Latur Crime : लातूरमध्ये बारावीच्या विद्यार्थ्याला धारदार हत्याराने भोसकले, हत्येचे कारण अस्पष्ट

रोहनचे कुटुंब त्याच्या शिक्षणासाठी लातुरच्या मोतीनगर भागात वास्तव्यास आहे. त्याचे वडील औसा तालुक्यातल्या लोदगा या मूळ गावी शेती करतात. त्याला आई-वडील, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. त्याची हत्या कोणी व कशासाठी केली याचा तपास पोलीस करीत आहेत.

Latur Crime : लातूरमध्ये बारावीच्या विद्यार्थ्याला धारदार हत्याराने भोसकले, हत्येचे कारण अस्पष्ट
लातूरमध्ये बारावीच्या विद्यार्थ्याला धारदार हत्याराने भोसकले
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 7:41 PM

लातूर : लातुर शहरात आज एका युवकाच्या हत्येने खळबळ उडाली आहे. विशाल नगर भागातल्या साई मंदिराजवळ धारदार हत्यारांनी वार करून एका तरुणाची हत्या(Murder) करण्यात आली आहे. रोहन उजळंबे (18)(Rohan Ujlambe) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. रोहन हा लातुरच्या दयानंद कॉमर्स महाविद्यालयात 12 वी मध्ये शिकत होता. आज सकाळी 11.30 वाजल्यानंतर रोहन उजळंबे हा साई मंदिर परिसरात आला होता. इथे त्याच्यावर अज्ञात युवकाने धारदार हत्यारांनी हल्ला केला. जखमी झालेल्या रोहनचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. (A 12th standard student was killed in Latur for unknown reasons)

रोहनच्या शिक्षणासाठी त्याचे मोतीनगर भागात आले

रोहनचे कुटुंब त्याच्या शिक्षणासाठी लातुरच्या मोतीनगर भागात वास्तव्यास आहे. त्याचे वडील औसा तालुक्यातल्या लोदगा या मूळ गावी शेती करतात. त्याला आई-वडील, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. त्याची हत्या कोणी व कशासाठी केली याचा तपास पोलीस करीत आहेत. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथकं शहर आणि जिल्ह्यात रवाना झाली आहेत. रोहनची हत्या झाल्याचे कळताच त्याच्या महाविद्यालयीन मित्रांनी रुग्णालयात गर्दी केली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटने प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. या घटनेने लातुरच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अहमदनगरमध्ये जुन्या वादातून तरुणावर गोळीबार

जुन्या वादातून भर चौकात तरुणावर गोळीबार झाल्याची घटना अहमदनगरमधील शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे शनिवारी घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोळी तरुणाच्या हाताला चाटून गेल्याने तो किरकोळ जखमी झाला आहे. परमेश्वर उर्फ पप्पू पातकळ असे हल्ला करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. परमेश्वर पातकळ हा शनिवारी चापडगाव बसस्थानक परिसरात चौकात आला असता त्याच्यावर अज्ञातांनी एक गोळी झाडली. घटनेची माहिती मिळताच शेवगाव पोलीस(Shevgaon Police) आणि जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखे (District Crime Branch)चे पथक घटनास्थळी दाखल झाले. शेवगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा आणि वाळू तस्करीचा धंदा चालतो. याच धंद्यात तस्करी करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. यामुळे परमेश्वर पातकळ याच्यावर झालेला हल्ला हा वाळू तस्करीच्या वादातून झाला की कोणत्या जुन्या वादातून झाला याचा पोलीस तपास करीत आहेत. (A 12th standard student was killed in Latur for unknown reasons)

इतर बातम्या

Pimpri Chinchwad crime | मेट्रोमोनिअल साईटवरून ओळख मग लग्नाच्या आणाभाका अन…. बलात्कार करून आरोपी फरार ; नेमकं काय घडलं

Satara Crime : सातारा जिल्ह्यात एकाच दिवशी 5 जणांची गळफास घेऊन आत्महत्या, तरुणांनी टोकाचे पाऊल का उचलले ? वाचा सविस्तर

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.