Latur: आता ‘लालपरी’ धावणार, प्रशासनाच्या एका निर्णयामुळे 5 आगारातील प्रवाशांची होणार वाहतूक
गेल्या 95 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरु आहे. त्यामुळे वाहतूक सेवा ही कोलमडली असून प्रवाशांचे हाल होत आहेत. लातूर विभागातील 5 ही आगारासमोर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे सुरु आहे. मात्र, आता यावर पर्याय काढण्यास सुरवात झाली आहे.
लातूर : गेल्या 95 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरु आहे. त्यामुळे वाहतूक सेवा ही कोलमडली असून प्रवाशांचे हाल होत आहेत. लातूर विभागातील 5 ही आगारासमोर (ST employees ) एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे सुरु आहे. मात्र, आता यावर पर्याय काढण्यास सुरवात झाली आहे. (Latur Division) लातूर विभागातील पाचही आगारामध्ये सोमवारपासून लालपरीचे स्टेअरिंग हे (Contractual Employee) कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे असणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना प्रवाशांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. 33 कंत्राटी कर्मचारी हे सोमवारपासून सेवा बजावणार असले तरी 50 कर्मचाऱ्यांची आता पर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवसांमध्ये उर्वरीत सेवाही मार्गी लागणार आहे. त्यामुळे गेल्या 95 दिवसांपासून रखडलेला प्रश्न काहीअंशी मार्गी लागणार आहे.
लातूर विभागाला 50 कंत्राटी कर्मचारी
प्रवासी सेवा पुर्ववद करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु झाले आहेत. त्याच अनुशंगाने लातूर विभागामध्ये 50 कंत्राटी चालकांची नेमणूक केली जाणार आहे. यासंबंधीची भरती प्रक्रिया ही पूर्ण झाली असून 33 कर्मचारी सोमवारपासून सेवा बजवणार आहेत. उर्वरीत 17 जणांचीही लवकरच निवड होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांची ज्याप्रमाणात भरती होईल त्यानुसार रस्त्यावर बस धावण्याची संख्या ही वाढणार आहे.
नाशिकच्या खासगी एजन्सीकडून भरती
एसटी कर्मचाऱ्यांचा संप लांबत असला तरी आता वेगळ्या पर्यायांचा विचार केला जात आहे. गेल्या 95 दिवासांपासून प्रवाशी सेवा ही कोलमडलेली आहे. त्यामुळे आता नाशिकच्या एका खासगी एजन्सीकडून चालक भरती करुन घेतले जात आहेत. पहिल्या टप्प्यात 50 कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. सेवा सुरळीत झाल्यावर यामध्ये अणखीन वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
संपकरी कर्मचारी काय भूमिका घेणार?
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हाती एसटी स्टेअरिंग गेल्यावर पुन्हा हे संपावर असलेले कर्मचारी काय भूमिका घेणार हे महत्वाचे आहे. मध्यंतरी कर्नाटक आगाराची एसटी ही उदगीर बसस्थानकात दाखल झाली असताना आमचा संप सुरु असताना ही सेवा म्हणजे संपाला काही अर्थ नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेऊन पुन्हा कर्नाटक आगाराची एसटी येण्यास विरोध केला होता. आता प्रशासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पर्याय खुला केला आहे पण त्यानंतर या कर्मचाऱ्यांकडून त्याकडे कसे पाहिले जाते हे महत्वाचे आहे.
संबंधित बातम्या :
Damage to Sugarcane: टेम्भापुरी शिवारातील ऊसाला आग, 10 एकरातील ऊस जळून खाक
दुष्काळात तेरावा : 60 एकरातील ऊस जळून खाक, 20 शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले