मोठी बातमी! महायुतीच्या सभेत मंत्री तानाजी सावंत यांची जाहीर नाराजी, अजित पवारांसमोर मोठा इशारा

धाराशिवच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने धाराशिवमध्ये महायुतीची आज जाहीर सभा पार पडली. या सभेत मंत्री तानाजी सावंत यांनी महायुतीच्या सर्व दिग्गज नेत्यांसमोर भर सभेत आपली नाराजी भाषणातून बोलून दाखवली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यासमोर मोठा इशारा देखील दिला.

मोठी बातमी! महायुतीच्या सभेत मंत्री तानाजी सावंत यांची जाहीर नाराजी, अजित पवारांसमोर मोठा इशारा
तानाजी सावंत आणि अजित पवार यांचा फोटो
Follow us
| Updated on: Apr 19, 2024 | 8:54 PM

महायुतीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने महायुतीकडून आज जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. महायुतीची धाराशिवमध्ये जाहीर सभा पार पडली. अर्चना पाटील या भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहे. महायुतीत धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सोडण्यात आला आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर दावा होता. या मतदारसंघात विद्यमान खासदार हा गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरच निवडून आला होता. त्यामुळे मंत्री तानाजी सावंत या जागेसाठी प्रचंड आग्रही होते. पण राष्ट्रवादीसाठी ही जागा सुटली आणि भाजपचे नेते राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करुन त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे तानाजी सावंत हे नाराज झाले आहेत. त्यांनी आपली ही नाराजी आजच्या महायुतीच्या धाराशिवमधील प्रचारसभेत जाहीरपणे बोलूनही दाखवली. तसेच त्यांनी अजित पवार यांच्यासमोर मोठा इशारादेखील दिला.

तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले?

“खरं तर त्या गोष्टीला वेळ आहे. पण परखड बोलतो. 26 जानेवारीला महायुतीचा धनंजय सावंत यांनी प्रचार सुरु केला आहे. हा मतदार कडवट शिवसैनिकांचा आहे. तो बाणा तो कधीही सोडणार नाही. तरीसुद्धा आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठरवले आहे की, हा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळला सोडायचा. ज्या-ज्या वेळेस पुढच्या व्यासपीठावर येऊ, त्यावेळी समोरच्याचा फडशा पाडल्याशिवाय राहणार नाही. या प्रकारे शिवसेनेचा एक-एक मतदारसंघ कमी होत राहिला तर शिवसैनिक आणि मी स्वतः सहन करणार नाही”, असा इशारा तानाजी सावंत यांनी अजित पवार यांच्यासमोर दिला.

“धाराशिव मतदारसंघ शिवसेनेचा आहे. इथून शिवसेनाचा खासदार जास्त वेळेस निवडून गेलेला आहे. एक वेळ राष्ट्रवादीचा खासदार निवडून गेला आहे. आम्हा शिवसैनिकांवर हा अन्याय आहे. मात्र अबकी बार 400 पार असा नारा आहे, विश्वनेता नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपले दुःख विसरून शिवसैनिकांना मानाचा मुजरा आणि विनंती करतो की, अर्चना पाटील यांना निवडून द्या . अर्चना पाटील यांच्यासाठी छातीचा कोट करुन उभा राहीन”, असं तानाजी सावंत म्हणाले.

अजित पवार काय म्हणाले?

मंत्री तानाजी सावंत यांनी जाहीर केलेल्या नाराजीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. “प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. त्यांनी त्यांची खंत बोलून दाखवली तरी त्यांनी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याकरता महायुतीचा उमेदवार कसा निवडून येईल, यासाठी प्रयत्न करावे, असं ते म्हणाले. ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतील. त्यांचं ऐकून घेऊन योग्य ते मार्ग काढतील”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.