Accident | भरधाव काळी पिवळी-बोलेरची जोरदार धडक! तिघांपैकी दोघे जागीच ठार, तर एक…
या अपघातानंतर काळी-पिवळीला जोरदार धडक बसून ती रस्त्याच्या एका बाजूला पलटली होती. या धडकेत दोघे प्रवासी जागीच दगावलेत. या अपघातानंतर दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला होता.
लातूर : लातुरातील औशामध्ये झालेल्या एका भीषण अपघातात (Accident) तिघांचा मृत्यू झाला आहे. यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एकानं उपचारासाठी नेलं जात असताना प्राण सोडला. या भीषण अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या लातूरच्या सरकारी दवाखान्यात उपचार सुरु आहे.
रात्रीच्या वेळेस हा अपघात झाला. भरधाव काळीपिवळी आणि बोलेरो (Mahindra Bolero) जीप एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एका गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाला उपचारासाठी रुग्णालयात नेलं जात असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातात एकूण 7 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
दरवाजा तोडून बाहेर काढलं
लातूर-निलंगा रस्त्यावर दावतपूर पाटीजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर काळी-पिवळीला जोरदार धडक बसून ती रस्त्याच्या एका बाजूला पलटली होती. या धडकेत दोघे प्रवासी जागीच दगावलेत. या अपघातानंतर दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला होता. त्यानंतर प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळीपिवळीत अडकलेल्या प्रवाशांना गाडीचे दरवाजे तोडून बाहेर काढण्यात आलं.
कसा झाला अपघात?
शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला होता. रात्री उशिरापर्यंत या अपघातातील मयतांची नावं कळू शकली नव्हती. प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळीपिवळीतून ओशाहून लामजन्याकडे काही जण निघाले होते. तर MH 24 AF 0959 नंबरची बोलेरो कार लामजन्याहून औश्याकडे भरधाव निघाली होती. दरम्यान, वाघोली पाटीजवळ एका बोलेरो कार आणि काळीपिवळीची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की काळी पिवळीचा चक्काचूर झाला. तर बोलेरो गाडी तब्बल १ दीडशे फूट लांब जाऊन खड्ड्यात पडली होती.