Ganesh Visarjan 2020 | पुढच्या वर्षी लवकर या…. जड अंतःकरणाने गणपती बाप्पाला निरोप, भक्तांचे डोळे पाणावले
गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या... या जयघोषात लाडक्या गणरायाला राज्यभरात निरोप देण्यात (Anant Chaturdashi 2020 ) आला.
मुंबई : गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या… या जयघोषात लाडक्या गणरायाला राज्यभरात निरोप देण्यात आला. अकरा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर जड अंतःकरणाने गणपती बाप्पाला भक्तांनी निरोप दिला. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने, कोणतीही मिरवणूक, जल्लोष न करता आज (1 सप्टेंबर) अनंत चतुर्दशीदिवशी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. राज्यातील अनेक घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींचे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. (Anant Chaturdashi 2020)
कोरोना काळात यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. गणपती बाप्पाचे विसर्जनही सोशल डिस्टंसिंग, मास्क लावून कोणतीही गर्दी न करता करण्यात आले. यावेळी विसर्जनाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच महापालिका कर्मचारी, अग्निशमन दलही तैनात होते. तसेच अनेक ठिकठिकाणी फिरत्या हौदांची व्यवस्था करण्यात आली होती.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या?? pic.twitter.com/3Rf914XdeA
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 1, 2020
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! आज माझ्या कुटुंबीयांनी लाडक्या बाप्पाचे पर्यावरणपूरक पद्धतीने घरीच विसर्जन केले. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने कोरोनाच्या संकटावर आपण लवकरच मात करू असा मला विश्वास आहे. pic.twitter.com/UlcsGOiVyR
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 1, 2020
लाडक्या गणरायाला आज निरोप दिला. पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले. अर्थात ‘पुढच्यावर्षी लवकर या’ हे मागणे मागूनच! बाप्पा मोरयाऽऽऽ #GanpatiVisarjan #GanpatiBappaMorya pic.twitter.com/CLpKeYybhj
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 1, 2020
कोणाताही सण असो वा संकट, पोलीस नेहमीच आपले कर्तव्य पार पडण्यासाठी कार्यरत असतात. गेली 6 महिन्यांतून अधिक काळ कोरोनाशी प्रत्यक्ष लढा देणाऱ्या पोलीस बंधू भगिनींनी विघ्नहर्ता गणरायाचा हा उत्सव उत्साहात पण सुरक्षितपणे आणि साधेपणाने साजरा व्हावा, ही जबाबदारी यंदाही पार पाडली आहे. pic.twitter.com/flrkMTl7Tz
— Satej (Bunty) D.Patil (@satejp) September 1, 2020
कोरोना महामारीच्या विरोधात लढण्याचे बळ दे! पुढच्या वर्षी बाप्पा आनंदाचे, सुखाचे, दिवस घेऊन ये!! अशी प्रार्थना करीत आम्ही आमच्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे मंडमा समोर तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात शासनाचे नियम पाळून विसर्जन केले. pic.twitter.com/CWfUF9FBxp
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 1, 2020
- वर्षा निवासस्थानी आज सायंकाळी गणेश विसर्जन करण्यात आले. निवासस्थान परिसरात खास तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदात गणेश मूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी श्रीमती रश्मी, मंत्री आदित्य ठाकरे आणि त्यांचे बंधू तेजस ठाकरे यांनी गणपती बाप्पाची पूजा केली.
