महाविकास आघाडी मास्टर स्ट्रोक मारणार?, एमआयएम आघाडीत येणार?; जयंत पाटील यांच्या विधानाचा अर्थ काय?

Jayant Patil on AIMIM : विधानसभा निवडणुकीचे पडघम आता खऱ्या अर्थाने वाजायला लागले आहेत. लोकसभेनंतर राज्यात नवीन सत्ता समीकरणं अस्तित्वात तर येत नाही ना? याची शंका येत आहे. या घडामोडीत महाविकास आघाडीत अजून एक पक्षाचा समावेश होत आहे का?

महाविकास आघाडी मास्टर स्ट्रोक मारणार?, एमआयएम आघाडीत येणार?; जयंत पाटील यांच्या विधानाचा अर्थ काय?
MIM ची महाविकास आघाडीत एंट्री
Follow us
| Updated on: Aug 15, 2024 | 11:08 AM

विधानसभेची लढाई पुढ्यात येऊन ठेपली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दारुगोळ्याची जमवाजमव करत आहे. नवनवीन युती, करार घडून येत आहे. विश्वास सहकाऱ्यांची चाचपणी सुरू आहे. या लढाईत मतांची भक्कम रसद मिळावी यासाठी नवीन सहकारी जोडणे सुरू आहे. तर नाराजांची पण विशेष काळजी घेण्यात येत आहे. केवळ प्रेमातच नाही तर राजकारणात पण बरेच काही ‘माफ’ असते, अशी ही स्थिती आहे. आता महाविकास आघाडीत नवीन राजकीय ‘भिडू’ येण्याची चर्चा रंगली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या या वक्तव्याने राज्याचे लक्ष वेधले आहे.

अजितदादा आता खरं मत मांडत आहेत

मला वाटतं दादाला जाऊन तिकडे वर्ष दीड वर्ष झालं. अनेक योजना त्यांनी सह्या करून मान्य केल्या. दादांनी अशी भूमिका घेतली म्हणजे यापूर्वीच्या योजना इतरांच्या दबावाखाली मंजूर केल्या गेल्या का? हा प्रश्न तयार होतो. दादा आता खरं मत व्यक्त करायला लागलेत ही चांगली गोष्ट आहे, असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला.

हे सुद्धा वाचा

आता पोलीस अधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करावं

नितेश राणे यांच्या पोलिसांविषयीच्या वक्तव्याचा पण त्यांनी खरपूस समाचार घेतला. ते पोलिसांना असं म्हणतात की तुमची अशा ठिकाणी बदली करू त्या ठिकाणी वरून पत्नीलाही बोलता येणार नाही. महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करावं. कुणाला सहानुभूती येणाऱ्या निवडणुकीत दाखवायचे. मला वाटते की अशा पद्धतीची भाषा राज्य करते पक्षाचे आमदार करतात त्यांना प्रोत्साहन कोणाचा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचा विचार महाविकास आघाडीकडे झुकण्यास काही अडचण नाही, असा सल्ला त्यांनी दिला.

एमआयएम महाविकास आघाडीत?

इम्तियाज जलील हे यायला तयार आहेत. हे व्यक्तिगत कोणाशीही बोलले नाही. आम्ही तिन्ही पक्ष आणि आमचे मित्र पक्ष शेकापा कम्युनिस्ट पार्टी समाजवादी पक्ष या सर्वांना विचारून आम्हाला ठरवावे लागेल. एमआयएम महाविकास आघाडीत येण्याविषयी जयंत पाटील यांनी अशी भूमिका स्पष्ट केली.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.