आळेफाटा येथे भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी ; अन नागरिकांची सेल्फीसाठी गर्दी
याच दरम्यान अतिउत्साही नागरिकांचा हुल्लडपणा दिसून आला. बिबट्या जखमी झाल्याचं समजताच नागरिकांनी मोठ्याप्रमाणात रस्त्यावर गर्दी केली. वन विभागाला कळवण्यापूर्वी अनेक नागरिकांनी त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी एकाच गर्दी केली होती.
पुणे- जिल्ह्यातील जून्नर तालुक्यात आळेफाटा परिसरात रस्त्यावर आलेल्या बिबट्याला (leopard)भरधाव वाहनाने धडक दिली आहे. या धडकेत बिबट्या जखमी झाल्याची घटना घडली आहे. आळेफाटा परिसरात( Alephata area) बिबट्याचा वावर सातत्याने दिसून येतो. काल रात्री 11वाजता रस्त्यावर अचानक बिबट्या आल्याने भरधाव गाडीची त्याला धडक बसली. जखमी बिबट्याला माणिकडोह बिबट निवारण केंद्रात नेण्यात आलं आहे. त्या ठिकाणी बिबट्यावर उपचार केले जात आहेत.याच दरम्यान अतिउत्साही नागरिकांचा हुल्लडपणा दिसून आला. बिबट्या जखमी झाल्याचं समजताच नागरिकांनी मोठ्याप्रमाणात रस्त्यावर गर्दी केली. वन विभागाला कळवण्यापूर्वी अनेक नागरिकांनी त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी एकाच गर्दी केली होती. घटनेनंतर तब्बल एक तासाने वन विभागाचे (Forest department) अधिकारी घटना स्थळावर दाखल झाले व त्यांनी बिबट्याला उपचारासाठी नेण्यात आले.
अशी घडली घटना
काल रात्री 11 च्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावर आळे शिवारात महामार्ग ओलांडत असताना बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. या घटनेत बिबट्या जखमी झाला. बिबट्याच्या कमरेच्या बाजूला घाव बसल्याने त्याला उठून चालता येत नव्हते. त्यामुळे नगरकडे जाणाऱ्या वाहनांचीमोठी वाहतूक कोंडी काही काळ निर्माण झाली. एका प्रवाशाने प्रसंगावधान राखत वनविभागाला घटनेची माहिती दिल्या नंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करून माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात नेण्यात आले आहे.