TV9 Exclusive Narendra Modi interview : बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बोलताना नरेंद्र मोदी भावूक, पवार कुटुंबियांवर सडेतोड उत्तर
मुलाखातीत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले आहेत. तसेच मिनाताई ठाकरे यांच्यासंदर्भातील आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबाबत त्यांनी भूमिका मांडली आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरु आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क TV9 ला एक्सक्लूझिव्ह इंटरव्यू दिला आहे. देशभरातील अनेक प्रश्नांवर नरेंद्र मोदी यांनी रोखठोक उत्तरे दिली आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रातील राजकारणावर आपली भूमिका मांडली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शरद पवार यांच्या कुटुंबियांपर्यंत नरेंद्र मोदी बोलले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात बोलताना मात्र नरेंद्र मोदी भावूक झाले आहेत. ‘टीव्ही ९ मराठी’चे संपादक उमेश कुमावतसह TV9 ग्रुपच्या पाच संपादकांनी ही मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत तुम्ही टीव्ही ९ मराठीसह, https://www.youtube.com/@TV9MarathiLive आणि https://www.tv9marathi.com/ या ठिकाणी मुलाखत २ मे रोजी रात्री ८ वाजता पाहू शकतात.
महाराष्ट्राचा राजकारणावर परिणाम करणारी मुलाखत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ मधील सर्वात मोठी मुलाखत ‘टीव्ही-९’ ला दिली आहे. ‘टीव्ही-९’ समुहातील पाच संपादकांनी ही मुलाखत घेतली आहे. अनेक मुद्यांवर प्रथमच खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील राजकारणापासून महाराष्ट्रातील राजकारणापर्यंत सर्वच विषयांवर रोखठोक उत्तरे दिली आहेत. तसेच मुलाखतीत काही ब्रेकींग बातम्याही नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत. राम मंदिरापासून विकासापर्यंत सर्वच मुद्यांवर बोलताना ‘मोदींची गॅरंटी’ यावर त्यांनी भूमिका मांडली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बोलताना भावूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘टीव्ही ९ मराठी’चे संपादक उमेश कुमावत यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारले आहेत. मुलाखातीत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले आहेत. तसेच मिनाताई ठाकरे यांच्यासंदर्भातील आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबाबत त्यांनी भूमिका मांडली आहे. राज्यातील राजकारणात ठाकरे कुटुंबियाप्रमाणे पवार कुटुंबियांची नेहमी चर्चा असते. यामुळे पवार कुटुंबियांवर विचारलेल्या प्रश्नांना नरेंद्र मोदी यांनी उत्तरे दिली आहेत. पवार कुटुंबियांवर बोलताना त्यांनी सडेतोड उत्तरे दिली आहे. राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारी ही मुलाखत २ मे रोजी रात्री ८ वाजता ‘टीव्ही ९’ मराठीवर प्रसारीत होणार आहे.
TV9 को दिए इस खास इंटरव्यू में महाराष्ट्र को लेकर प्रधानमंत्री मोदी ने दी कई ब्रेकिंग न्यूज #PMModiOnTV9 | #LokSabhaElections2024 | @nishantchat | @sumairakh pic.twitter.com/yFXYo9WQ0F
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) May 1, 2024
टीव्ही ९ वर दाखवण्यात येणाऱ्या या मुलाखतीसंदर्भात रिट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या X अकाउंटवरुन केले आहे. त्यात सात भाषांमधील ही मुलाखत पाहण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे.