बिश्नोई गँग आता एनआयएच्या रडारवर, लॉरेन्सच्या भावाविरोधात मोठी कारवाई

मोठी बातमी समोर येत आहे.लॉरेन्स बिश्नोई गँग आता एनआयएच्या रडारवर आल्याचं पाहायला मिळत आहे.

बिश्नोई गँग आता एनआयएच्या रडारवर, लॉरेन्सच्या भावाविरोधात मोठी कारवाई
Follow us
| Updated on: Oct 25, 2024 | 5:51 PM

मोठी बातमी समोर येत आहे.लॉरेन्स बिश्नोई गँग आता एनआयएच्या रडारवर आल्याचं पाहायला मिळत आहे. लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याची माहिती देणाऱ्याला दहा लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई हा कॅनडा आणि अमेरिकेमधून बिश्नोई गँग चालवत आहे.अनमोल बिश्नोईच्या नावाचा समावेश हा मोस्ट वॉन्टेडच्या यादीमध्ये देखील करण्यात आला आहे.अनमोल बिश्नोईच्या विरोधात एनआयएकडून लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे.

सिद्दिकी यांच्या हत्येशी कनेक्शन

कही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून घेण्यात आली आहे, सोशल मीडियावर पोस्ट करत बिश्नोई गँगनं या हत्येची जबाबदारी घेतली. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी आकरा आरोपींना अटक केली आहे, दरम्यान या प्रकरणात देखील अनमोल बिश्निई याचं नाव समोर आलं आहे, तो बाबा सिद्दिकी यांच्यावर ज्यांनी गोळीबार केला त्या शुटर्सच्या सातत्यानं संपर्कात होता असं बोललं जात आहे.आता त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

गोळी झाडून बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली, बाबा सिद्दिकी हे अभिनेता सलमान खानचे अत्यंत निकटवर्ती होते. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून अनेकदा सलमान खानला देखील धमकी देण्यात आली आहे, तसेच काही दिवसांपूर्वी त्याच्या घरासमोर गोळीबार देखील करण्यात आला होता.

Non Stop LIVE Update
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा.
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'.
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?.
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?.
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक.
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?.
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'.
यंदा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत, ‘या’ मतदारसंघात येणार आमने-सामने
यंदा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत, ‘या’ मतदारसंघात येणार आमने-सामने.
'हम तो ऐसे बदनाम है की बदनामी...', गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा
'हम तो ऐसे बदनाम है की बदनामी...', गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा.