेंकडे आहे, कामत यांचा युक्तिवाद
मुख्य नेतेपद हे पक्षाच्या घटनेत नाही, मुख्य नेतापद हे घटनेत नाही. त्यामुळे ते पद बेकायदेशीर, कामत यांचा युक्तिवाद
-
ठाकरे गटाकडून देवदत्त कामत यांच्याकडून युक्तिवाद सुरु
शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद सुरु करताच केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना थांबवलं. आधी ठाकरे गटाचा युक्तिवाद होऊ द्या, असं आयोगाने म्हटलं
ठाकरे गटाकडून देवदत्त कामत यांच्याकडून युक्तिवाद सुरु
पक्ष ठाकरेंकडेच आहे, देवदत्त कामत यांचा युक्तिवाद
-
आता शिंदे गटाचा युक्तिवाद सुरु
आता शिंदे गटाचा युक्तिवाद सुरु
शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्याकडून युक्तिवादाला सुरुवात
-
अजून कितीवेळ युक्तिवाद चालणार? निवडणूक आयोगाचा कपिल सिब्बल यांना सवाल
अजून कितीवेळ युक्तिवाद चालणार? निवडणूक आयोगाचा कपिल सिब्बल यांना सवाल
अजून मला काही वेळ युक्तिवाद करायचा आहे, मला अजून काही मुद्दे मांडायचे आहेत, कपिल सिब्बल यांचं उत्तर
कपिल सिब्बल यांचा गेल्या एक तासांपासून युक्तिवाद सुरु
-
शिंदे गटाच्या याचिकेत खोटी विधाने, हा वाद संसदीय कार्यपद्धतीची थट्टा, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
ठाकरे गटच खरी शिवसेना, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
शिंदे गटाच्या याचिकेत खोटी विधाने, हा वाद म्हणजे संसदीय कार्यपद्धतीची थट्टा, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
प्रतिनिधी सभा आमच्या बाजूने, प्रतिनिधी सभाच पक्ष चालवते, पक्ष सोडून गेलेले सदस्य सभेचा भाग होऊ शकत नाही, कपिल सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद
आम्ही सर्व कारभार प्रतिनिधी सभाच्या माध्यमनातून करतो, त्यामुळे सभा आमच्या बाजूने, प्रतिनिधी सभाच्या कार्यकारिणीसाठी मुदतवाढ द्या, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
प्रतिनिधी सभेला जितके अधिकार आहेत तितके अधिकार कुणालाच नाही, कपिल सिब्बल यांची माहिती
प्रतिनिधी सभेचे अधिकार कुणालाही नाही, शिंदे गट प्रतिनिधी सभा होऊ शकत नाही, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
आमचे कागदपत्रे योग्य आहेत, शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये चुका, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
-
शिवसेना पक्षात फूट म्हणता येणार नाही, कपिल सिब्बल यांचा दावा
शिवसेना पक्षात फूट म्हणता येणार नाही, कपिल सिब्बल यांचा दावा
लोकशाहीनुसार म्हणणं मांडायला हवं होतं, गुवाहाटीला का गेले? कपिल सिब्बल यांचा सवाल
पक्षाला बोलावलेल्या सभेत शिंदे गट उपस्थित नव्हते, सिब्बल यांचा दावा
शिंदे गट राजकीय पक्ष नाही, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
प्रतिनिधी सभा, राष्ट्रीय कार्यकारिणीची सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगात केलेली आहे. पण शिंदे गटाने ती केलेली नाही. त्यामुळे शिंदे गट राजकीय पक्ष नाही. त्यांनी निवडणूक आयोगात कोणतीही पूर्तता केलेली नाही. त्यामुळे शिंदे गट स्वत:ला राजकीय पक्ष म्हणत असेल तरी शिंदे गट राजकीय पक्ष नाही, कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
पक्षाबद्दल सर्व बाबींची पूर्तता आम्ही केलेली आहे, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार शिवसेनेच्या सर्व प्रक्रिया, कपिल सिब्बल यांचा दावा
-
शिंदे गटाच्या 61 पैकी 28 जिल्हाप्रमुखांचा प्रतित्रापत्र पोहोचलेच नाहीत, कपिल सिब्बल यांचा दावा
शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये कमतरता, सादर केलेल्या 61 पैकी 28 जिल्हाप्रमुखांची प्रतिज्ञापत्रे नाहीत, कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद
शिंदे गटाचा जिल्हाप्रमुखांच्या प्रतिज्ञापत्रकचा दावा चुकीचा, कपिल सिब्बल यांचा दावा
-
ठाकरे गटाची कार्यकारिणी बरखास्त होऊ शकरत नाही, कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद
ठाकरे गटाची कार्यकारिणी बरखास्त होऊ शकरत नाही, ती पक्षाच्या घटनेप्रमाणे तयार करण्यात आलेली आहे, कपिल सिबब्ल यांचा युक्तिवाद
राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भात प्रतिज्ञापत्र आयोगाला दिली, शिंदेंची प्रतिज्ञापत्र तपासून पाहा, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
शिंदे गटाच्या प्रतिज्ञापत्रांवर सिब्बल यांचा आक्षेप
राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ द्या, ठाकरे गटाची निवडणूक आयोगात मागणी, कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
राष्ट्रीय कार्यकारिणी घटनेनुसार, या कार्यकारिणीला मुदतवाढ दिली तर पक्षप्रमुख पदाची मुदत वाढेल, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये कमतरता, सादर केलेल्या 61 पैकी 28 जिल्हाप्रमुखांची प्रतिज्ञापत्रे नाहीत, कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद
-
ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगात दोन अर्ज दाखल
ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगात दोन अर्ज दाखल
आम्हाला प्रतिनिधी सभा घेऊ द्या आणि नेता निवडीसाठी ठाकरे गटाकडून अर्ज
राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्यासोबत आहे, राष्ट्रीय कार्यकारिणीकडून पक्ष नेत्याची निवड होऊ शकते, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
शिंदे गटाने नेमलेली राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीर, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
एकनाथ शिंदे यांना पक्षाची घटनाच मान्य नाही, मग एकनाथ शिंदे यांची नेतेपदाची शपथ कोणत्या आधारावर? कपिल सिब्बल यांचा सवाल
-
कपिल सिब्बल यांनी शिवसेना पक्षाच्या घटनेची माहिती आयोगाला दिली
कपिल सिब्बल यांनी शिवसेना पक्षाच्या घटनेची माहिती पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला दिली
शिवसेनेची घटना ही कायदेशीर नाही हे शिंदे गट कोणत्या आधारावर म्हणत आहे? कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगात सवाल
एकनाथ शिंदे यांनी नेतेपद घेतलं तेव्हा त्यांनी नेतेपदाची शपथ कोणत्या आधारावर घेतली होती? कपिल सिब्बल यांचा सवाल
उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाची 23 जानेवारीला मुदत संपतेय, आम्हाला प्रतिनिधी सभा घ्यायला परवानगी द्या, कपिल सिब्बल यांची निवडणूक आयोगाकडे मागणी
-
केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणीला सुरुवात
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल दाखल होताच केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणीला सुरुवात
कपिल सिब्बल युक्तीवादासाठी जवळपास दहा मिनिटे उशिरा आले
-
अखेर ठाकरे गटाचे मुख्य वकील कपिल सिब्बल निवडणूक आयोगात दाखल
अखेर ठाकरे गटाचे मुख्य वकील कपिल सिब्बल निवडणूक आयोगात दाखल
आता लवकरच धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावावर सुनावणी सुरु होणार
-
ठाकरे गटाचे मुख्य वकील अजूनही पोहोचले नाहीत
ठाकरे गटाचे मुख्य वकील कपिल सिब्बल अजूनही निवडणूक आयोगात दाखल झालेले नाहीत
कपिल सिब्बल यांनीच वेळ वाढवून मागितला आहे
असं असताना ते अद्याप सुनावणीसाठी आलेले नाहीत
