सत्तेत असताना का विरोध केला नाही, राज ठाकरे यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका
राज ठाकरे यांनी आज कणकवलीत जाहीर सभा घेतली. या वेळी बोलताना त्यांनी नारायण राणे यांचं कौतूक केले. नारायण राणे यांना आणखी काही काळ मुख्यमंत्री म्हणून मिळाला असता तर आज येथे प्रचार करण्याची वेळच आली नसती.
Raj Thackeray Live : राज ठाकरे यांनी आज कणकवलीमध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारच्या कामाचं कौतूक केलं. ते म्हणाले की, ‘नारायण राणे यांना माझी गरज नाही. ते निवडून आलेले आहेत. इतका सुंदर हा प्रदेश आहे. येथील जनता सुजान आहे. महाराष्ट्र राज्याला नऊ भारतरत्न आहेत. त्यापैकी जवळपास ७ हे कोकणातून जातात. एकट्या दापोलीत चार भारतरत्न आहेत. कोण आपलं भलं करु शकतं हे लोकांना माहितीये. कोणाला मुलाखत द्यायच्या नाही असं ठरवलं आहे. विधानसभेला मुलाखती देण्याचे ठरवले आहे.’
‘गुढीपाडव्याच्या सभेत मी पाठिंबा का दिला हे सांगितलं होतं. मला एखादी गोष्ट पटली तर पटली. नाही पटली तर शेवटपर्यंत नाही पटणार. २०१४ ते १९ दरम्यान ज्या गोष्टी नाही पटल्या त्यावर मी जाहीर विरोध केला. आज ही त्या गोष्टी नाही पटत.’
‘कलम ३७० रद्द करण्याबाबत केव्हा पासून मी ऐकत होतो. मोदींनी ते कलम रद्द केलं. ते मोदी सरकारमुळे झाले ते तुम्हाला मान्य करावेच लागेल.बाबरीचा विषय जेव्हा आला तेव्हा देशभरातून कारसेवक तेथे गेले. मुलायम सरकारने अनेक कारसेवकांना गोळ्या घातल्या होत्या. ती घटना अजूनही माझ्या डोळ्यासमोरुन जात नाही.न्यायालय आणि मोदी सरकारमुळेच राम मंदिर झाले. त्यामुळे कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळाली.’
‘माझा हेतू स्पष्ट होता. उद्देश पारदर्शक होता. मला मुख्यमंत्रीपद हवं म्हणून माझी भूमिका नसते. गोष्ट हिरावून घेतली म्हणून आग लागली. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, आधी तुम्ही त्यांच्या सोबत सत्तेत होते. तेव्हा मुख्यमंत्री असताना साडेसात वर्ष सत्तेत असताना तुम्ही विरोध का नाही केला. तेव्हा का उद्योगधंदे जाऊ दिलेत असा सवाल त्यांनी केला.’
‘जैतापूरच्या प्रकल्पाला विरोध केला. कोकणात प्रकल्प येऊ द्यायचा नाही. नाणारला विरोध झाला. याचा खासदार विरोध करणार. लोकांना भडकवणार. नाणार होणार तिथे जमीन आली कुठून. अनेक दलालांनी जमीन विकत घेतली. मुख्यमंत्री झाल्यावर यांनी म्हटले बारसुला हलवा. आता जमीन कशी सापडली. यांच्याच लोकांनी या जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. तुमच्याकडे १० रुपयाला घ्यायची आणि सरकारकडून २०० रुपये घ्यायचे. हे सगळे प्रकार सुरु आहे.’
‘कोकण रेल्वे किती वर्षात झाली. तेव्हा असे दलाल फिरत नव्हते म्हणून झाली कोकण रेल्वे. चांगले प्रकल्प यावे अशी सगळ्यांची इच्छा आहे. गोव्यात अख्ख जग जातं. पण कोकणाच्या किनाऱ्यावर ते चित्र दिसलं तर मोठी गर्दी होईल. म्हणे आमची संस्कृती बिघडते. दोन वेळचं जेवन देऊ शकत नाही ती कोणती संस्कृती. पक्ष स्थापनेच्या वेळी मी सांगितलं होतं. मलेशियाला एक जागा आहे. तिथे सुरुवातीला फक्त एक हॉटेल होतं.’