राज्यात लव्ह जिहाद, जिहादींना कळू दे गृहमंत्री बदलला आहे, भाजप आमदाराचा इशारा कुणाला?

महाराष्ट्रात लव्ह जिहाद होत नाही असा सातत्याने गैरसमज पसरवला जात आहे. पण, हा गैरसमज आहे. महाराष्ट्रातील काही नेते म्हणतात की लव्ह जिहाद होत नाही हे सगळं खोट पसरवलं जातं.

राज्यात लव्ह जिहाद, जिहादींना कळू दे गृहमंत्री बदलला आहे, भाजप आमदाराचा इशारा कुणाला?
AMIT SHAH AND DEVENDRA FADNAVIS Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jun 04, 2023 | 3:41 PM

पुणे : राज्यात आता मविआचं सरकार राहिले नाही. जो कोणी धर्म बदलण्याची जबरदस्ती करणार असेल तर तो दोन पायावर जाणार नाही. मी सातत्याने पोलीस विभागाच्या संपर्कात आहे. समाज म्हणून जोपर्यंत आपण उभं राहत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही. जो कोणी धर्म बदलण्याची जबरदस्ती करणार असेल तर तो दोन पायावर जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधातील कायद्याची प्राथमिक मांडणी सभागृहात झाली आहे. या पावसाळी अधिवेशनात कडक कायदा आणला जाईल अशी माहिती भाजप आमदार नितेश राणे यांनी दिली.

महाराष्ट्रात लव्ह जिहाद होत नाही असा सातत्याने गैरसमज पसरवला जात आहे. पण, हा गैरसमज आहे. महाराष्ट्रातील काही नेते म्हणतात की लव्ह जिहाद होत नाही हे सगळं खोट पसरवलं जातं. मंचर येथे जी घटना घडली. त्यामुळे हा गैरसमज दूर झाला असेल. आमच्या बहिणीसोबत जी घटना घडली त्यामुळे कोणीही वाकड्या नजरेनं पाहिलन तर डोळे ठेवणार नाही हा संदेश देण्यासाठी आज आम्ही एकत्र आलो आहोत. हिंदू समाज आज जागृत होत चालला आहे. आम्ही हिंदू म्हणून आपल्या समोर आलो आहोत असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

गृहमंत्री बदलला आहे.

असंख्य हिंदू मुलींसोबत असे प्रकार घडत आहेत. पोलीस दलातील काही अधिकारी बोलत नाही. पण, काही विशिष्ट अधिकारी समोरच्या लोकांना मदत करत आहेत. त्यांना ताकद देत आहेत. त्या संबंधी जिहादीवर केस टाकू नये म्हणून मदत केली गेली आहे. आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत. जिहादींना कळू दे की गृहमंत्री बदलला आहे.

सुप्रिया सुळे यांच्यावर टिका

महाराष्ट्राच्या काही ताई बोलतात की लव्ह जिहाद होत नाही. पण, ताई तु मंचरच्या बहिणीला भेटायला गेलं पाहिजे. तुला त्या शाहरुखच्या मुलाची चिंता आहे. या बहिणीला भेटायला यायला पाहिजे होतं, असा टोला त्यांनी लगावला.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.