Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…
Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
मुंबई: शिवसेनेच्या धनुष्यबाणावरील सुनावणी येत्या 30 जानेवारी रोजी होणार आहे. मात्र, त्यावरून आता शिंदे आणि ठाकरे गटातील नेत्यात चांगलीच जुंपली आहे. खासदार बृजभूषण सिंह यांना दणका. चौकशी होईपर्यंत कुस्ती संघाच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी. यासह महाराष्ट्र आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडींची अपडेट जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
परळीमध्ये दवाखान्यात घुसून डॉक्टर दाम्पत्याला मारहाण आणि धक्काबुक्की
मारहाण करत डॉक्टरांच्या पत्नीचा केला विनयभंग
परळी येथील नामांकित डॉक्टर दाम्पत्याच्या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल
व्हिडिओ समोर आल्यानंतर आणि डॉक्टरांच्या तक्रारीवरून परळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
भिशीच्या पैशावरून डॉक्टर दांपत्याला झाली मारहाण
डॉक्टरांच्या ओळखीच्याच व्यक्तींकडून आणि भाडोत्री लोकांकडून मारहाण झाल्याचा डॉक्टरांचा आरोप
मारहाणीत डॉक्टरांचे दात गाळले
आरोपींविरोधात परळी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
-
पदवीधर निवडणुकीसाठी उभे असलेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे नाशिकमध्ये दाखल
नाशिक : सत्यजित तांबे यांच्यासोबत वडील सुधीर तांबे देखील उपस्थित
शिक्षक संघटना यांच्यासोबत बैठक सुरू
बैठकीला पदवीधर संघटना, शिक्षक संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित
-
-
क्रिकेटर उमेश यादव यांची फसवणूक
उमेश यादव यांच्या मित्रानेच केली 44 लाख रुपयांत फसवणूक
नागपूर जिल्ह्यातील कोराडी पोलीस स्टेशन हद्दीतली घटना
संपत्ती खरेदी करण्याच्या प्रकरणातून उमेश यादव यांची फसवणुक
कोराडी पोलिसांकडून तपास सुरु
-
मुंबईत मोदी यांची सुरक्षा भेदली
मुंबईतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत घुसखोरी
मुंबई पोलिसांनी केली दोघांना अटक
एक जण NSG जवान असल्याचे सांगत मोदींच्या सभेत VVIP क्षेत्रात घुसला
अटक केलेल्या दुसऱ्या व्यक्तीकडे घातक शस्त्र
-
पनवेलच्या धोबी आळीत घरफोडी करताना चोरटा सीसीटीव्हीत कैद
92 हजारांचे सोन्याचे दागिने लंपास
पनवेल शहरातील एका बंद घरात अज्ञात चोरट्याची घरफोडी
या चोरट्याने धाडसी चोरी करत घरातील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडलीय
मात्र हा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे, पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत
-
-
नागपूर विभाग शिक्षक आमदार निवडणुकीची चुरस वाढली
एकूण 22 उमेदवार रिंगणात
भाजप आणि महविकास आघाडी समर्थित उमेदवार यांच्यात लढत
महाविकास आघाडी घटक पक्षातील अपक्षांनी वाढविली सर्वांची डोकेदुखी
-
नाशिक – पदवीधर निवडणुकीत स्वराज्य संघटनेची उडी
स्वराज्य संघटनेकडून अपक्ष उमेदवार सुरेश पवार यांना पाठिंबा जाहीर,
नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत केली घोषणा,
नाशिकचे दोन्ही प्रमुख उमेदवार पळपुटे असल्याचा आरोप,
एका उमेदवाराला अजूनही पक्षाचा पाठिंबा मिळत नसल्याची टीका.
-
कापसाचे दर वाढण्यास सुरुवात
यंदा कापूस दहा हजाराचा टप्पा गाठणार?
शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा
मागील वर्षी १२ हजारांपर्यंत गेला होता दर
-
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा
बोरगाव जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची गेली होती सहल
सहल पार पडल्यावर स्थानिक इको पार्कमध्ये शिजविण्यात आले होते अन्न
चिकन शिजवून करण्यात आले होते सर्व्ह
याच चिकनमधून एकूण 52 विद्यार्थ्यांना झाली विषबाधा
12 विद्यार्थ्यांना गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले दाखल
सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर, पोलीस आणि शिक्षण विभागाची पथके शाळेत दाखल
-
सोमय्यानंतर मनसेच्या निशाण्यावर बीएमसी
मनसेचे संदीप देशपांडे यांनी केला मोठा खुलासा
कोरोना काळातील भ्रष्टाचाराचे पुरावे देणार
सोमवारी सर्व पुर्व देणार असल्याचे केले जाहीर
-
पुणे पालिकेची 250 वाहने भंगारात काढावी लागणार
पुणे : पुणे पालिकेची 250 वाहने भंगारात काढावी लागणार,
केंद्राचे 15 वर्षे जुने शासकिय वाहने भंगारात काढण्याचे निर्देश,
कचरा वाहतुकीसाठी वाहने कमी पडत असताना या नियमामुळे पालिकेची कोंडी,
पुण्यातील कचरा उचलण्याच्या कामावर होणार परिणाम.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बीकेसी रॅलीत घुसखोरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बीकेसीतील रॅलीत एनएसजी कमांडोचे बनावट ओळखपत्र वापरून एकाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड.
