AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लातुरात 45 विद्यार्थ्यांना कोरोना, शाळा दहा दिवस बंद ठेवण्याच्या सूचना

विद्यार्थ्यांवर लातूरच्या शासकीय वसतिगृहात असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार सुरु आहे. (Latur 45 Student Corona)

लातुरात 45 विद्यार्थ्यांना कोरोना, शाळा दहा दिवस बंद ठेवण्याच्या सूचना
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 10:45 PM

लातूर : लातूर शहरातील एका शाळेत तब्बल 45 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे लातूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. लातूरच्या या शाळेतील 40 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आज आणखी अजून 5 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले आहेत. या शाळेतील 45 जणांना कोरोनाची लागण 366 पैकी 360 विद्यार्थ्यांची तपासणी केली होती. (Latur Government Hostel 45 Student Tested Corona Positive)

एमआयडीसी भागात असलेल्या पब्लिक शाळेच्या वसतिगृहातील 45 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने शाळा पुढील दहा दिवस बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनपाच्या आरोग्य पथकांकडून बाधितांची मुलांची काळजी घेतली जात आहे. शिक्षक आणि वसतिगृहाच्या मेसमधील कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. हे विद्यार्थी शिक्षणासाठी लातूरच्या या शाळेच्या वसतिगृहात रहायला आहेत.

लातूरच्या एमआयडीसी भागात एक सीबीएसई स्कूल आहे. या स्कूलच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीमध्ये कोरोनाची पहिल्यांदा लक्षणे आढळली. त्या नंतर इतर विद्यार्थ्यांची तपासणी केली असता तब्बल 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या विद्यार्थ्यांवर लातूरच्या शासकीय वसतिगृहात असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार सुरु आहे.

लातूरमध्ये सध्या कोरोनाची परिस्थिती काय?

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. राज्यांतल्या विविध शहरांत कोरोनाचे अधिकाधिक संख्येने रुग्ण मिळत आहेत. लातूरातही काल (सोमवारी) एकाच दिवशी 35 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर दुर्दैवीरित्या 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

लातुरात आतापर्यंत 24 हजार 901 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 23 हजार 856 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. तर जवळपास 150 रुग्णांवर शहरातल्या विविध रुग्णांलयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर काही रुग्ण होम क्वारंटाईन आहेत.

लातूर महानगरपालिकेची तयार काय?

शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढायला सुरुवात झाल्यापासून महापालिका अॅक्शन मोडमध्ये आहेत. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर महापालिका कारवाई करत आहे. जो नागरिक विनामास्क फिरेल त्याच्याकडून 100 रुपये दंड वसूल केला जात आहे तर तोच नागरिक दुसऱ्यांदा विनामास्क आढळला तर त्याच्याकडून 500 रुपये दंड घेतला जात आहे.

नागरिकांनी नियम पाळावेत. शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन नागरिकांनी करुन शासन आणि प्रशासनाला सहकार्य करावं, असं सांगत सध्या तरी लातुरात लॉकडाऊनचं कुठलंही प्रयोजन नाही मात्र नागरिकांनी नियम पाळले नाही तर कठोर पावलं उचलावी लागतील, असा इशारा लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. (Latur Government Hostel 45 Student Tested Corona Positive)

संबंधित बातम्या : 

एकाच शाळेतील 40 विद्यार्थ्यांना कोरोना, 320 विद्यार्थी, 10 शिक्षक, 20 कर्मचारी क्वारंटाईन, महाराष्ट्राला हादरे सुरुच

‘मास्क’चा वापर टाळणाऱ्या 22 हजार 976 नागरिकांना एका दिवसात तब्बल 46 लाख रुपयांचा दंड

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.