कपिल सिब्बल पुढच्या काही मिनिटात सुनावणीसाठी दाखल होण्याची शक्यता
-
‘…तर या निकालाला काहीच अर्थ राहणार नाही’, उल्हास बापट यांची महत्त्वाची प्रतिक्रिया
– घटनातज्ञ उल्हास बापट यांची धनुष्यबाणाच्या सुनावणीवर महत्त्वाची प्रतिक्रिया
– ‘सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी निवडणूक आयोगाने आजच्या निकालाला काही अर्थ रहाणार नाही’
– ‘त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालात 16 आमदार अपात्र होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या निकालानंतर निवडणूक आयोगाने निकाल द्यावा’
– ‘उद्धव ठाकरे गटाकडे संघटनात्मक संख्याबळ जास्त आहे तर विधानभवनात शिंदे गटाचे अधिक संख्याबळ आहे, त्यामुळे या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊनच निवडणूक आयोग आजचा निकाल देणार’
– ‘उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा मुद्दा खूप गुंतागुंतीचा आहे’, उल्हास बापट यांची प्रतिक्रिया
-
धनुष्यबाणाची सुनावणी आता 4 वाजता
धनुष्यबाणावरची सुनावणी आज दुपारी तीन वाजता सुरु होणार होती
ही सुनावणी अर्धा तास पुढे ढकलण्यात आली होती
त्यानंतर आता ही सुनावणी आणखी अर्धा तास पुढे ढकलण्यात आली
धनुष्यबाणावरील महासुनावणी आता थेट 4 वाजता होणार
-
धनुष्यबाण चिन्हावरील सुनावणी
देवदत्त कामत, अमित तिवारी, देवयानी गुप्ता हे ठाकरे यांची बाजू मांडणार
निवडणूक आयोगात ठाकरे गटाकडून वकिलांची फौज
शिवसेना पक्ष, धनुष्यबाणावर सुनावणी लवकरच सुरू होणार
शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग आयोगात दाखल
शिंदे गटाचे वकील अपराजिता निवडणूक आयोगात दाखल
अनिल परब, अनिल देसाई निवडणूक आयोगात दाखल
-
शिंदे आणि ठाकरे गटाचे वकील केंद्रीय निवडणूक आयोगात दाखल
नवी दिल्ली :
शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग केंद्रीय निवडणूक आयोगात दाखल तर ठाकरे गटाकडून देवदत्त कामत, अमित तिवारी, देवयानी गुप्ता निवडणूक आयोगात दाखल आज निर्णय येऊ शकतो, अशी ठाकरे गटाला आशा
-
धनुष्यबाण चिन्हावरील सुनावणी
ठाकरे गटाचे नेते निवडणूक आयोगात दाखल
निवडणूक आयोगात थोड्याच वेळात सुनावणी
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद महत्त्वाचा
शिंदे गटाचे वकील निहार ठाकरे निवडणूक आयोगात दाखल
ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई निवडणूक आयोगात दाखल
-
‘ऐतिहासिक निर्णय येईल’, अनिल देसाई यांचं विधान
धनुष्यबाणावरील सुनावणीआधी ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांचं मोठं विधान
ऐतिहासिक निर्णय येईल, अनिल देसाई यांचं विधान
-
ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दिशेला रवाना
ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दिशेला रवाना
ठाकरे गटाचे अनेक वकील सुनावणीसाठी हजर राहणार असल्याची शक्यता
-
IND vs NZ: न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीजमध्ये रोहित ‘या’ खेळाडूला आता बेंचवर बसवणार?
IND vs NZ: सहसा विजयी टीम रोहित शर्मा बदलत नाही. पण दुसऱ्या वनडेसाठी टीम इंडियात आता एका खेळाडूच खेळणं कठीण दिसतय. हा खेळाडू न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या मॅचमध्ये फ्लॉप ठरला होता. वाचा सविस्तर….
-
बृजभूषण शरण सिंह यांचा राजीनामा देण्यास नकार
बृजभूषण म्हणाले, माझ्या समर्थनार्थ अनेक खेळाडू
मी तोंड उघडले तर त्सुनामी येणार
मुष्टीयुद्धा विजेंदर सिंह आंदोलनस्थळी
-
शिवसेनेच्या आजच्या सुनावणीत ट्विस्ट, ठाकरे गट मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखल देत युक्तीवाद करणार?