नवीमुंबईच्या रमेश मिश्रा याला अटक केली आहे. पोलीस त्याची चौकशी करीत असून त्याने आपण लष्करात काम केल्याचा दावा केला आहे. पोलीस त्याची चौकशी करीत आहेत.
-
Pune Live- पुणे पालिकेची २५० वाहने भंगारात काढावी लागणार
केंद्राचे १५ वर्षे जुने शासकिय वाहने भंगारात काढण्याचे निर्देश
कचरा वाहतुकीसाठी वाहने कमी पडत असताना या नियमामुळे पालिकेची कोंडी
पुण्यातील कचरा उचलण्याच्या कामावर होणार परिणाम
-
पुणे काँग्रेस नेत्याने घेतली फडणवीस यांची भेट
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या भेटीमुळे चर्चांना उधान
पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांनी घेतली फडणवीस यांची भेट
दोन्ही नेत्यांमधील चर्चेचा तपशील गुलदस्त्यात
-
ब्रिजभूषण यांच्या विरोधातील आंदोलन स्थगित
ब्रिजभूषण यांच्या विरोधातील आंदोलन स्थगित
कुस्तीपटूंचे जंतर-मंतर वरील आंदोलन स्थगित
क्रीडा मंत्रालयाकडून नेमण्यात आलेली समिती चार आठवड्यात अहवाल देणार
या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष चौकशी व्हावी बजरंग पुनिया यांची मागणी
दरम्यान ब्रिजभूषण सिंह कुस्ती महासंघाचा राजीनामा देणार नाहीत – सूत्र
-
Pune Live- पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता
काँग्रेसचे माजी नगरसेवक आबा बागुल यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट
फडणवीस पुण्यातील सहकारनगरमध्ये आपल्या नातेवाईकांकडे आले असता झाली भेट
विश्वसनीय सूत्रांची टीव्ही 9 ला माहिती
आबा बागुल हे काँग्रेसचे चार टर्म पुणे महापालिकेत नगरसेवक आहेत.
शिवाय पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर म्हणूनही जबाबदारी सांभाळलीय
-
औरंगाबाद शहरात खासगी ट्रॅव्हल्स बसला भीषण आग
औरंगाबाद शहरातील छावणी परिसरात लागली आग
संपूर्ण ट्रॅव्हल्स बस आगीच्या भक्ष्यस्थानी
बसमध्ये आग लागताच सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले
आगीत कुठलीही मनुष्यहानी नाही, मात्र आगीत संपूर्ण बस जळून खाक
-
पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्चा तेलाचे भाव भडकले
गेल्या आठवड्यात कच्चा तेलाचा भाव 100 डॉलर प्रति बॅरलवर
त्यानंतर क्रूड आईलच्या भावात झाली घसरण
आज 80 डॉलर प्रति बॅरलवरुन कच्चे तेल 88 डॉलर प्रति बॅरलवर
अहमदनगर पेट्रोल 106.53 रुपये, अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये प्रति लिटर
अमरावतीत 107.23, औरंगाबाद 106.69, नागपूरमध्ये 106.04 रुपये
नांदेडमध्ये 108.32 रुपये, जळगावमध्ये 106.89 रुपये प्रति लिटर
नाशिकमध्ये 105.89 रुपये, लातूरमध्ये 107.19 रुपये प्रति लिटर
कोल्हापूरमध्ये 106.47 रुपये तर पुण्यात पेट्रोलचा भाव 106.19 रुपये प्रति लिटर
सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.18 रुपये प्रति लिटर
-
दिल्ली, पंजाबमध्ये सोमवारपासून पाऊस
दिल्लीत पाऊस प्रजासत्ताक दिनापर्यंत राहण्याचा अंदाज
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी
बर्फवृष्टीमुळे पर्यटनाचा आनंद वाढला
दिल्लीचे तापमान १० अंश सेल्सियसवर
-
…. तर नागपूर पोलीस तुमची गाडी जप्त करणार!
