Loudspeaker Guidelines : पुढच्या दोन ते तीन दिवसात भोंग्याच्या वापरावर गाईडलाईन्स येणार, गृहमंत्र्यांची माहिती, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार सज्ज

मागच्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यांवरुन राजकारण सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोर भोंगे वाजवण्याचं वक्तव्य केलं. त्यानंतर हा कलह सुरु झाला. आता यावर राज्यात लवकरच गाईडलाईन्स येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

Loudspeaker Guidelines : पुढच्या दोन ते तीन दिवसात भोंग्याच्या वापरावर गाईडलाईन्स येणार, गृहमंत्र्यांची माहिती, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार सज्ज
दिलीप वळसे पाटील, गृहमंत्रीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 12:56 PM

मुंबई :  मागच्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यांवरुन राजकारण सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Cheif raj thackeray) यांनी मशिदीसमोर भोंगे वाजवण्याचं वक्तव्य केलं. त्यानंतर हा कलह सुरु झाला. आता यावर राज्यात लवकरच गाईडलाईन्स (Loudspeaker Guidelines) येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valase Patil) यांनी दिली आहे. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदी समोर हनुमान चालिसा लावण्याचे आव्हान राज ठाकरे यांनी केलं होतं. त्याचा पुनरुच्चार उत्तर सभेतदेखील त्यांनी केला होता. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मशिदीसमोर भोंगे लावल्याचं दिसून आलं. त्यानंतर हा वाद अधिकच वाढत गेला. यावर नाशिक जिल्ह्यात भोंगे लावण्यासाठी पूर्व परवानगी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावरुन नाशकात राज ठाकरेंच्या वक्तव्याचा इफेक्ट झाल्याचं दिसतंय. त्यामुळे आता हा वाद अधिक वाढत असल्याचं दिसताच राज्य सरकारनं यावर जलद गतीने निर्णय घ्यायला सुरुवात केल्याचं दिसतंय.

भोंग्यासंदर्भात नव्या गाईडलान्स येणार

राज ठाकरेंचा इफेक्ट?

राज ठाकरे यांचा प्रदेशिक पक्ष असलेल्या मनसेची एकेकाळी नाशकात सत्ता होती. त्याच नाशकात त्यांच्या आदेशाची अंमलबजावनी झाल्याचं बोललं जातंय. नाशकात पोलीस आयुक्त पोलीस दीपक पांडेय यांनी महत्वपूर्ण आदेश दिले असून  3 मे पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. अन्यथा 3 मे नंतर थेट कारवाई करून भोंगे काढणार आहे. मुस्लिम धर्मियांना देखील भोंग्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. हनुमान चालीसा लावायची असल्यास देखील पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक आहे. अजान पूर्वीं 15 मिनिटं आणि 100 मिटर लांब हनुमान चालीसा लावता येईल. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार धार्मिक स्थळी कोणत्याही कार्यक्रमासाठी भोंगे लावायचे असल्यास परवानगी आवश्यक आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदी समोर हनुमान चालिसा लावण्याचे आव्हान राज ठाकरे यांनी केलं होतं. त्याचा पुनरुच्चार उत्तर सभेतदेखील त्यांनी केला होता. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मशिदीसमोर भोंगे लावल्याचं दिसून आलं. त्यानंतर हा वाद अधिकच वाढल्याचं दिसून आलं. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अनेक राजकारण्यांनी टीका देखील केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं होतं. राज्यातील अनेक ठिकाणी मशिदीसमोर भोंगे लावण्यातही आले. तर काही ठिकाणी वेळीच हस्तक्षेपत करत पोलिसांनी भोंगे लावण्यापासून अडवलं. दरम्यान, राज्य सरकार आता भोंग्यांसदर्भात काय गाईडलाईन्स आणणार, ते पाहणं महत्वाचं ठरेलं.

इतर बातम्या 

Pune SDPI Vs Raj Thackeray : अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, ‘एसडीपीआय’च्या अझहर तांबोळींचा राज ठाकरेंना इशारा

Amravati मधील राड्यानंतर अचलपूर, परतवाडा शहरात संचारबंदी

Nitesh Rane : रझा अकादमीच्या इफ्तारला पोलीस आयुक्तांना हजर राहायला सांगणं हा सरकारी आदेश नाही ना?; नितेश राणे यांचा सवाल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.