नवी दिल्ली :
शिवसेनेचं नाव आणि चिन्हावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होत आहे. ही सुनावणी आज दुपारी तीन वाजता सुरु होणार होती. पण काही तांत्रिक कारणास्तव ही सुणावणी अर्धा तास पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हावरील सुनावणी आता साडेतीन वाजता सुरु होणार आहे
आजची सुनावणी फार महत्त्वाची आहे. कारण साडेतीन वाजता ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालच्या कार्यक्रमाचा दाखल देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे कपिल सिब्बल काय युक्तीवाद करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
IPL 2023 साठी MS Dhoni उतरला मैदानात, सुरु केली मेहनत पहा VIDEO
IPL 2022 च्या सीजनमधील अपयश पुसून काढण्याची मोठी जबाबदारी धोनीच्या खांद्यावर आहे. वाचा सविस्तर….
-
IND vs AUS – नागपूरच्या विकेटवर काहीही होऊ शकतं, गुजरात-विदर्भ सामन्यात अनपेक्षित घडलं, सर्वांसाठीच धक्कादायक
IND vs AUS – नागपूरच्या विकेटवर जे झालय, तो टीम इंडियासाठी मोठा अलर्ट आहे. वाचा सविस्तर….
-
Ranji Trophy मध्ये एका मोठ्या टीमला फक्त 73 धावांच टार्गेट झेपलं नाही, विदर्भाच्या बॉलर्सची कमाल
Ranji Trophy मधील धक्कादायक निकाल, जिंकायचा सामना या टीमने हरला. रणजी ट्रॉफी स्पर्धेत एक नवीन रेकॉर्ड झालाय. दुसऱ्या इनिंगमध्ये या बॉलरने 6 विकेट काढल्या. वाचा सविस्तर….
-
वडिल कारपेंटर, क्रिकेटसाठी संघर्ष, आता मुलीने भारताला मिळवून दिला मोठा विजय
कोण आहे ही उदयोन्मुख क्रिकेटपटू? वाचा सविस्तर….
-
पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून कुरियर कंपनीला ब्लॅकमेल करणारा अटकेत
आरोपीने मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी असल्याचं सांगून कुरियर कंपनीकडून 14 लाख 36 हजार उकळले
मुंबई पोलिसांच्या पश्चिम प्रादेशिक सायबर विभागाने आरोपीला अटक केलीय
कुरियर कंपनीने तैवानमध्ये कुरियरच्या माध्यमातून ड्रग्स पाठवले असल्याने त्यांच्याविरोधात सीबीआय तपास करत आहे
माझ्याकडे पुरावे आहेत अस सांगून आरोपीने रक्कम उकळली होती
कुरियर कंपनीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केलीय
-
नसीब मुल्ला हे कधी पक्ष सोडणार नाहीत, जितेंद्र आव्हाड यांचा खुलासा
शकुनी मामाला असे असे डाव करायचे असतात
नरेश म्हस्के यांनी याआधी सांगितलं होतं या मुसलमान माणसाला ठाण्याचा महापौर करायचे का?
मुंबईतील लोक ठरवतील ठाण्याचा महापौर कोण होणार याची भीती शिंदे गटाला आहे
येणाऱ्या काळात ठाण्यातील महापौर नेमका कोणाचा असेल हे पाहा
-
नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन
नागपुरातील आंबेडकर स्मारक, महागाईसह वेगवेगळ्या मुद्यांना घेऊन करण्यात आलं आंदोलन
कार्यकर्त्यांनी आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा केला प्रयत्न
पोलिसांनी कार्यकर्त्यांना थांबवलं असता कार्यकर्ते आणि पोलिसांत झटपट झाली
-
एअर इंडियाच्या विमानात महिलेवर लघुशंका केल्याचं प्रकरण
नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल DGCA ने एअर इंडियाला ठोठावला दंड
30 लाख रुपयांचा ठोठावला दंड
घटनेप्रसंगी विमानात असलेल्या पायलटचा परवाना तीन महिन्यांसाठी केला निलंबित
फ्लाइट सर्व्हिसेसच्या संचालकांवरही ठोठावला तीन लाख रुपयांचा दंड
-
महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचे आज बक्षीस वितरण
विजेत्याला रोख ५ लाखांचे बक्षीस, थार गाडी
उपविजेत्याला ट्रॅक्टर व रोख अडीच लाख रुपयांचे बक्षीस
शिवराज राक्षे ठरला महाराष्ट्र केसरी
-
सांगली – मिरज पाडकाम प्रकरण अपडेट
सांगली : तहसीलदारांनी मिळकतदारांसह तक्रारदारांना दुपार पर्यंतची दिली मुदत,
आपल्याकडील मालकी कागदपत्र सादर करण्यासाठी दुपारपर्यंत दिली मुदत,
सायंकाळी पाच वाजता तहसीलदार याच्या समोर होणार अंतिम सुनावणी ला सुरवात.
