पोलीस भरतीची तयारी करणारा तरुण संसदेत का घुसला? लातूर पोलिसांच्या हाती काय माहिती मिळाली?

संसदेत घुसखोरी करुन गोंधळ घालणारा तरुण अमोल शिंदे हा महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील झरी गावचा रहिवासी आहे. संबंधित घटनेनंतर लातूर पोलीस अधिकच्या तपासासाठी झरी गावात दाखल झाले. त्यांनी अमोल शिंदे याच्या घरी जावून त्याच्या आई-वडिलांची चौकशी केली. यावेळी अमोल विषयी महत्त्वाची माहिती समोर आलीय.

पोलीस भरतीची तयारी करणारा तरुण संसदेत का घुसला? लातूर पोलिसांच्या हाती काय माहिती मिळाली?
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 5:15 PM

महेंद्र जोंधळे, Tv9 मराठी, लातूर | 13 डिसेंबर 2023 : देशाचं सर्वोच्च सभागृह मानलं जाणाऱ्या संसदेत आज महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील एका तरुणाने गोंधळ घातला. त्याच्यासोबत यावेळी एक हरियाणाची महिलादेखील होती. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित घटनेमुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. संसदेवर अशाप्रकारे कुणी घुसखोरी करुन गोंधळ कसा घालू शकतो? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. संबंधित प्रकरणानंतर पोलीस प्रशासनाला खळबळून जाग आली आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी घोषणाबाजी करणारा आणि संसदेच्या सभागृहात पिवळा धूर करणाऱ्या तरुणाचं अमोल शिंदे असं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीच्या वरिष्ठ पोलिसांकडून महाराष्ट्र पोलिसांना याप्रकरणी अधिकची माहिती मिळवण्याची सूचना करण्यात आली. त्यानंतर पोलीस अमोल शिंदे याच्या लातूर जिल्ह्यातील झरी गावात दाखल झाले.

अमोल शिंदे हा लातूरच्या चाकूर तालुक्यातील झरी गावचा रहिवासी आहे. संबंधित घटनेनंतर चाकूर पोलीस तातडीने झरी गावात दाखल झाले. ते झरी गावात विचारपूस करत अमोल शिंदे याच्या घरी पोहोचले. यावेळी पोलिसांनी अमोल शिंदे याच्या आई-वडिलांना त्याच्याविषयी माहिती विचारली. अमोल धनराज शिंदे असं त्याचं पूर्ण नाव आहे. अमोलची घरची परिस्थिती खूप बेताची आहे. त्याचे आई-वडील मजूर आहेत. ते मजुरी करुन उदरनिर्वाह भागवतात. दुसरीकडे अमोल हा शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांना चौकशीतून समोर आली आहे.

गावकऱ्यांना अमोल विषयी जास्त माहिती नाही

अमोल शिंदे हा गेल्या अनेक दिवसांपासून काय करत होता? याची चौकशी पोलिसांनी यावेळी केली. पोलिसांनी त्याच्या झरी गावातील नागरिकांची चौकशी केली. अमोलच्या नातेवाईकांशी चर्चा केली. गावातील नागरिकांशी चर्चा केली. गावातील कुणालाही अमोल याच्याविषयी जास्त माहिती नाही. अमोलला गावात राहायला आवडत नसे, अशी देखील माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.

अमोल पोलीस भरतीची तयारी करायचा

पोलिसांनी अमोल शिंदे याच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी केली. तसेच त्याच्या घरात कागदपत्रे ठेवलेल्या भागाची झडती घेतली आहे. पोलिसांनी त्याच्या आई-वडिलांची चौकशी केली असता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली. अमोल शिंदे हा गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीची तयारी करत होता. तो कुटुंबिय आणि गावापासून दूर राहत होता. तो गेल्या 15 दिवसांपूर्वी दिल्लीला जातो असं आई-वडिलांना सांगून निघून गेला होता, अशी माहिती समोर आलीय. अमोल शिंदे हा दिल्लीत का गेला? नेमकं काय काम होतं? त्याच्यासोबत कोण-कोण होतं? याचा तपास पोलीस आता करत आहेत.

Non Stop LIVE Update
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.