लातूरमध्ये बांबूपासून होणार इथेनॉल रिफायनरची निर्मीती, अर्थकारणाला गती देण्याासाठी 5 हजार एकरावर बांबू लागवड
गत महिन्यातच मांजरा नदीकाठच्या भागात बांबू लागवडीचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेला आहे. जिल्ह्यात मांजरा नदीचे पात्र जेवढ्या क्षेत्रावर आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी बांबू लागवड करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. आता लातूरच्या ग्रामीण भागातील अर्थकारणाला गती देण्यासाठी जिल्ह्यात 5 हजार एकरावर बांबूची लागवड करावी. येत्या काळात जिल्ह्यात सहकारी तत्वावर बांबू पासून इथेनॉल तयार करण्याची रिफायनरी सुरु करणार असल्याची घोषणा राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केली आहे.
लातूर : गत महिन्यातच (Manjra River) मांजरा नदीकाठच्या भागात बांबू लागवडीचा उपक्रम (District Administration) जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेला आहे. जिल्ह्यात मांजरा नदीचे पात्र जेवढ्या क्षेत्रावर आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी बांबू लागवड करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. आता लातूरच्या ग्रामीण भागातील अर्थकारणाला गती देण्यासाठी जिल्ह्यात 5 हजार एकरावर (Bambu Cultivation) बांबूची लागवड करावी. येत्या काळात जिल्ह्यात सहकारी तत्वावर बांबू पासून इथेनॉल तयार करण्याची रिफायनरी सुरु करणार असल्याची घोषणा राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. जिल्ह्यातील लोदगा येथे ‘अलमॅक बायोटेक लॅब’ ची उभारणी केल्यापासून बांबू लागवडीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमात बांबूसाठी योग्य मार्केट मिळवून देण्याची घोषणा त्यांनी केली होती तर आता या लॅबच्या दुसऱ्या टप्प्यातील उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्ह्यात सहकारी तत्वावर बांबू पासून तयार होणाऱ्या इथेनॉलची रिफायनरी उभं करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले आहे.
सोयाबीनची जागतिक बाजारपेठ आता इथेनॉलची रिफायनरी
भारताच्या ईशान्य भागात आसाम मध्ये नुमालीगड येथे सर्वात मोठी बांबू इथेनॉल रिफायनरी उभी राहत आहे. ती रिफायनरी आपल्यासाठी मोठी आशादायी ठरेल असे सांगून लातूर जिल्ह्यात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्या काळी सोयाबीनवर प्रक्रिया करणारा उद्योग उभं करण्यासाठी चालना दिली. त्यामुळेच सोयाबीन हब म्हणून लातूर जिल्हा देशभरात ओळखला जात असल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले. आता त्याच प्रमाणे सहकारी तत्वावर बांबू पासून तयार होणाऱ्या इथेनॉलची रिफायनरी उभं करण्याचा प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बांबू लागवडीमध्ये पाशा पटेल यांचे योगदान
देशातील बांबूचा ब्रँड म्हणून पाशा पटेल यांची ओळख होत असून आपण त्यांच्या या शेतकरी हिताच्या कामाला मदत करु असे आ. अभिमन्यू पवार यांनी यावेळी सांगितले. त्यावेळी त्यांनी लोदगा येथील अलमॅक बायोटेक लॅब देशात पहिली बांबू वरली टीश्यू कल्चर लॅबरोटरी असून आज घडीला एक तासात 5 हजार रोपटे तयार होतात. येत्या काळात या लॅबरोटरीतून 150 कोटी रोप तयार करण्यात येतील आणि पूर्णपणे यांत्रिक पद्धतीने होतील असे सांगून त्यांनी बांबूचे महत्व विशद केले. यावेळी महाराष्ट्र बांबू बोर्डचे संचालक पी. बी. भालेराव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्त्तात्रय गवसाने,आंतरराष्ट्रीय बांबू तज्ञ संजीव करपे, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार भरत सूर्यवंशी, अभिजित साळुंखे तसेच विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
संबंधित बातम्या :
Latur Market : आवक सोयाबीनची चर्चा तुरीची, बाजारातील दरानुसार शेतकऱ्यांची भूमिका..!