ठाणे, कल्याणचे तारणहार उमेदवार देऊ शकले नाही, संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चिमटा

Sanjay Raut: कोणाला उमेदवारी साठी पक्ष सोडायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मुंबईमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडी समोर कोणताही बंडखोर, गद्दार टिकणार नाही. मुंबईच्या सर्व सहाच्या सहा जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी कोणी दुसऱ्या पक्षात जात असेल तर आम्हाला त्याचं आव्हान अजिबात वाटत नाही.

ठाणे, कल्याणचे तारणहार उमेदवार देऊ शकले नाही, संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चिमटा
संजय राऊत यांचे विधान चर्चेत
Follow us
| Updated on: Apr 04, 2024 | 11:20 AM

महायुतीमध्ये अजूनही सर्व जागांवर उमेदवारी जाहीर झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्राबल्य असलेल्या ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचे चित्र स्पष्ट झाले नाही. त्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना घेरले आहे. कल्याण -डोंबिवलीमध्ये अहंकार, गद्दारी आणि पैशांची मस्ती चालणार नाही, आम्ही तुमचा पराभव करू, असे आव्हान संजय राऊत यांनी महायुतीला दिले आहे. तसेच ठाणे शहराचे तारणहार उमेदवार देऊ शकले नाही, असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.

अद्याप तुम्ही स्वतःची उमेदवारी नाही

आधी तुमची उमेदवारी जाहीर करा, कल्याण डोंबिवलीमध्ये आपण विद्यमान खासदार आहात. जी खासदारकी तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाली आहे, अद्याप तुम्ही स्वतःची उमेदवारी जाहीर करू शकला नाही. जिंकण्याची भाषा करता बच्चम जी…दिल्ली अभी दूर है… आता तुम्ही दिल्लीत पोहोचणार नाही. आमची सामान्य कार्यकर्ता वैशाली दरेकर तिथे अहंकार आणि गद्दारीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आगे आगे देखो होता है क्या…

ज्यांची उमेदवारी कापण्यात आली, त्यांना प्रश्न विचारा. नाशिक, रामटेक, हिंगोली, यवतमाळ, वाशिम अजून ठाणे ,कल्याण -डोंबिवलीमध्ये उमेदवार देऊ शकले नाही, जे मुख्यमंत्री स्वतःला ठाण्याचे तारणहार म्हणतात ते आपल्या भागाचे उमेदवार अद्याप जाहीर करू शकले नाही. स्वतः मुख्यमंत्री भाजपच्या दहशतीखाली आहेत. म्हणून ते अचानक कुठेतरी अदृश्य होतात, आगे आगे देखो होता है क्या…असे चिमचे संजय राऊत यांनी महायुतीवर काढले.

हे सुद्धा वाचा

कोणाला उमेदवारी साठी पक्ष सोडायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मुंबईमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडी समोर कोणताही बंडखोर, गद्दार टिकणार नाही. मुंबईच्या सर्व सहाच्या सहा जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी कोणी दुसऱ्या पक्षात जात असेल तर आम्हाला त्याचं आव्हान अजिबात वाटत नाही. संजय निरुपमसंदर्भात निर्णय हा काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे. काँग्रेस पक्षाने जो निर्णय घेतलेला आहे त्यावर इतर पक्षाने बोलणं उचित नाही. पक्षाविरोधात जर कोणी वेगळी भूमिका घेतली तर प्रत्येक पक्षाकडून अशा प्रकारची कारवाई केली जाते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.