‘लोकांना अळ्या, उंदरांच्या लेंड्या, झुरळ खायला घालणं हा त्यांचा आनंद?’; ठाकरेंचा खोचक सवाल

"कुणाला आनंदाचा शिधा मिळाला आहे का? ज्यांना नाही मिळाला ते नशिबवान आहेत. मिळाला त्यांना विचारा, त्या आनंदाच्या शिधामध्ये काय होतं? अळ्या, उंदराच्या लेंड्या, झुरळ, हा मिंद्यांचा म्हणजे एकनाथचा आनंद, जो लोकांना अळ्या, उंदरांच्या लेंड्या, झुरळ खायला घालतो, हा यांचा आनंद?", असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

'लोकांना अळ्या, उंदरांच्या लेंड्या, झुरळ खायला घालणं हा त्यांचा आनंद?'; ठाकरेंचा खोचक सवाल
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 4:26 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची लातूरमध्ये आज प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी आनंदाच्या शिधावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही सडकून टीका केली. “अरे तुम्ही काय योजना आणताय? आजपर्यंत तुम्ही काही दिलं नाही. द्यायचं असतं तर तुम्ही अडीच वर्षात देवून दाखवलं असतं. आम्ही ज्या काही घोषणा दिल्या आहेत ते वचननाम्यातून दिल्या आहेत. एकतर आनंदाचा शिधा जो वाटत आहेत, कुणाला आनंदाचा शिधा मिळाला आहे का? ज्यांना नाही मिळाला ते नशिबवान आहेत. मिळाला त्यांना विचारा, त्या आनंदाच्या शिधामध्ये काय होतं? अळ्या, उंदराच्या लेंड्या, झुरळ, हा मिंद्यांचा म्हणजे एकनाथचा आनंद, जो लोकांना अळ्या, उंदरांच्या लेंड्या, झुरळ खायला घालतो, हा यांचा आनंद? आणि ह्यांना पुन्हा डोक्यावर घेऊन नाचायचं?”, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी दीड वर्षांपूर्वी आले होते. मुंबईकरांना फसवण्यासाठी रस्त्याच्या कामांचा शुभारंभ केला. कचाकच नारळ फोडले. काही कामे हे आपण केलेल्या कामांवर पुन्हा एकदा नारळ फोडून शुभारंभ केला. आपण भांडं फोडलं की, हे मूळ काम कितीचं होतं, किती हजार कोटींनी वाढले, हे सगळे पैसे मिंदेंच्या कॉन्ट्र्रक्टरच्या खिशात जातात. ही लढाई केवळ उद्धव ठाकरेंची नाही तर तुमची आहे, तुमच्या आयुष्याची आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘महाराष्ट्र काय म्हणून ओळखला जायला पाहिजे?’

“तुम्ही ठरवलं पाहिजे की, तुमचं आयुष्य, तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य, तुम्ही दरोडेखोरांच्या हातामध्ये देणार की निष्ठावंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये देणार? महाराष्ट्र काय म्हणून ओळखला जायला पाहिजे की अदाणीचा लाचार महाराष्ट्र म्हणून ओखळला जायला पाहिजे? हे तुम्ही ठरवायचं आहे. हा महाराष्ट्र मोदी आणि दिल्लीत बसून हाकता येणार नाही”, असंदेखील उद्धव ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले’

“या महाराष्ट्राने अनेकवेळेला, ज्या ज्या वेळेला गरज लागली, अगदी यशवंतराव चव्हाण यांच्यापासून स्वराज्य स्थापनेसाठी, स्वातंत्र्यासाठी सुद्धा महाराष्ट्राने जेवढे क्रांतीकारक दिले, क्वचितच दुसऱ्या राज्याने दिले असतील. नाही दिले असं मांझं म्हणणं नाही. बंगालने दिले, उत्त प्रदेशने दिले, पण महाराष्ट्राने जेवढा स्वातंत्र्यासाठी त्याग केलेला आहे, तो महाराष्ट्र नेहमी देशासाठी, देश वाचवण्यासाठी राहिलेला आहे. म्हणूनच सेनापती बापट बोलले होते, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. मोदी आणि शाह हा महाराष्ट्र संपवायला निघाले आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.