मतदारांचा टक्का घसरला, नागपूरकरांचा संताप, रस्त्यांवर लावले असे बॅनर्स
nagpur banner on voter: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झाले. याबद्दल सुज्ञ नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तसेच मतदारांना घराबाहेर न काढू शकल्याबद्दल राजकीय पक्षही जबाबदार आहे. कमी मतदान होण्यास जिल्हा बीएलओ जबाबदार आहे.
लोकसभा निवडणुकी दरम्यान विदर्भात मतदानाचा पहिला टप्पा पूर्ण झाला. परंतु दोन्ही टप्प्यांमध्ये मतदारांनी उत्साह दाखवला नाही. निवडणूक आयोग आणि सामाजिक संघटनांनी मतदानाविषयी जनजागृती केली. परंतु त्यानंतरही 2019 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा कमी मतदान झाले. 2024 लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला. यामुळे नागपूरमधील सामाजिक संघटना आणि सुज्ञ नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. नागपूर लोकसभा मतदारसंघात फक्त 54.30 टक्केच मतदान झाले. यामुळे मतदान न करणाऱ्यांच्या निषेधाचे फलक नागपूर शहरात लावण्यात आले आहे. शहरातील ट्राफीक मार्क चौकात फलक लावण्यात आले आहे.
काय म्हटले आहे फलकावर
नागपूर लोकसभा मतदारसंघात 22 लाख 23 हजार 281 मतदारांची नोंदणी आहे. पण यापैकी तब्बल 10 लाख 15 हजार 937 लोकांनी मतदान केलं नाही, त्यामुळे ‘Shane On You’ अशाप्रकारचे निषेधाचे फलक नागपुरात लावण्यात आले आहे. ज्यांनी मतदान केले नाही, त्या मतदारांच्या सिटीझन फोरमकडून निषेध करण्यात आले आहे. या फलकांवर कुठल्याही एका व्यक्तीचं नाव नाही. या फलकाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
कोणाची आहे जबाबदारी
2024 च्या लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झाले. याबद्दल सुज्ञ नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तसेच मतदारांना घराबाहेर न काढू शकल्याबद्दल राजकीय पक्षही जबाबदार आहे. कमी मतदान होण्यास जिल्हा बीएलओ जबाबदार आहे. नागपुरात मतदान न करणाऱ्याविरोधात संताप व्यक्त होत आहे. फलक लावून मतदानाचे कर्तव्य न बजावणाऱ्यांची लाज काढली आहे. या बॅनर्सवर कोणाचे नाव नाही. परंतु मतदान करणाऱ्यांकडून हे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
असे करण्यात आले होते प्रयत्न
नागपूर लोकसभा मतदारसंघात 2019 च्या तुलनेत सुमारे 2,50,000 मतदार यादीत जोडले गेले आहेत. तसेच 80,000 मृत मतदार देखील हटवले आहेत. मतदार जागृतीचे धडे आयोजित करण्यापासून मॅरेथॉन आणि इतर स्पर्धा घेतल्या गेल्या. एमआयडीसी, कॉर्पोरेट कार्यालये आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी 450 हून अधिक बैठका घेतल्या. त्यानंतर मतदानाचा टक्का कमी झाला.