बोटाला शाई दाखवा, मोफत कटींग करा, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी केशकर्तनालयचा पुढाकार

Lok Sabha Election 2024 News in Marathi: बोटाला शाई दाखवा आणि मोफत कटींग करा... अशी मोहीम अकोल्यात एका दुकानदाराने सुरु केली आहे. यामुळे सकाळपासून अनंत कौलकार यांच्या सलूनमध्ये गर्दी झाली आहे. अनेक जण मतदानाचे कर्तव्य बजावून कटींग करण्याठी त्यांच्या दुकानात येत आहे.

बोटाला शाई दाखवा, मोफत कटींग करा, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी केशकर्तनालयचा पुढाकार
मतदान करणाऱ्यांची मोफत कटींग करताना अनंत कौलकार.
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 1:07 PM

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात मतदानाचा टक्का कमी राहिला. आता २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, मतदानाची टक्केवारी वाढवावी, यासाठी निवडणूक आयोगाकडून जनजागृती सुरु असते. सामाजिक संस्थाही आपली जबाबदारी पार पाडत असतात. त्यानंतरही अनेक जण मतदान करण्याऐवजी सरकारी सुट्टीचा उपभोग घेत घरीच थांबतात. यामुळे मतदानाचा टक्का वाढत नाही. आता मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्वसामान्य लोकांनी आपला खारीचा वाटा उचलला आहे. बोटाला शाई दाखवा, मोफत कटींग करा, असा फंडा अकोल्यातील केशकर्तनालयच्या एका संचालकाने सुरु केला आहे.

सलून दुकानात गर्दी

अकोला शहराच्या रामदास पेठ येथे अनंत कौलकार यांचे हेअर सलूनचे दुकान आहे. त्यांच्या हेअर सलूनमध्ये मतदार जनजागृती अभियान राबवले गेले आहे. “मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो…” हे स्लोगन लावले गेले आहे. तसेच बोटाला शाई दाखवा आणि मोफत कटींग करा… अशी मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. यामुळे सकाळपासून अनंत कौलकार यांच्या सलूनमध्ये गर्दी झाली आहे. अनेक जण मतदानाचे कर्तव्य बजावून कटींग करण्याठी त्यांच्या दुकानात येत आहे.

मतदानसाठी जागृती.

काय म्हणतात अनंत कौलकार

“टीव्ही ९ मराठी”शी बोलताना अनंत कौलकार म्हणाले, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचा सर्वात मोठा उत्सव सुरु झाला आहे. या उत्सवात सर्वच जणांनी सहभागी व्हावे, अशी अपेक्षा आहे. शासन-प्रशासन आपल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. परंतु त्यांचे हे प्रयत्न अपूर्ण पडतात. यामुळे सर्वसामान्यांनी आपला खारीचा वाटा उचलावा, असे मला वाटले. यामुळे “मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो…” हे घोषवाक्य करुन मतदान करुन येणाऱ्यांची मोफत कटींग सुरु केली आहे. त्याला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे अनंत कौलकार यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

मतदानसाठी जागृती.

अनंत कौलकार यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाची परिसरात चांगली चर्चा होत आहे. लोकशाहीसंदर्भात त्यांनी वाटणारी तळमळ सर्वांना झाली म्हणजे मतदानाची टक्केवारी ९० टक्क्यांवर सहज जाईल, अशी अपेक्षा तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.