Indor Amalner Bus Accident : इंदूरहून-अमळनेर बस अपघातग्रस्तांना भरीव आर्थिक मदत द्या; जखमींचा सर्व खर्च राज्य सरकारने करावा; अजित पवारांनी केल्या या तीन मागण्या
अजित पवार यांनी सांगितले की, बसमधून कोण कोणत्या परिसरातील नागरिक प्रवास करत होते, त्यांची माहिती घेऊन त्यांना तात्काळ मदत देण्याची मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या अपघाताविषयी बोलताना सांगितले की, आम्ही सरकारकडे तीन प्रकारच्या मागण्या केल्या आहेत.
मुंबईः इंदूरहून अमळनेरकडे (Indor Amalner Bus) येणाऱ्या या बसला (बस क्र. एमएच 40 एन 9848) मध्य प्रदेशमधील धारमध्ये भीषण अपघात झाला. हा अपघात झाल्यानंतर मदतकार्य सुरु करण्यात आले असले तरी विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) यांनी या अपघाताबाबत बोलताना सांगितले की, या अपघाताची ज्यावेळी माहिती समोर आली त्यावेळी माध्यमांनीही मृतांचा आकडा वेगवेगळा सांगितला असला तरी अपघातग्रस्त बसमधील सर्व प्रवासी ठार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. मात्र अपघातातील काही प्रवासी वाचले असतील तर त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकारन (costs of treatment State government) करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्री मा. @mieknathshinde जी यांनी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून बचाव व मदतकार्य गतिमान करण्याच्या, जखमी प्रवाशांना आवश्यक वैद्यकीय उपचार पुरवण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 18, 2022
या अपघातात ठार झालेल्यांपैकी आठ जणांची ओळख पटली असून मृतांना राज्य सरकारकडून भरीव आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलीआहे.
मृतांच्या नातेवाईकांना तात्काळ मदत द्या
यावेळी अजित पवार यांनी सांगितले की, बसमधून कोण कोणत्या परिसरातील नागरिक प्रवास करत होते, त्यांची माहिती घेऊन त्यांना तात्काळ मदत देण्याची मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या अपघाताविषयी बोलताना सांगितले की, आम्ही सरकारकडे तीन प्रकारच्या मागण्या केल्या आहेत.
विरोधी पक्षनेत्यांच्या तीन मागण्या
त्या तीन मागण्या म्हणेज इंदूरहून अमळनेरकडे येणाऱ्या बसला मध्य प्रदेशमधील धारमध्ये झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ताबोडतोब भरीव आर्थिक मदत द्यावी, राज्यस्तरावरून अपघातातील जखमींवर तातडीने उपचार करावे तसेच सध्या महाराष्ट्रात पूरस्थिती परिस्थिती कायम आहे त्यामुळे पूरपरिस्थितीची पाहणी करुन मदत द्यावी तसेच महाराष्ट्रातील पूर परिस्थिीतील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती असणाऱ्यांना राज्यसरकारने मदत देण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे.
चालक-वाहक ठार
दूरहून अमळनेरकडे येणाऱ्या बसचा अपघात खलघाठ आणि ठिगरीतील नर्मदा पुलावर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातग्रस्त बसचे चालक सी. ई. पाटील आणि वाहक पी. एस. पाटील या दोघांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला असून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.