LockDown Effect | वैतागलेल्या तळीरामांनी चखना चोरला; मग दारु चोरीचा प्रयत्न, पदरी पडली घोर निराशा

लॉकडाऊन दरम्यान व्यसनाधीन लोकांची मोठी गोची होत असून दारुच्या विरहातून चक्क दुकानं फोडण्याचा प्रयत्न तळीरामांनी केल्याचे उघड झाले.

LockDown Effect | वैतागलेल्या तळीरामांनी चखना चोरला; मग दारु चोरीचा प्रयत्न, पदरी पडली घोर निराशा
Follow us
| Updated on: Mar 28, 2020 | 10:56 PM

यवतमाळ : मागील सहा दिवसांपासून देशात (LockDown In Maharashtra) संपूर्ण लॉकडाऊन आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू खेरीज इतर सर्व दुकानं बंद आहेत. त्यामुळे व्यसनाधीन लोकांची मोठी गोची होत असून दारुच्या विरहातून चक्क दुकानं फोडण्याचा प्रयत्न तळीरामांनी केल्याचे उघड झाले. पण, त्यांच्या पदरी घोर निराशा आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील आठवडी (LockDown In Maharashtra) बाजारात हा प्रकार घडला.

देशात सर्वत्र लॉकडाऊन आहे. जीवनावश्यक बाबी सोडता सर्व दुकानं बंद आहेत. दारुची दुकानं बंद असल्याने तळीरामांची चांगलीच पंचाईत होत आहे. कंटाळलेल्या तळीरामांनी यांच्यावर एक झकास उपाय योजिला आहे. आधी किराणा दुकान फोडले. चखनासाठी लागणारे सामान काजू-बदाम चोरले. मांसाहार बनवायचा बेत असल्याने त्याच दुकानातून फल्ली तेलाची बाटलीही चोरली. मसाल्याची पाकिटे चोरली.

आता प्राथमिक तयारी तर पूर्ण झाली. मग या चोर महाशयांनी आपला गळा ओला करण्यासाठी बाजुलाच असलेल्या देशी दारुच्या दुकानाकडे आपला मोर्चा वळवला. दुकानाचे (LockDown In Maharashtra) टिन वाकवून आताही ते शिरले. पण आत असलेले ग्रीलचे गेट तोडू न शकल्याने या चोर महाशयांचा बेत धुळीस मिळाला. हाय रे किस्मत, या चोर महाशयांच्या आशा धुळीस मिळाल्या.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 183 वर 

महाराष्ट्रातील कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात एका क्वारंटाईनमध्ये ठेवलेल्या 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मृतांची संख्या 6 वर पोहोचली आहे. तर कोरोनाबाधितांची संख्या 183 झाली आहे. आज (28 मार्च) जळगावमध्ये एक रुग्ण आढळला आहे. जळगावातील मेहरुन भागातील 45 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तर पुण्यात आणखी तीन रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 24 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

मुंबई – 70 (4 मृत्यू) सांगली – 24 पुणे – 24 (डिस्चार्ज 6) पिंपरी चिंचवड – 13 नागपूर 12 कल्याण – 8 नवी मुंबई – 6 ठाणे – 5 यवतमाळ – 4 अहमदनगर – 3 सातारा – 2 पनवेल – 2 कोल्हापूर – 1 गोंदिया – 1 उल्हासनगर – 1 वसई विरार – 1 औरंगाबाद – 1 सिंधुदुर्ग – 1 पालघर – 1 रत्नागिरी – 1 जळगाव – 1 गुजरात – 1 एकूण 183 – राज्यात 6 मृत्यू

(Maharashtra Corona Patients Increase)

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च – कोरोनामुक्त पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च नागपूर (1) – 12 मार्च पुणे (1) – 12 मार्च पुणे (3) – 12 मार्च ठाणे (1) – 12 मार्च मुंबई (1) – 12 मार्च नागपूर (2) – 13 मार्च पुणे (1) – 13 मार्च अहमदनगर (1) – 13 मार्च मुंबई (1) – 13 मार्च नागपूर (1) – 14 मार्च यवतमाळ (2) – 14 मार्च मुंबई (1) – 14 मार्च वाशी (1) – 14 मार्च पनवेल (1) – 14 मार्च कल्याण (1) – 14 मार्च पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च औरंगाबाद (1) – 15 मार्च पुणे (1) – 15 मार्च मुंबई (3) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च यवतमाळ (1) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च मुंबई (1) – 17 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च पुणे (1) – 18 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च मुंबई (1) – 18 मार्च रत्नागिरी (1) – 18 मार्च मुंबई (1) – 19 मार्च उल्हासनगर (1) – 19 मार्च अहमदनगर (1) – 19 मार्च मुंबई (2) – 20 मार्च पुणे (1) – 20 मार्च पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च पुणे (2) – 21 मार्च मुंबई (8) – 21 मार्च यवतमाळ (1) – 21 मार्च कल्याण (1) – 21 मार्च मुंबई (6) – 22 मार्च पुणे (4) – 22 मार्च मुंबई (14) – 23 मार्च पुणे (1) – 23 मार्च मुंबई (1) – 23 मार्च कल्याण (1) – 23 मार्च ठाणे (1) – 23 मार्च सातारा (2) – 23 मार्च सांगली (4) – 23 मार्च पुणे (3) – 24 मार्च अहमदनगर (1) – 24 मार्च सांगली (5) – 25 मार्च मुंबई (9) – 25 मार्च ठाणे (1) – 25 मार्च मुंबई (1) – 26 मार्च ठाणे (1) – 26 मार्च नागपूर (1) – 26 मार्च सिंधुदुर्ग (1) – 26 मार्च सांगली (3) – 26 मार्च पुणे (1) – 26 मार्च कोल्हापूर (1) – 26 मार्च नागपूर (4) – 27 मार्च गोंदिया (1) – 27 मार्च सांगली (12) – 27 मार्च मुंबई (6) – 27 मार्च मुंबई उपनगर (3) – 27 मार्च मुंबई (5) – 28 मार्च पुणे (1) – 28 मार्च नागपूर (2) – 28 मार्च नागपूर (1) – 28 मार्च मुंबई (7) – 28 मार्च कल्याण (2) – 28 मार्च पुणे (3) – 28 मार्च जळगाव (1) – 28 मार्च

एकूण – 183 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत भारतात कुठे किती मृत्यू?

कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च मुंबई – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च गुजरात – 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य) पश्चिम बंगाल – 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 23 मार्च मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च अन्य एकाचा मृत्यू (1) -25 मार्च मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च मुंबई – 63 वर्षीय महिलेचा कस्तुरबा रुग्णालयात  मृत्यू (1)– 26 मार्च गुजरात – दोघांचा मृत्यू (2)– 26 मार्च बुलढाणा – 45 वर्षीय रुग्णाचा मृत्यू – 28 मार्च

LockDown In Maharashtra

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.