Oxygen Plant Leak | सांगलीमध्ये ऑक्सिजन प्लांटला गळती, जिल्हाधिकाऱ्यांची घटनास्थळाला भेट
मिरज येथील शासकीय कोविड हॉस्पिटलमधील ऑक्सिजन प्लांटला गळती लागल्याचा प्रकार येथे घडला आहे. (oxygen plant leak sangli miraj covid hospital)
सांगली : मिरज येथील शासकीय कोविड हॉस्पिटलमधील ऑक्सिजन प्लांटला गळती (oxygen plant leak) लागल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा ऑक्सिजन प्लांट 6 KL क्षमतेचा असून ऑक्सिजन गळती थांबविण्यात आली आहे. वॉलच्या ठिकाणी किरकोळ ऑक्सिजन गळती झाल्याची माहिती आहे. दरम्यान, सर्व रुग्ण सुरक्षित असल्याचं सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितलं आहे. त्यांनी स्वत: घटनास्थळाला भेट दिली आहे. (leak occurs in oxygen plant of Sangli Miraj government Covid hospital)
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या
मिरज शासकीय कोविड हॉस्पिटलमधील ऑक्सिजन प्लांटला गळती लागल्याचे समोर आल्यानंतर येथे एकच खळबळ उडाली. रुग्णालयातील कर्मचारी तसेच इतर अधिकाऱ्यांनी ऑक्सिजन प्लांटकडे धाव घेतली. तसेच हा प्रकार समोर आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने अग्निशमन दलाशी तत्काळ संपर्क साधला. घटनेची माहिती होताच येथे अग्निशमन दलाने येथे धाव घेतली. सध्या ऑक्सिजन प्लांटमधून होणारी ऑक्सिजनची गळती रोखण्यात आली आहे .
दुसरा प्लांट असल्यामुळे रुग्णांवर परिणाम नाही
ऑक्सिजन प्लांटला गळती लागल्याचे समोर आल्यानंतर येथील रुग्णालय प्रशासन काही काळासाठी चिंतेत पडले. पण या रुग्णालयात दुसरा ऑक्सिजन प्लांट असल्यामुळे रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले. चौधरी यांनी स्वत: घटनास्थळाला भेट दिली आहे.
राज्यात आज 15,169 नवीन रुग्णांचे निदान
राज्यात आज 15,169 नवीन रुग्णांचे निदान झाले असून, राज्यात आज 285 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यूदर हा 1.67 टक्के एवढा झालाय. राज्यात आज 15,169 नवीन रुग्ण सापडल्यानंतर आज रोजी एकूण 2,16,016 सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 57,76,184 झालीय.
राज्यात आज 29,270 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत
राज्यात आज 29,270 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आजमितीस एकूण 54,60,589 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.54 % एवढे झाले. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,55,14,594 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57,76,184 (16.26 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 16,87,643 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 7,418 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
पाहा व्हिडीओ :
इतर बातम्या :
क्वारंटाईन सेंटरमधून 23 पंखे, नळाच्या तोट्या, बल्ब पळविले; चहा विकणाऱ्या भामट्याला बेड्या
45 वर्षावरील दिव्यांगांना लसीकरणात प्राधान्य, ठाणे पालिकेचा मोठा निर्णय
(leak occurs in oxygen plant of Sangli Miraj government Covid hospital)