lok sabha election 2024: शेतकऱ्यांचा अनोखा फंडा, कुठे कांदे, कुठे टोमॅटोचा वापर करुन मतदान
lok sabha election 2024: दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर मोबाईल बंदी असताना मतदान करतानाचे मोबाईलवर एका शूटिंग केले आहे. त्याचे मतदान करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. टोमॅटोच्या साह्याने बटन दाबून मतदान करतानाचा हा व्हिडिओ आहे.
लोकसभा निवडणुकीचा राज्यातील शेवटचा टप्पा आज सुरु आहे. या लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी अनोखा फंडा वापरला आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदे आणि टोमॅटोचा वापर करत मतदान केले. शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांनी केलेल्या या प्रकाराची चांगली चर्चा रंगल होती.
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथील काही तरुण शेतकऱ्यांनी कांद्याला भाव नसल्याने निषेध म्हणून कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला जाण्याचा प्रयत्न केला. या तरुणांना मतदान केंद्राचे गेटवरवरच पोलिसांनी अडवत गळ्यातील कांद्याच्या माळा काढण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांबरोबर त्यांची शाब्दिक चकमक झाली. अखेर गळ्यातील माळा काढून ठेवत मतदानाला गेले.
कांद्याच्या माळा गळ्यात घालून शेतकऱ्यांचे अनोखे मतदान केले. चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. ऐन कांदा काढणीस केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने बाजारपेठेतील बाजारभाव कोसळले होते. परिणामी त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्याचा परिणाम स्वरुप शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून नाराजी व्यक्त केली.
दिंडोरीत टोमॅटोचा वापर
नाशिकमधील दिंडोरीत शेतकऱ्यांनी लक्ष वेधले. एका शेतकऱ्याने ईव्हीएममध्ये मतदान करताना चक्क टोमॅटोचा वापर केला. तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर मोबाईल बंदी असताना मतदान करतानाचे मोबाईलवर एका शूटिंग केले आहे. त्याचे मतदान करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. टोमॅटोच्या साह्याने बटन दाबून मतदान करतानाचा हा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओत मतदान कोणाला करत आहे, हे सुद्धा दिसत आहे. सकाळी शांतीगिरी महाराज यांनी ईव्हीएमला हार घालून मतदान केले होते.
नाशिकमध्ये ईव्हीएम बंद
नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरातील मतदान केंद्रावर तब्बल अर्धातास ईव्हीएम खराब झाले होते. पाथर्डी फाटा परिसरातील स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूल या मतदान केंद्रावर अर्धा तास ईव्हीएम मशीन बंद होते. एव्हीएम मशीन सुरू होत नसल्याने गोंधळ उडाला होता. यामुळे मतदानाला विलंब होऊन नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर मतदानासाठी अर्धा तास वाढवून देण्यात येणार असल्याची मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांनी सांगितले.