- पुण्यात अखिल मंडई गणपतीच्या आरतीला सुरवात, थोड्याच वेळात विसर्जन
- पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन, मंदिरात तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदात मोरया मोरयाच्या गजरात दगडूशेठ गणपतीचं विसर्जन, विसर्जनावेळी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या गणपतीचंही विसर्जन
-
#WATCH मुंबई : महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अपने आवास पर गणपति विसर्जन किया। pic.twitter.com/oRbgBSwCP8
— ANI_HindiNews (@AHindinews) September 1, 2020
- मुंबईतील गणेश गल्लीच्या ‘मुंबईच्या राजा’ला भावपूर्ण निरोप
-
Live Udpates : मुंबईतील गणेश गल्लीच्या ‘मुंबईच्या राजा’ला भावपूर्ण निरोपhttps://t.co/jSwAuFHUzx#Mumbai #GaneshVisarjan2020 #GaneshChaturthi2020 pic.twitter.com/rgpiMyN4uP
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 1, 2020
- मुंबईच्या जूहू परिसरात गणेश विसर्जनाला सुरुवात, कोरोनामुळे जूहू चौपाटीवर अल्प प्रतिसाद, ना ढोल ताषा, ना गाजावाजा, शांततेत गणेशाचं विसर्जन, एरवी पाय ठेवायलाही जागा नसलेल्या जुहू चौपाटीचा यंदाचा गणेश विसर्जन सोहळा साधेपणाने
- पुण्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या गणेशाचं विसर्जन, टाळ्यांच्या गजरात विसर्जन सोहळा पार
- नाशिकमध्येही साध्या पद्धतीने गणपती बाप्पांना निरोप, फिरते हौद, कृत्रिम तलावात गणपती विसर्जन
-
Ganesh Visarjan 2020 LIVE: पुण्याचा मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळशीबाग गणपतीचे विसर्जन, आकर्षक फुलाने सजवलेली ‘श्रीं’ची पालखी, गणेश मंडळाने गणपती समोरील मयूर कुंडात लाडक्या बाप्पाचा विसर्जनhttps://t.co/jSwAuFHUzx#GaneshVisarjan2020 #GaneshChaturthi2020 #Ganeshotsav pic.twitter.com/XueB5dIlO4
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 1, 2020
- पुण्याचा मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळशीबाग गणपतीचे विसर्जन, आकर्षक फुलाने सजवलेली ‘श्रीं’ची पालखी, गणेश मंडळाने गणपती समोरील मयूर कुंडात लाडक्या बाप्पाचं विसर्जन
-
Ganesh Visarjan 2020 LIVE | पुण्यातील तिसऱ्या मानाचा ‘गुरुजी तालीम गणपती’चे विसर्जन, विसर्जनासाठी फक्त 7 कार्यकर्त्याना परवानगीhttps://t.co/UfLVzMtPW2#GaneshVisarjan2020 #GaneshChaturthi2020 #Ganeshotsav pic.twitter.com/jGb06Y9sw5
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 1, 2020
- पुण्यातील तिसऱ्या मानाचा ‘गुरुजी तालीम गणपती’चे विसर्जन, विसर्जनासाठी फक्त 7 कार्यकर्त्याना परवानगी
- पुण्याचा मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळशीबाग गणपतीचे विसर्जन, आकर्षक फुलाने सजवलेली ‘श्रीं’ची पालखी, गणेश मंडळाने गणपती समोरील मयूर कुंडात लाडक्या बाप्पाचा विसर्जन
-
Ganesh Visarjan 2020 LIVE | पुण्याचा मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीला निरोप, महापौर मुरलीधर मोहळही उपस्थित, जवळच असलेल्या कृत्रिम हौदामध्ये विसर्जनhttps://t.co/UfLVzMtPW2#GaneshVisarjan2020 #GaneshChaturthi2020 #Ganeshotsav pic.twitter.com/2ZKdyMNFpX
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 1, 2020
- पुण्याचा मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती विसर्जनला सुरुवात, मंडपातून श्रीची मूर्तीचं जवळच असलेल्या कृत्रिम हौदाकडे प्रस्थान
-
Ganesh Visarjan 2020 LIVE | पुण्यातील पहिल्या मानाचा कसबा गणपतीचे विसर्जनhttps://t.co/jSwAuFHUzx#GaneshVisarjan2020 #GaneshChaturthi2020 #Ganeshotsav pic.twitter.com/A4x6gzzNl4
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 1, 2020
- राज्यात ठिकठिकाणी गणेश भक्तांकडून बाप्पांना भावपूर्ण निरोप, पुण्यातील पहिल्या मानाचा कसबा गणपतीचे विसर्जन