-
कुस्ती महासंघाला क्रीडा मंत्रालयाकडून अल्टिमेटम
कुस्ती महासंघाला 72 तासांच अल्टिमेटम
72 तासात कुस्ती महासंघाला क्रीडा मंत्रालयात स्पष्टीकरण द्यावे लागणार
आज दुपारी 3 वाजता कुस्ती महासंघ क्रीडा मंत्रालयाकडे स्पष्टीकरण देण्याची शक्यता
-
MBBS विद्यार्थीनीची हत्या झाल्याचा खुलासा
सदिच्छा साने या MBSS विद्यार्थीनीची हत्या झाल्याचे उघड
नोव्हेंबर २०२१ मध्ये झाले होते अपहरण
आरोपी मिथूसिंग याला केली अटक
आरोपीने दिली हत्येची कबुली
-
Virat Kohli सारखच ‘या’ पाकिस्तानी बॅट्समनने हॅरीस रौफल धुतलं, मॅच फिरवली VIDEO
9 सिक्स, 6 फोर, धुवाधार बॅटिंग, मैदानावर धावांचा पाऊस, एकदा VIDEO बघा. वाचा सविस्तर…
-
IND vs AUS- गर्लफ्रेंडने भररस्त्यात ऑस्ट्रेलियन माजी कर्णधाराच्या कानाखाली मारली, BCCI घेणार मोठा निर्णय
IND vs AUS- रस्त्यात जोडीदारासोबत भांडण ऑस्ट्रेलियन माजी कॅप्टनला महाग पडणार. 1 लाख डॉलर्सचा कॉन्ट्रॅक्ट रद्द होणार? वाचा सविस्तर….
-
परभणी जिल्ह्यात पुन्हा ठाकरे गटाला धक्का
मुंबई : शंभर कार्यकर्ते आज शिंदे गटात प्रवेश करणार,
दुपारी तीन वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार,
40 सरपंच शिंदे गटात प्रवेश करणार,
सरपंचांसह ठाकरे गटातील तालुकाप्रमुख आणि युवा सेनेचे पदाधिकारीही शिंदे गटात प्रवेश करणार,
बाजार समितीतील काही पदाधिकारीही शिंदे गटात प्रवेश करणार,
खासदार भावना गवळी यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश.
-
Kaviya maran यांची दक्षिण आफ्रिकेत चर्चा, सौंदर्यावर भाळला, थेट लग्नाची घातली मागणी
Kaviya maran यांच्या प्रेमात पडलेली दक्षिण आफ्रिकेतील ‘ही’ व्यक्ती कोण आहे? वाचा सविस्तर…
-
Entertainment News Live: रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने गाठला कमाईचा 50 कोटींचा टप्पा
‘वेड’ चित्रपटाने कमाईचा 50 कोटी रुपयांचा गाठला टप्पा
पहिला आठवडा- 20.18 कोटी रुपये
दुसरा आठवडा- 20.67 कोटी रुपये, वाचा सविस्तर..
