घराच्या अंगणात खेळणाऱ्या चिमुरडीवर बिबट्याची झडप, आजीच्या हाताला झटका देऊन हल्ला

घराच्या अंगणात खेळत असलेल्या 3 वर्षीय चिमुरडीचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झालाय (Leopard attack in Shrirampur). अहमदनगर जिल्हयातील श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब शिवारात ही घटना घडली.

घराच्या अंगणात खेळणाऱ्या चिमुरडीवर बिबट्याची झडप, आजीच्या हाताला झटका देऊन हल्ला
Follow us
| Updated on: Feb 01, 2020 | 8:30 AM

अहमदनगर : घराच्या अंगणात खेळत असलेल्या 3 वर्षीय चिमुरडीचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झालाय (Leopard attack in Shrirampur). अहमदनगर जिल्हयातील श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब शिवारात ही घटना घडली. ज्ञानेश्वरी नामदेव मारकड असं या मुलीचं नाव आहे. ज्ञानेश्वरी घराच्या अंगणात आजीच्या कुशीत खेळत होती. त्याचवेळी बिबट्याने या चिमुरडीला आजीच्या हातातून हिसका देऊन ओढून नेलं (Leopard attack in Shrirampur). त्यामुळे नागरिकांकडून मोठी हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास ज्ञानेश्वरी आपल्या आजीसोबत घराच्या अंगणात खेळत होती. त्याचवेळी बाजूच्या उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने आजीच्या हाताला हिसका देवून ज्ञानेश्वरीवर झडप घातली. बिबड्याने या चिमुरडीला जवळपास 100 ते 150 फुट उसाच्या शेतात ओढत नेलं. घटनेनंतर कुटुंबीयांनी आणि नागरिकांनी तात्काळ आरडा-ओरडा जीव मुठीत धरून मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जखमी अवस्थेतील मुलगी सापडली. तिला प्रवरा मेडिकल ट्रस्ट, लोणी येथील अतिदक्षता विभागात भर्ती करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी गणपतीची आरती आटोपून येत असलेल्या मुलास आजीच्या हातातून बिबट्याने ओढून नेल्याचीही घटना घडली आहे. ही घटना लोक विसरलेले नसतानाच पुन्हा तशीच घटना घडल्याने नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वनविभागाने नरभक्षक बिबट्याला तात्काळ जेरबंद करावं, अशी मागणी नागरिक करत आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.