- पुणेकरांचा पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात, परंपरेनुसार महापौरांकडून कसबा गणपतीला हार घालून आरती
- मनमाड येथे गणेश विसर्जनाला सुरुवात, श्री निलमणी गणेशाची विसर्जन मिरवणूक साध्या पद्धतीने निघाली, त्याअगोदर प्रभारी नगराध्यक्ष राजेंद्र अहिरे यांच्या हस्ते पूजा
- नागपुरातील फुटाळा तलाव परिसरात बाप्पाचं विसर्जन सुरु, जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप, सार्वजनिक गणपतीला नैसर्गिक तलावात विसर्जनाला बंदी, कृत्रिम तलावात घरगुती बाप्पांचं विसर्जन
- वाशिमध्ये गणरायाला भावपूर्ण निरोप, जिल्ह्यातील कामरगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत मिरवणुका न काढता बाप्पांचं विसर्जन, कापशी नदीवर ग्रामीण भागातील गणपतींचं विसर्जन
- पुण्यातील कसबा गणपतीच्या विसर्जनासाठी महापौर मुरलीधर मोहोळ पोहचले, आमदार मुक्ता टिळकही उपस्थित
- पुण्यातील मानाच्या गणपतीसह दगडूशेठ गणपतीही मंदिरातच विसर्जित होणार, रात्री 11 पर्यत सर्व गणपती विसर्जन पार पडणार, पोलिसांकडून नागरिकांना बाहेर न पडण्याचं आवाहन, जवळपास 7 हजार पोलीस शहरात विविध ठिकाणी बंदोबस्ताला
- कोल्हापुरातील मानाचा पहिला तुकाराम माळी तालीम मंडळाचा गणपती विसर्जनासाठी बाहेर पडला, थोड्याच वेळात महापौर निलोफर आजरेकर आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत बाप्पाला निरोप, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 100 मीटर अंतरावर पालखी घेऊन जात तिथंच कुंडात विसर्जन होणार
- संगमनरेमध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मानाच्या गणरायाचं पूजन, शहरातील 1895 साली स्थापन झालेल्या सोमेश्वर रंगारगल्ली मित्र मंडळाच्या मानाचा गणपतीला प्रथमच ढोल ताशाविना निरोप
- पुणेकरांचा पाचवा मानाचा गणपती अर्थात केसरीवाडा गणपतीचे 2:30 वाजता विसर्जन होणार, केसरीवाडा गणपतीचे उत्सव मंडपातच विसर्जन होणार, सभामंडपात रांगोळीच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांची मास्क घातलेली प्रतिमा साकारली
- विसर्जनासाठी कसबा गणपती मंदिराबाहेर सुंदर रांगोळी
- पुणेकरांचा पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीचे सकाळी 11:30 वाजता विसर्जन होणार, त्याआधी परंपरेनुसार महापौर 10:30 वाजता कसबा गणपतीला हार घालणार, पहिल्या मानाच्या पाठोपाठ इतर 4 मानाच्या गणपतींचे विसर्जन केले जाणार, यंदा सर्व गणपतींचे उत्सव मंडपातच विसर्जन केले जाणार
दरवर्षी अनंत चतुर्दशीदिवशी मुंबईतील रस्त्यांवर दिसणारी मोठ्या प्रमाणातील गर्दी यावेळी दिसणार नाहीये. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने गर्दीचे विभाजन करण्यासाठी 445 ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केली आहे. तसेच 23 हजार कर्मचारी, म्हणजेच दरवर्षीपेक्षा तिप्पट मनुष्यबळाची व्यवस्था केली आहे. यंदाच्या विसर्जनासाठी पालिकेने तिप्पट ते चौपट यंत्रणा तैनात ठेवली आहे.
पुण्यातही ‘आपल्या बाप्पाचं, आपल्याच घरी विसर्जन’ या आवाहनाला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. पहिल्या नऊ दिवसांमध्येच जवळपास 85 टक्के प्रतिसाद मिळाला. गणेश विसर्जनासाठी यंदा 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण 191 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली. या 10 दिवसांमध्ये फिरत्या हौदांमध्ये 20,540 मूर्ती विसर्जन आणि संकलन केंद्रावर 24 हजार 13 मूर्ती संकलन असे एकूण 44 हजार 553 गणेश विसर्जन झाले आहे. या वर्षी 9 दिवसांत एकूण 31 हजार 110 किलो निर्माल्य गोळा करण्यात आले आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही पुणेकरांना घरच्या घरीच बाप्पाला निरोप द्या असं आवाहन केलंय.
संबंधित बातम्या :
23 पारंपारिक, 135 कृत्रिम विसर्जन स्थळं, अनंत चतुर्दशीसाठी नवी मुंबई पालिकेची तयारी
प्रशासनाला साथ, औरंगाबादमध्ये 577 तर विरार परिसरात 181 मंडळांचा गणेशोत्सव रद्द