AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur: कर भरणा करणाऱ्या ग्रामपंचायतींचा ‘असा’ हा गौरव, उद्दिष्टपूर्तीसाठी उरला महिना?

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवून एका दिवसामध्ये कोट्यावधींचा कर हा अदा केला आहे. ग्रामपंचायतींना प्रोत्साहन मिळावे या अनुशंगाने आता ज्या ग्रामपंचायतीने अधिकचा कर भरलेला आहे अशा ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्यावतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे.

Latur: कर भरणा करणाऱ्या ग्रामपंचायतींचा 'असा' हा गौरव, उद्दिष्टपूर्तीसाठी उरला महिना?
लातूर जिल्हा परिषद
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 9:33 AM

लातूर : ग्रामपंचायतींचा कारभार म्हणलं की त्यावर प्रश्नचिन्ह हे उपस्थित केले जातात. मग ते विकास कामाबाबत असोत की अन्य बारा भानगडीमुळे. मात्र, सध्या (Latur District) लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या तत्पर कारभाराची चर्चा जोमात सुरु आहे. कारण सध्या सुरु असलेल्या आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत (Tax Collection) ग्रामपंचायतींकडून कर वसुली मोहिम राबवली जात आहेत. यामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवून एका दिवसामध्ये कोट्यावधींचा कर हा अदा केला आहे. (Gram panchayat) ग्रामपंचायतींना प्रोत्साहन मिळावे या अनुशंगाने आता ज्या ग्रामपंचायतीने अधिकचा कर भरलेला आहे अशा ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्यावतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरीत महिन्याभरात अधिकचा कर वसुल होईल असा विश्वास जिल्हा प्रशासानाला आहे. सर्वाधिक कर हा निलंगा तालुक्यातील ग्रामपंचायतींनी अदा केलेला आहे. शिवाय उद्दीष्ट साध्य करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार असल्याचे सीईओ अभिनव गोयल यांनी सांगतिले आहे.

एकाच तालुक्यातील 116 ग्रामपंचायतींचा सहभाग

नोव्हेंबर 2021 पासून दर 24 तारखेला हा कर वसुलीचा उपक्रम राबवला जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना वसुलासाठी वेळ मिळतो व जिल्हा परिषदेकडूनही योग्य नियोजन होते. गेल्या तीन महिन्यापासून असलेल्या या अभिनव उपक्रमामुळे कर वसुलीत वाढच झालेली आहे. या अमृत महोत्सव अंतर्गत नोव्हेंबर 2021 पासून प्रत्येक महिन्याच्या 24 तारखेला विशेष कर वसुली मोहीमेत एकट्या निलंगा तालुक्यातील 116 ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवलेला आहे. गत महिन्यातील 24 तारखेला तर एकाच दिवशी 1 कोटी 99 लाख रुपये वसुल झाले होते. ही रेकॉर्ड ब्रेक वसुली असल्याने अधिकचा कर अदा करणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्यादतीने प्रशस्ती पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या विशेष मोहिमेचे फलीत

राज्य सरकारने ठरवून दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. याकरिता पथकांची नेमणूक करण्यात आली असून ग्रामपंचायतीच्या वसुलीचा आढावा घेतला जात आहे. शिवाय ज्या ग्रामस्थांनी कर अदा केला नाही त्यांच्यावर काय कारवाई होणार हे देखील सांगितले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा सहभाग वाढत असून घरपट्टी, नळपट्टी ही अदा केली जात आहे. अजूनही महिनाभर उद्दीष्टपूर्तीसाठी उपक्रम राबवले जाणार असल्याचे सीईओ यांनी सांगितले आहे.

या ग्रामपंचायतींचा उत्स्फुर्त सहभाग

ग्रामस्थांनी थकीत कर ग्रामपंचायतीकडे अदा करण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केले होते. त्यानुसार निलंगा तालुक्यातील ग्रमपंचायतीने अधिकचा सहभाग नोंदवला आहे. 24 जानेवारी रोजी उदगीर तालुक्यातील मलकापूर ग्रामपंचायतीने 7 लाख 73 हजार, रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव 5 लाख 59 हजार रुपये, नळगीर (उदगीर) या ग्रामपंचायतीने 3 लाख 85 हजार तर निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी, अंबुलगा बु, पानचिंचोली, नणंद, रामलिंग मूदगड, हालसी हत्तरगा, कासार बालकुंदा या ग्रामपंचायतीने 1 लाखापेक्षा जास्त कर वसुल केला आहे.

संबंधित बातम्या :

“बंडातात्यांच्या पाठीमागचा बोलावता धनी दुसराच”, मुलाबद्दल वक्तव्यामुळं बाळासाहेब पाटील अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, मिटकरींची ट्विटद्वारे टीका

Nanded| अर्धापूर, नायगाव, माहूर नगरपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष 14 फेब्रुवारी रोजी ठरणार, काय आहे पुढील प्रक्रिया?

अशा चोरांना वाटत असेल पाप फिटेल, मात्र साईबाबा त्यांना योग्य शिक्षा देईल-सुजय विखे

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती.
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग.
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.