बिबट्या शाळा परिसरात, विद्यार्थी घरी… बिबट्याच्या दहशतीमुळे छत्रपती संभाजीनगरमधील शाळा बंद

leopard in chhatrapati sambhajinagar: बिबट्यासाठी ट्रॅप कॅमेरा, पिंजरा ठेवूनही बिबट्या सापडला नाही. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या बिबट्याल्या सापळ्यात अडकवण्यासाठी पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून बकरी ठेवली आहे. परंतु पिंजऱ्यातील बकरी जिवंत आहे, बिबट्या मात्र त्या पिंजऱ्यापर्यंत आलेला दिसत नाही.

बिबट्या शाळा परिसरात, विद्यार्थी घरी... बिबट्याच्या दहशतीमुळे छत्रपती संभाजीनगरमधील शाळा बंद
leopard
Follow us
| Updated on: Jul 18, 2024 | 12:31 PM

जंगले कमी होऊ लागली आहे. यामुळे वन्यप्राणी भक्ष्याच्या शोधासाठी शेती अन् गावाकडे येऊ लागली आहे. अनेक जंगलांजवळील गावांमध्ये बिबट्या येण्याचे प्रकार अधूनमधून समोर येत असतात. परंतु आता बिबट्यांची धाव मोठ्या शहरांपर्यंत आली आहे. छत्रपती संभाजीनगरात एका बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. यामुळे गेल्या तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरातील चार मोठ्या शाळा बंद आहेत. प्रशासनाने बिबट्याच्या दहशतीमुळे या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या भागांत दिसला बिबट्या

छत्रपती संभाजीनगरात अग्निहोत्र चौकाकडून खिंवसरा पार्क, उल्कानगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गर्द झाडी आहेत. हा भाग नागरी वस्तीचा आहे. या भागाच्या जवळच जैन इंटरनॅशनल, गुरुकुल ऑलिम्पिक, पोतदार इंटरनॅशनल या शाळा आहेत. या परिसरात एक बिबट्या दिसून आला. हा बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून वन विभागातील कर्मचारी त्याचा शोध घेत आहेत. परंतु तो सापडत नाही. यामुळे जैन इंटरनॅशनल, गुरुकुल ऑलिम्पिक, पोतदार इंटरनॅशनल आणि इतर एक या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. बिबट्याच्या दहशतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील चार मोठ्या शाळा बंद झाल्याचा प्रकार प्रथमच घडत आहे.

तीन दिवसांपासून परिसरात दहशत

गेल्या तीन दिवसांपासून जैन इंटरनॅशनल, गुरुकुल ऑलिम्पिक, पोतदार इंटरनॅशनल आणि इतर एक शाळा परिसरात बिबट्याची दहशत आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळेत येत नाहीत. प्रशासनाकडून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या भागातील नागरिक भीतीने बाहेर पडणे टाळत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर असताना त्या बिबट्या पकडण्यात अजूनही यश नाही. यामुळे परिसरातील नागरिक दहशतीखाली आहे. तसेच या भागात बिबट्या दिसला, म्हणून सोशल मीडियावर अफवाही सुरु आहेत. सोशल मीडियावरील या पोस्टमुळे नागरिक अजूनच जास्त भीतीखाली आहे.

हे सुद्धा वाचा

पिंजऱ्यातील भक्ष्य जिवंतच

बिबट्यासाठी ट्रॅप कॅमेरा, पिंजरा ठेवूनही बिबट्या सापडला नाही. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या बिबट्याल्या सापळ्यात अडकवण्यासाठी पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून बकरी ठेवली आहे. परंतु पिंजऱ्यातील बकरी जिवंत आहे, बिबट्या मात्र त्या पिंजऱ्यापर्यंत आलेला दिसत नाही. उल्कानगरीमध्ये बिबट्या सापडला नसल्यामुळे वन विभागाचे कर्मचारी रात्रीही या भागात बसून आहेत. नागरिकांना वन्यप्राणी दिसल्यास १९२६ या टोल फ्री नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब तौर यांनी केले आहे.

सर्वात मोठ्या मॉलजवळ बिबट्या दिसल्या

छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वात मोठ्या मॉलजवळ बिबट्या दिसला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात बिबट्याची दहशत आहे आता तर थेट मॉलच्या दरवाजात बिबट्या दिसला आहे. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास बिबट्या मॉलच्या प्रवेश द्वाराजवळ दिसला. सुदैवाने दरवाजा बंद असल्याने बिबट्या बाहेरूनच परत फिरला.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.