-
सोलापुरात सत्यजित तांबे समर्थकाचा राजीनामा
काँग्रेस कमिटीच्या अनुसूचीत जाती विभागाच्या राज्य उपाध्यक्षांचा राजीनामा
अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर सत्यजीत तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई
-
संजय राऊत यांचा १२ किमी प्रवास
भारत जोडो यात्रेत संजय राऊत यांचा १२ किमी प्रवास
राहुल गांधी यांच्यांसोबत जम्मूत चालले पायी
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ३० जानेवारीला संपणार
-
भाजप सोडण्याचा विचार पंकजा मुंडेंच्या स्वप्नातही येत नाही- चंद्रशेखर बावनकुळे
पंकजा मुंडेंच्या रक्तात भाजप आहे- बावनकुळे
मी भाजपची सच्ची कार्यकर्ता- पंकजा मुंडे
कुठलीही खदखद नाही- पंकजा मुंडे
-
Entertainment News Live: ‘पठाण’ची जोरदार ॲडव्हान्स बुकिंग सुरू
गुरुवारी सकाळी 11.30 पर्यंत 1 लाख 17 हजार तिकिटं विकली गेली
PVR: 51 हजार तिकिटं
INOX: 38,500 तिकिटं
Cinepolis: 27,500 तिकिटं
आजपासून संपूर्ण देशातील ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात
-
महागड्या ईएमआयला लवकरच ब्रेक
महाग ईएमआयही लवकरच होणार कमी
केंद्रीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्या बुलेटिनमध्ये दिले संकेत
किरकोळ महागाई दरात दोन टक्क्यांहून अधिकची तफावत
गेल्या वर्षी डिसेंबर 2022 मध्ये हा दर 5.72 टक्क्यांवर
एप्रिल 2022 मध्ये चलनवाढीचा दर 7.79 टक्के
किरकोळ महागाईत अजून घसरणीचे संकेत
फेब्रुवारी महिन्यात मौद्रिक धोरण समितीची बैठक
बैठकीत रेपो दराबाबत होईल निर्णय
रेपो दरात कपात झाली नाही तर जैसे थे ठेवण्याचे राहिल धोरण
-
Nashik : संशयित स्वप्नील लवटे विरोधात गुन्हा दाखल, देवळाली गोळीबार प्रकरण
नाशिक – देवळाली गोळीबार प्रकरण ..
संशयित स्वप्नील लवटे विरोधात गुन्हा दाखल
स्वप्नील लवटे हा शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी सूर्यकांत लवटे यांचा मुलगा
पोलिसांनी स्वप्निल लवटे ला घेतले ताब्यात
शिवजन्मोत्सव बैठकीत झालेल्या वादातून केला गोळीबार
उपनगर पोलिसांनी केला गुन्हा दाखल
-
Entertainment News Live: शाहरुखच्या ‘पठाण’चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी चाहत्याने बुक केलं अख्खं थिएटर
शाहरुखच्या एका फॅन क्लबने ‘पठाण’च्या फर्स्ट डे फर्स्ट शोची सर्व तिकिटं बुक केली आहेत
मुंबईतल्या गेट्टी गॅलेक्सी थिएटरमधील सकाळी 9 वाजताची सर्व तिकिटं बुक, वाचा सविस्तर
-
आज केंद्रीय निवडणूक आयोगात धनुष्यबाण चिन्हावर महत्त्वपूर्ण सुनावणी
आज दुपारी 3 वाजता होणार सुनावणी
आज ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल सुरूवातीला करणार युक्तीवाद
गेल्या सुनावणीत ठाकरे गटानं दोन तासांचा वेळ मागितला होता वाढवून
आज कपिल सिब्बलानंतर महेश जेठमलानींचा युक्तिवाद
केंद्रीय निवडणूक आयोग आज निर्णय देणार का?