…. तर नागपूर पोलीस तुमची गाडी जप्त करणार!– ५० च्या वर थकीत चालानवाल्या गाड्या होणार जप्त– नागपूर पोलीसांची वाहनांवर कारवाईची मोहिम सुरु– ‘गैरसोय टाळण्यासाठी चालन भरण्याचं आवाहन’ -
नाशिकमधील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिका प्रशासनाची तयारी सुरू
साधूग्राम करिता भूसंपादनासाठी 4500 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे
मनपा प्रशासनाने पाठवला नगरविकास खात्याकडे प्रस्ताव
साधूग्रामसाठी जवळपास पावणे चारशे एकर जागा होणार संपादन
नाशिकमध्ये येणाऱ्या लाखो साधू-महंतांसाठी उभारण्यात येणार साधूग्राम
-
सर्वात चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या नाशिक पदवीधर मतदार संघात स्वराज संघटनेची एन्ट्री
नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघात छत्रपती संभाजमहाराजांची उडी,
सुरेश पवार यांनी भेट घेत केला स्वराज संघटनेत प्रवेश,
स्वराज्य संघटनेचे सुरेश पवार असणार अधिकृत उमेदवार,
पदवीधर मतदार संघात उमेदवार असलेल्या सुरेश पवार यांनी घेतली संभाजी महाराजांची भेट,
आता चुरशीच्या झालेल्या नाशिक पदवीधर मतदार संघात छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज संघटनेच्या एन्ट्रीने अधिक चुरस वाढण्याची शक्यता,
सुरेश पवार हे नाशिकच्या सटाणा तालुक्यातील.
-
पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता
काँग्रेसच्या एका जेष्ठ माजी नगरसेवकाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट,
फडणवीस पुण्यातील सहकारनगरमध्ये आपल्या नातेवाईकांकडे गेले असता त्याठिकाणी झाली भेट,
हे माजी नगरसेवक काँग्रेसचा चार टर्म पुणे महापालिकेत नगरसेवक.
-
शालेय वेळेत विद्यार्थ्यांना मोबाईल वापरावर बंदी
मालेगाव.. ब्रेकिंगशालेय वेळेत विद्यार्थ्यांना मोबाईल वापरावर बंदी…
नाशिकच्या देवळा तालुक्यात दहिवड येथील ग्रामस्थांचा निर्णय…सर्व शैक्षणिक संस्थांना निवेदन.. -
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात आज एकाच मंचावर
पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या कार्यक्रमात येणार एकत्र,
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती,
विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती असणार
-
मालेगाव महानगर पालिकेचे थकबाकीदारांना अल्टिमेटम
मनपा पाणी पुरवठा खंडित करणार
थकीत पाणी बिलाचे देयके न दिल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याचा मालेगाव महापालिकेने दिला थकबाकीदारांना इशारा
मालमत्ता मिळकत व पाणी पट्टी थकबाकीदार यांना दिल्यात मनपाने अंतिम नोटीसा
कर भरून नळ तोडणी आणि जप्तीची कारवाई टाळावी असेही केले आवाहन
-
अमरावतीत भंगाराच्या पोलादापासून साकारला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा महाकाय पुतळा
अमरावतीच्या गुरूकुंज मोझरीत साकारला पुतळा
दुचाकी, चारचाकी वाहनांच्या भंगार पोलादापासून आठ टन वजनाचा महाकाय पुतळा तयार
20 फूट उंच आणि 14 फूट रुंद असा तुकडोजी महाराजांचा पोलादी पुतळा बनवला
मागील तीन महिन्यापासून सुरू होते पुतळा बनवण्याचे काम
लवकरच दास टेकडी जवळच्या तलावात बसवणार पुतळा
-
डोंबिवलीतील ज्वेलर्स चोरट्यांच्या रडावर
48 तासात 4 दुकानं फोडून आणखी एक दुकान फोडण्याचा प्रयत्न
गुरुवारी पहाटे डोंबिवली पश्चिमेत दोन ज्वेलर्स दुकानांची शटर उचकटून चोराने13 लाखांचा सोने-चांदीचा ऐवज केले लंपास
तर शुक्रवारी पहाटे डोंबिवली पूर्वेत श्रीखंडेवाडी येथे दोन दुकानाला मोठे भगदाड पाडत आणखी एका ज्वेलर्सला भगदाड पाडण्याचा प्रयत्न
डोंबिवली ज्वेलर्स व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
-
अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील कुऱ्हा गावात शहीद भगतसिंग वाचनालयाच्या कुऱ्हा महोत्सवाला सुरुवात
कुऱ्हा गावात ग्रंथ दिंडी, मिरवणूक काढून तीन दिवसीय कुऱ्हा महोत्सवाला प्रारंभ
तीन दिवसात सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान, महिला मेळावा, आरोग्य तपासणी, आदी कार्यक्रम
कुऱ्हा महोत्सवाचे यंदाचे दहावे वर्ष
-
मध्य रेल्वेची कर्जतहून मुंबईकडे येणारी रेल्वेसेवा उशिराने
नेरळ रेल्वे स्थानकाजवळ सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या इंजिनात झाला होता बिघाड
बिघाडामुळे एक एक्स्प्रेस आणि एका लोकलचा खोळंबा
काही वेळापूर्वी रेल्वेसेवा सुरू, मात्र सध्या 10 ते 12 मिनिटं उशिराने
Published On - Jan 21,2023 6:20 AM