‘तो सांगत नव्हता, फक्त म्हणायचा, माझं काम आहे’, संसदेत गोंधळ घालणाऱ्या अमोल शिंदे याच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया

संसदेत एक तरुण आणि एका महिलेने बेकायदेशीरपणे घुसून गोंधळ घातला. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. हे कृत्य करणाऱ्यांमध्ये एका महाराष्ट्राील तरुणाचा समावेश आहे. अमोल शिंदे असं त्याचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तो लातूरच्या झरी गावचा रहिवासी आहे.

'तो सांगत नव्हता, फक्त म्हणायचा, माझं काम आहे', संसदेत गोंधळ घालणाऱ्या अमोल शिंदे याच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 8:21 PM

महेंद्र जोंधळे, Tv9 मराठी, लातूर | 13 डिसेंबर 2023 : संसदेचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान आज दुपारी एक वाजेच्या सुमारास एक अनपेक्षित घटना घडली. प्रेक्षकांच्या गॅलरीत बसलेला एक तरुण आणि एक महिला उडी मारुन थेट सभागृहात वेलमध्ये आला. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी तरुणाने स्मोक कॅन्डल फोडली. त्यामुळे भर सभागृहात पिवळा धूर पसरायला लागला. तरुणाने यावेळी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. तानाशाही नहीं चलेंगी, अशी घोषणाबाजी केली. यावेळी खासदारांनी या तरुणाला पकडलं आणि जोरदार चोप दिला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. सभागृहाच्या बाहेर आल्यानंतरही या दोघांनी जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजी करणारा तरुण हा महाराष्ट्राचा निघाला. अमोल शिंदे असं या तरुणाचं नाव. तो लातूरच्या झरी गावाचा रहिवासी आहे. तर अटकेतील 42 महिलेचं नाव नीलम कौर सिंह असं आहे.

अमोल शिंदे हा 25 वर्षाचा तरुण आहे. त्याने असं कृत्य का केलं? त्याला नेमकं काय साध्य करायचं होतं? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अधिक माहिती मिळवण्यासाठी अमोल शिंदे यांच्या झरी गावात धडक दिली. पोलिसांनी अमोल शिंदे याच्या आई-वडिलांची चौकशी केली. यावेळी अमोल शिंदे हा पोलीस भरतीची तयारी करत होता. तो कॉलेजमध्ये शिकत होता. तसेच त्याचे आई-वडील मजुरी करुन आपला उदरनिर्वाह भागवतात, अशी माहिती समोर आली. अमोलची घरची परिस्थिती बेताची आहे. त्याला आणखी दोन मोठी भावंडं आहेत, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर आली.

अमोल शिंदे याच्या गावातील नागरिकांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी आपल्याला अमोल शिंदे याच्याविषयी जास्त माहिती नाही, अशी प्रतिक्रिया दिली. पण अमोलचे आई-वडील खूप चांगले, मेहनती आणि गरीब आहेत. त्यांचा अमोल याच्या कृत्याशी काही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आम्ही त्याच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया घेतली. यावेळी त्यांनी अमोल आपल्याला सैन्य भरतीला जातो, असं सांगून गेला, अशी प्रतिक्रिया अमोलच्या आई-वडिलांनी दिली.

अमोलचे वडील काय म्हणाले?

“अमोल 9 तारखेला भरतीला जायचं म्हणून सांगून गेला. त्याच्या पुढचं काही सांगितलं नाही”, असं अमोलचे वडील म्हणाले. “अमोल लॉकडाऊनच्या अगोदर एका वेळेस दिल्लीला गेलेला. त्यानंतर वर्षभरात दोन वेळा गेला. भरतीला चाललो असं म्हणून तो गेला होता. याशिवाय तो काही बोलला नव्हता. पोलीस भरती की सैन्याची भरती ते काही सांगितलं नाही. तो फक्त म्हणायचा की सैन्यात जायचं आहे”, अशी प्रतिक्रिया अमोलच्या वडिलांनी दिली. यावेळी त्याच्या वडिलांना अमोलच्या संसदेतील कृत्याबद्दल माहिती मिळाली का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “त्याने संसदेत काय केलं याची काहीच माहिती आली नाही”, असं अमोलच्या वडिलांनी सांगितलं.

अमोलची आई काय म्हणाली?

“अमोल काहीच सांगत नव्हता. फक्त म्हणायचा की, माझं काम आहे, मी चाललो दिल्लीला, आधी मुंबईला म्हणाला. त्याने मुंबईला गेल्यावर त्याच्या अण्णाला फोन केला की, माझा मोबाईल बंद होणार आहे. मी दिल्लीला जाणार आहे. त्याच्याशी शेवटचा फोन 9 तारखेला झाला”, अशी प्रतिक्रिया अमोलच्या आईने ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली.

Non Stop LIVE Update
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.