-
भारत जोडो यात्रेत राहुल प्रथमच जॅकेटमध्ये
नेहमी टि-शर्टमध्ये दिसणारे राहुल प्रथमच जम्मूत जॅकेटमध्ये
संजय राऊतही भारत जोडो यात्रेसाठी दिल्लीत
३० जानेवारीला सभा घेऊन यात्रेचा होणारा समारोप
फारूक अब्दुल्ला, पीडीपी प्रमुख महबूबा मुफ्ती भारत जोडोत येणार
-
PTC कंपनीत हिस्सेदारीसाठी टाटा-अदानींमध्ये स्पर्धा
पॉवर ट्रेडिंग कंपनी पीटीसी इंडियाचा (PTC India) शेअर वधारला
पीटीसीचा शेअरला सलग तीन दिवसांपासून अप्पर सर्किट
पीटीसी इंडियाच्या प्रमोटर कंपन्यांमध्ये चार कंपन्या
पीटीसी लिमिटेड, एनएचपीसी लिमिटेड यासह इतर दोन कंपन्या
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन यांचा समावेश
या सर्व कंपन्या त्यांची चार टक्के हिस्सेदारी विक्री करण्याच्या तयारीत
-
PMC Recruitment : पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील निम्मी पदे रिक्त
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील निम्मी पदे रिक्त
आरोग्य विभागात जवळपास 753 पदे रिक्त
एकूण 1600 मंजूर पदांपैकी 700 च्या वर पदे रिक्त
आरोग्य विभागात आवश्यक मनुष्यबळाची महापालिकेकडे कमतरता
आरोग्य विभागाच्या वर्ग १ ,२ ,२ या तिन्ही वर्गात मनुष्यबळ कमीच
आरोग्य विभागाची अनेक कामे रखडलेली
वैद्यकीय सुविधा देताना आरोग्य विभागाला अडचणी
अडचणी दूर करण्यासाठी टेंडर प्रक्रिया भरत अनेक कर्मचारी महापालिकेकडून भरती करण्यात येत आहेत
पण निम्म्यापेक्षा अधिक पदे अजूनही रिक्त
-
ब्रूजभूषण सिंह आज पत्रकार परिषद घेणार
उत्तर प्रदेश ब्रेकिंग : उत्तर प्रदेश मधल्या गोंडा मध्ये ब्रूजभूषण सिंह पत्रकार परिषद घेणार
कुस्तीपटूंच्या आरोपांनंतर ब्रिजभूषण सिंह काय उत्तर देणार ?
तमाम कुस्ती क्षेत्राचे सिंह यांच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष
-
आजचे पेट्रोल डिझेलचे दर काय?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर वधारले
ब्रेंट क्रूड ऑईल 1.18 डॉलर (1.39%) वधारले.
ब्रेंट क्रूडची आज 86.16 डॉलर प्रति बॅरलने विक्री
तर डब्ल्यूटीआई 0.47 डॉलरची (0.59%) वाढ
आज WTE 80.80 डॉलर प्रति बॅरलने विक्री
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
-
Badlapur News : मद्यधुंद कारचालकाने घरात घुसवली गाडी
मद्यधुंद कारचालकाने घरात घुसवली गाडी
बदलापूरच्या हेंद्रेपाड्यातील घटना
जीवितहानी नाही, मात्र घराचं मोठं नुकसान
-
KL Rahul मुळे त्याच्याकडे दुर्लक्ष, आता थेट डबल सेंच्युरी ठोकून सिलेक्टर्सना दिलं सडेतोड उत्तर
केएल राहुलमुळे त्याच करिअर धोक्यात आहे. त्याला संधी मिळत नाहीय. आता डबल सेंच्युरी ठोकून सिलेक्टर्सना दिलं सडेतोड उत्तर. वाचा सविस्तर….
-
WFI row: बैठकीत काय ठरलं? लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई होणार?
WFI row: कुस्तीच्या खेळात राजकारण? देशातील टॉप कुस्तीपटूंनी घेतली आक्रमक भूमिका. कुस्तीपटू गुरुवारी रात्री केंद्रीय क्रीडा मंत्र्यांची भेट घेतली. जवळपास चार तास ही बैठक चालली. वाचा सविस्तर…
-
नाशिक महापालिका क्षेत्रात होणार 106 ठिकाणी चार्जिंग स्टेशन
पहिल्या टप्प्यात निघणार 57 चार्जिंग स्टेशनसाठी निविदा
22 जागांवर नवी दिल्ली येथील युनायटेड नेशन डेव्हलपमेंट अंतर्गत मिळणार निधी
तर 35 ठिकाणी केंद्र सरकारच्या एन कॅप अंतर्गत मिळणार निधी
-
फेब्रुवारीमध्ये भाजपचे राज्य अधिवेशन होणार नाशिकमध्ये
गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार प्रारंभ,
पुढील वर्षातील निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी अधिवेशन,
हजारहून अधिक कोअर कमिटी पदाधिकारी येणार,
10 आणि 11 तारखेला तपोवनातील साधुग्राम मैदानावर होणार अधिवेशन,
अधिवेशन यशस्वी करण्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यावर.
