Marathi Sahity Sammelan: पुस्तकांनीच मला माझ्या जीवनाचे तत्वज्ञान शिकवले; साहित्य संमेलनाची नितीन गडकरींंच्या उपस्थितीत सांगता
लेखकानी लिहावे आणि ते लिहिण्याचा अधिकार प्रत्येक लेखकाला असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक क्षेत्रात वाद विवाद आणि राजकारण आहे. मात्र साहित्याच्या व्यासपीठावरुन राजकारण बोलण्याची गरज नाही असेही त्यांनी सांगितले.
उदगीरः साहित्यिक आणि साहित्य हे आपले जीवन घडवणारे आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यातील आठवणी सांगताना वक्तृत्व स्पर्धेत मला बक्षीस मिळाले होते. त्या स्पर्धेत त्यावेळी मला सावरकर, पुरंदरे, देसाई या लेखकांची पुस्तके मला भेट मिळाली. त्या भेट मिळालेल्या पुस्तकांनीच मला जीवनाचे तत्वज्ञान शिकवले अशी आठवणही त्यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा (Akhil Bhartiy Marathi Sahity Sammelan) आज शेवटच्या दिवशी सांगता समारंभप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी 22 एप्रिलपासून उदगीरमध्ये (Udgir) सुरु असलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले त्याबद्दल उदगीर येथील जनतेचे आणि आयोजकांचे आभार मानले.
यावेळी त्यांनी सांगितले की, कुठलीही सत्ता डोळे नष्ट करु शकते पण विचार नष्ट करु शकत नाही, डोळे दान केले जाऊ शकतात पण दृष्टी नाही असे सांगत त्यांनी साहित्य, संस्कृती आणि इतिहास हे जीवन समृद्ध करत असतात असे मतही त्यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी सांगितले की, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात ही आणीबाणीच्या विरोधातील नवनिर्माण आंदोलनातून झाली आहे.
माझ्यावर साहित्याचा प्रवास
आपल्याकडे होणारे चित्रपट, नाटक हे केवळ मनोरंजनासाठी नसून ते संस्कार देण्यासाठी आहेत. हा संस्कार माणसाचे जीवन घडवत असतो. तसेच उत्तम, अधिक उत्तम आणि सर्वोत्तम हाच माणसाचा स्वभाव असला पाहिजे असे सांगत त्यांनी आपल्यावर झालेला साहित्याचा प्रभाव कसा होता हेही सांगितले आहे.
शेतकरी उर्जादाता बनावा
21 वे शतक हे भारताचे आहे, यामध्ये आपल्याला विश्वसमूदायामध्ये पोहोचवायचे असेल तर सामूदायिक एकमत असणे गरजेचे असून ते महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. मराठीत साहित्यिकांनी जलसंवर्धनावर खूप पुस्तके लिहिली आहेत, मात्र जोपर्यंत लातूर जिल्ह्यातील इरिगेशन 18 टक्क्यावरुन ते प्रमाण जोपर्यंत 50 टक्क्यांपर्यंत जात नाही तोपर्यंत जनता सुखी होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले. यावेळी शेतकऱ्यांविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, शेतकरी इतका समृध्द झाला पाहिजे की तो उर्जादाता बनला पाहिजे आणि ते गरजेचे आहे असंही त्यांनी म्हटले आहे.
भारतीय समाजजीवन समृध्द
आपल्या लिखाणामागचे उद्दिष्ट काय आहे आणि त्यामागे उद्देश काय आहे हे पाहिले पाहिजे. त्याचबरोबर राजकारण, पत्रकारितेसह समाजातील सर्वच गोष्टींचा ऱ्हास झालेला आहे. तो भरुन काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे सांगत त्यांनी मी भाषणासाठी अमेरिकेत गेलो होतो तेव्हा अमेरिकेतील मंत्री म्हणाले, आमच्या देशातील मोठी समस्या आहे ती म्हणजे आमची समाजव्यवस्था कोलमडली आहे. कारण आमचे तरुण तरुणी लिव्ह इनमध्ये राहतात, मात्र भारतात तसे नाही, भारतीय समाजजीवन समृध्द आणि संपन्न आहे. कारण आमच्याकडे शिवाजी महाराजांपासून थोर लोकांचे संस्कार झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजकारणातही साहित्यिकांना महत्व
समाजात चांगले वाईट, सत्य असत्य आहे. त्याचप्रमाणे आपल्याला समाजात जे चांगले दिसेल, जे विकासाला नवीन दिशा देणारे आहे. त्याविषयीही लेखकानी लिहावे आणि ते लिहिण्याचा अधिकार प्रत्येक लेखकाला असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक क्षेत्रात वाद विवाद आणि राजकारण आहे. मात्र साहित्याच्या व्यासपीठावरुन राजकारण बोलण्याची गरज नाही असेही त्यांनी सांगितले. राजकारणातही साहित्यिकांना महत्व आहे. पु ल देशपांडे, दुर्गा भागवत यांनी लोकशाही वाचवण्यासाठी नेहमीच काम केले असल्याचेही त्यांनी सांगितले. सुधाकर नाईक आणि श्रीकांत जीचकार यांच्यामुळे संस्कृत विश्वविद्यालय उभे राहिले आहे. त्याचा फायदा येणाऱ्या पिढ्यांना होईल. त्यामुळे शिक्षण हे राजकारणापासून मुक्त असले पाहिजे असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
जातीयता, धर्मांधता संपवा
आपल्या देशात जातीयता, अस्पृश्यता, धर्मांधता आहे. हे संपवायचे असेल तर लेखकाची भूमिका महत्वाची आहे. माणूस हा जातीने नव्हे तर गुणांनी श्रेष्ठ आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विश्वात महासत्ता व्हायचे असेल तर साहित्य, संस्कृती टिकवणे गरजेची आहे असेही त्यांनी सांगितले.
संबंधित बातम्या