साईड देण्यावरुन वाद, भरधाव कारने दुचाकीला ठोकलं, आईसह 3 वर्षीय लेकीचा मृत्यू

लातूर-औसा रस्त्यावर भीषण अपघातात आईसह 3 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. तसेच एक जण जखमी आहे. या घटनेनंतर कारमधील पाच जणांवर औसा पोलिसांनी मृत्यूस कारणीभूत ठरवत हलगर्जीपणाने कार चालवत आई आणि मुलीची हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

साईड देण्यावरुन वाद, भरधाव कारने दुचाकीला ठोकलं, आईसह 3 वर्षीय लेकीचा मृत्यू
लातूरमध्ये अपघातात महिला आणि मुलीचा मृत्यू
Follow us
| Updated on: Oct 04, 2024 | 7:08 PM

लातूर-औसा रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात आईसह 3 वर्षीय लेकीचा मृत्यू झाला आहे. भरधाव कारने एका दुचाकीला धडक दिली. या धडकेत एका महिलेसह तिच्या तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. कारमधील पाच जणांवर औसा पोलिसांनी मृत्यूस कारणीभूत ठरवत हलगर्जीपणाने कार चालवत आई आणि मुलीची हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे ही घटना ड्रिंक अँड ड्राईव्हमधून घडली असल्याचा पोलिसांना संशय आहे.

गंभीर जखमी असलेल्या सादिक शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील पाच जण मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांच्याशी साईड देण्यावरून वाद झाला. त्यानंतर ते बाईकवरून आपल्या पत्नी आणि मुलांना घेऊन पुढे निघून गेले. त्यानंतर कार भरधाव वेगात पाठीमागून आली आणि कारने बाईकवरील कटुंबाला जोराची धडक दिली. ज्यामधे इक्रा शेख आणि नादिया शेख या माय-लेकींचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. तर सादिक शेख यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी सादिक शेख यांनी गाडीमधील सर्वच जन मद्यधुंद असल्याचे म्हटले आहे. तर या कारमधील जखमी असलेल्या एकाने आमच्या ड्राइव्हरने बाईकला धडक दिली असल्याचे म्हटले आहे.

बुलढाण्यात भीषण अपघात, दोन जण जागीच ठार

दरम्यान, बुलढाणा येथे काल झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. नागपूर-मुंबई महामार्गावरील चिखला फाट्यावर काल रात्री ट्रक आणि दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातात पिंपरी खंदारे येथील दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले. लोणार तालुक्यातील पिंपरी खंदारे येथील बंडू शिवाजी चौधर, तसेच दत्तात्रय बाळाजी चौधर हे दोघेजण त्यांच्या दुचाकीवर बसून बिबीवरून आपले काम आटपून पिंपरी खंदारे जात होते. मात्र मेहकरवरून जालन्याकडे जात असताना चिखल्या फाट्यावर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिलीय. या धडकेत दुचाकीस्वार दोघेही जागीच ठार झाले. यामुळे काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रॅफिक मोकळी केली. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक त्या ठिकाणाहून फरार झाला होता.

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.