-
Pune News : लवकरच धावणार पुणे- मिरज रेल्वे
पुणे – मिरज रेल्वे मार्गाचे भूसंपादन पूर्ण
एकूण 280 किलोमीटरच्या मार्गीकीचे भूसंपादन झाले पूर्ण
जवळपास 13 हेक्टर पेक्षा अधिक जागा सरकारकडून भूसंपादित
पुणे जिल्ह्यातील चौदा गावांचा मार्गीकेत समावेश
रेल्वे लाईनचे कामही अंतिम टप्प्यात
लवकरच धावणार पुणे- मिरज रेल्वे
-
Pune News : पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेली गावे अद्याप अंधारातच
पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेली गावे अद्याप अंधारातच
नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांना अद्याप पुरेसा वीज पुरवठा नाहीच
नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना लागणार आहेत 26000 एलईडी
कामासाठी महापालिकेचा मुहूर्त ठरता ठरेना
26000 एलईडी बसविण्याचा निर्णय अजूनही निविदा प्रक्रियेतच अडकलेला
तरी याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेऊ अतिरिक्त आयुक्तांची माहिती
-
Nashik News : नाशिकमध्ये मालेगावमध्ये रस्ता चोरीला
नाशिकमध्ये मालेगावमध्ये रस्ता चोरीला
रस्ता शोधणाऱ्याला पाच लाखांचे बक्षिस…
चोरीला गेलेला रस्ता शोधतांना पथकाची दमछाक…
मालेगाव तालुक्यातील टोकडे येथी रस्ता चोरी प्रकरण…
-
अमरावती जिल्ह्यात नऊ महिन्यात 2547 महिलांनी केला गर्भपात
अमरावती : महिलेच्या जीवाला धोका असल्यास कायदेशीर गर्भपाताला परवानगी,
गर्भपातासाठी शासनाच्या काही अटी व नियमांचे करावे लागते पालन,
अमरावती जिल्हा आरोग्य प्रशासनाची माहिती.
-
पुण्यात नवीन कोयता गँगची दहशत कायम
हातात कोयते, कुऱ्हाड, तलवार घेतलेला व्हिडीओ व्हायरल
पुण्यातील कोंढवा परिसरातले हे तरुण
प्रतिस्पर्धी टोळीतील एकाला संपवण्यासाठी त्यांनी हे शस्त्र आणले होते
कोंढवा पोलिसांनी या टोळीला ताब्यात घेतले
त्यांनी हातात शस्त्र घेतलेला हा व्हिडीओ धडकी भरवणरा
त्यामुळे पोलिसांचा धाक राहिला की नाही हा प्रश्न पुन्हा उपस्थित
-
नाशिकच्या देवळाली गावात गोळीबार झाल्याची चर्चा
शिवजयंतीच्या नियोजनासाठी बोलवलेल्या बैठकीत गोळीबार झाल्याची चर्चा
शिवजयंतीच्या नियोजन बैठकीदरम्यान ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने
शिंदे गटाने शिवजयंतीच्या नियोजनासाठी बोलावली होती सर्वपक्षीय बैठक
त्याचवेळी ठाकरे गटानेही त्याच ठिकाणी केलं होतं बैठकीचं आयोजन
बैठकीदरम्यान दोन्ही गट आमनेसामने आल्याने वाद
वादादरम्यान एका गटाकडून हवेत गोळीबार झाल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती
-
छत्रपती संभाजी महाराजांची शासकीय कार्यालयात जयंती साजरी होणार
छत्रपती संभाजी महाराजांचा महापुरुषांच्या यादीत समावेश करून छत्रपती संभाजी महाराज जयंती शासकीय कार्यालयात साजरा करण्याचा सरकारचा निर्णय
सरकारच्या निर्णयाचं मराठा संघटनांकडून स्वागत केलं जातंय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मराठा संघटनांनी आभार मानले
खूप दिवसांची मागणी मान्य केल्याने महेश डोंगरे यांनी सरकारचे आभार मानलेत
-
उल्हासनगरात नामचीन चेन स्नॅचरला बेड्या
चेन स्नॅचिंगचे तब्बल 80 गुन्हे दाखल
9 गुन्ह्यात वॉन्टेड, तर 10 ताज्या गुन्ह्यात सहभाग
आणखी 40 ते 45 गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता
Published On - Jan 20,2023 6:11 AM