Tv9 Polstrat Opinion Poll 2024 : अजित पवार गट भुईसपाट, एकनाथ शिंदेंना जबर धक्का, महाराष्ट्राचा ओपिनियन पोल काय सांगतो?

Tv9 Polstrat Opinion Poll for Lok Sabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान येत्या 19 एप्रिलला होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे 3 दिवस बाकी आहेत. असं असताना Tv9 चा सर्वात मोठा ओपिनियन पोल समोर आला आहे. या ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

Tv9 Polstrat Opinion Poll 2024 : अजित पवार गट भुईसपाट, एकनाथ शिंदेंना जबर धक्का, महाराष्ट्राचा ओपिनियन पोल काय सांगतो?
ajit pawar eknath shinde
Follow us
| Updated on: Apr 17, 2024 | 1:10 PM

लोकशाहीचा महापर्व मतदानाआधी Tv9 चा देशातील सर्वात मोठा ओपिनियन पोल समोर आला आहे. या ओपिनियन पोलमध्ये देशभरातील सर्व 543 जागांचा सर्व्हे करण्यात आला आहे. Tv9, Peoples Insight, Polstrat च्या सर्व्हेत जवळपास 25 लाख नागरिकांचा सँपल साईज आहे. या ओपिनियन पोलमध्ये COMPUTER ASSISTED TELEPHONE INTERVIEWING च्या अंतर्गत नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यात आली आहे.

देशातील सर्वात विश्वासार्ह ओपिनियन पोलच्या या सर्वेक्षणासाठी रँडम नंबर जनरेटरद्वारे कॉल करण्यात आला होता. यामध्ये लोकसभेच्या सर्व 543 जागांचा समावेश करण्यात आला होता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सर्वेक्षणात लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून नमुने घेण्यात आले. हे काम 1 एप्रिल ते 13 एप्रिल या कालावधीत करण्यात आले, ज्यामध्ये देशभरातील 4123 विधानसभा जागांचा नमुना घेण्यात आला.

महाराष्ट्राचा ओपिनियन पोल काय?

देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान येत्या 19 एप्रिलला होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे 3 दिवस बाकी आहेत. असं असताना Tv9 चा सर्वात मोठा ओपिनियन पोल समोर आला आहे. या ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या गटाचं खातं देखील उघडणार नाही, अशी ओपिनियन पोलची आकडेवारी सांगत आहे. महाराष्ट्रात अजित पवार गट भुईसपाट होणार आहे. तर एकनाथ शिंदे यांनाही या निवडणुकीत जबर फटका बसण्याची शक्यता आहे. ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे केवळ तीन जागा आगामी लोकसभा निवडणुकीत निवडून येण्याची शक्यता आहे.

कुणाला किती जागा?

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. टीव्ही 9 च्या ओपिनियन पोलनुसार, भाजपला लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक 25 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 10 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत काँग्रेसला 5 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षालाही 5 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला केवळ 3 जागांवर समाधान मानालं लागण्याची शक्यता आहे तर अजित पवार गटाला एकाही जागेवर यश मिळणार नाही, असा दावा ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार करण्यात येतोय.

कुणाला किती टक्के मतं?

कुणाला किती टक्के मतं मिळणार? याबाबतची टीव्ही 9 च्या ओपिनियन पोलच्या सर्व्हेमध्ये माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात एनडीएला 40.22 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडीला 40.97 टक्के मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे संभाजीनगरची जागा महायुती जिंकू शकते. धुळे लोकसभेची जागा भाजप जिंकू शकते. लातूरची जागा काँग्रेस जिंकू शकते. मुंबई उत्तर लोकसभेतून निवडणुकीच्या मैदानात असलेले पीयूष गोयल यांचाही विजय होण्याची शक्यता आहे. तर मावळमध्ये उद्धव ठाकरे गटाचा विजय होऊ शकतो. तसेच बारामतीची जागा शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे जिंकण्याची शक्यता आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.